योगाचे अद्भुत वास्तव | Mind-Blowing Yoga Facts

कितीही चिंता असोत वा कठीण प्रसंग, चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही असे जीवन कोणाला नको आहे? हे सहजशक्य आहे जेंव्हा  तुम्ही योगाचा मार्ग अवलंबता. जेंव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे समरस होऊन काही कार्य करायचे ठरवता आणि  त्यासाठी मेहनत घेऊ लागता, तेंव्हाच जीवनाची यथार्थता अनुभवास येते. होय! हीच खरी योगाची ताकत आहे.

योगामध्ये काही सुलभ श्वास प्रक्रियांचा समावेश असतो ज्यामुळे तुम्हाला श्वासाचे सामर्थ्य कळू लागते आणि काही आसने असतात जी तुम्हाला निरोगी व प्रसन्न ठेवतात. इतर व्यायाम केल्याने तुम्हास थकवा जाणवू शकतो पण योगामुळे अगदी पहिल्या दिवसापासून उत्साह वाढतो. अश्या या प्राचीन तंत्राबद्दल, योगाच्या काही अदभुत वास्तवांना आणखी जाणून घेऊया.

अधिक चांगली अभिव्यक्ती | Better Expression

योगामुळे तुमच्यातील थकवा आणि साचलेला ताण तणाव हटण्यास मदत होते आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त करू शकता.

श्वासाचे सामर्थ्य | Power of Breath

योगामुळे तुम्ही श्वासाचे सामर्थ्य अनुभवू लागता. तुमच्या श्वासाची गती तुमच्या मनाची अवस्था दर्शविते. जर दीर्घ आणि गहिरे श्वास तुम्ही घेतलेत तर मन शांत होते आणि शरीराला विश्रांती लाभते.

योगाची ताकत अनुभवा | Empower with Yoga

योगामुळे तुमची मनोवृत्ती शांत होत जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. शांत मनाची तुमची प्रसन्नता नजरेतून व्यक्त होते तसेच ती तुमच्या भोवताली सकारात्मकतेचे तरंग पसरवते. योगामुळे व्यक्ती व परिस्थितीवर आपल्या प्रसन्न मनाची छाप पाडण्याचे बळ प्राप्त होते.

शरीर आणि मन ताजेतवाने बनवा|Energize Your Mind and Body

जेवढी तुमच्यातील ऊर्जेची पातळी जास्त तेवढाच तुमच्या जीवनाचा स्तर उच्च असतो. जेंव्हा तुम्ही खूप घाम गाळणारे व्यायाम करता तेंव्हा तुमचे वजन कमी होते आणि नियंत्रणात राहते पण त्यामुळे प्रचंड थकवा येतो. मात्र योगामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढायला लागते.

मनाचे परिवर्तन होते | Transforms the Mind

योगामुळे मनाची चंचलता कमी होऊ लागते. मनातील गोंधळ दूर होऊन शांती,दिव्यता आणि सृजनशीलता वाढू लागते. परिणामी प्रत्येक वर्तमान क्षण उत्सव बनू लागतो.

सद्गुणांची वृद्धी होते | Multiply Your Virtues

आपला मूळ स्वभाव असलेले सद्गुण कित्येक पटींनी वाढू लागतात. आपल्या आयुष्यातील काही जाचक काळ आपणास कधी कठोर,आत्मकेंद्रित आणि असंतुलित करू लागतो. जे आपण देतो तेच परतून आपल्याकडे येते, या नियमानुसार मग आपण नकारात्मक विचार आणि आरोग्याच्या तक्रारीच्या दुष्ट चक्रात अडकत जातो. योगामुळे नकारात्मक, अपायकारक विचार नाहीसे होत संतुलित मन, सकारात्मक विचार आणि निरोगी शरीर प्राप्त होण्यास मदत होते.

आपली आभा प्रबळ होते | Aura Strengthening

आभा म्हणजे शरीराला व्यापून असलेले ऊर्जेचे सूक्ष्म पण प्रभावी क्षेत्र आहे. शांत आणि प्रसन्न मनाची व्यक्ती सकारात्मक आभा उत्सर्जित करीत असते आणि उलट अशांत मनाची व्यक्ती, नकारात्मक आभा. योगाच्या रोजच्या सरावाने मन शांत होऊन आभा प्रबळ बनते आणि सकारात्मकता वाढते.

थोर आशावाद | Great Optimism

योगामुळे सकारात्मक ऊर्जेचा अभाव कधीच जाणवणार नाही. एका योग्यामध्ये आशावादाच्या शक्तीबद्दल अपार श्रद्धा असते आणि मग घटना त्याच्या कलाने घडू लागतात. योग तुम्हाला आशावादाने काठोकाठ भरलेला,समस्यांचे निरसन करणारा चषक बहाल करतो. म्हणून रोजच्या योगाच्या सरावासोबत विचारांचा आवाका विशाल बनतो.

आपले अवयव बळकट करा | Strengthen Your Organs

योगासन आणि श्वास एक दुसऱ्यासोबत जुळलेले आहेत. योगाच्या सरावानंतर थोड्या दिवसांतच काही दृश्य परिणाम अनुभवास येऊ लागतात-जसे तुमचा श्वास दीर्घ व गहिरा होतोय हे जाणवू लागेल. तुमचे स्नायु शिथिल होऊ लागल्यामुळे शरीरातील ताठरता व सुरकुत्या कमी होऊ लागतील. फुफ्फुसे कधी पूर्वीपेक्षा बळकट होतील, हाता पायाची लवचिकता वाढेल, पाठ मजबूत होईल. मन अगदी ताजेतवाने होईल आणि हृदयातून तारुण्य फुलू लागेल.

योग अश्या प्रकारे सर्वसमावेशक सराव आहे ज्यामुळे शरीर आणि मनाचे पुनरुज्जीवन होऊ लागते. योगामुळे अमाप उत्साह आणि विशाल दृष्टीकोन बाळगत आपल्या मुळ आनंदी स्वत्वाची प्रचिती येऊ लागते. मग आता प्रतीक्षा कसली? चला, जागे व्हा, आणि असा हा जादुई आणि परिणामकारक योग आत्मसात करा.

योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होत असले तरी योग कोणत्याही औषध उपचारासाठी पर्याय होऊ शकत नाही. श्री श्री योग प्रशिक्षकच्या श्री श्री योगा प्रशिक्षक कुशल मार्गदर्शनाखाली योग शिकणे आणि सराव करणे गरजेचे आहे. आरोग्याच्या काही तक्रारी असतील तसेच काही उपचार सुरु असतील तर डॉक्टरांचा तसेच श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आपल्या नजीकच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात श्री श्री योग शिबीराची श्री श्री योगा प्रोग्रॅम ची चौकशी करा.  इतर माहिती आणि आपली प्रतिक्रियासाठी  info@srisriyoga.in संपर्क करा.