आपले वजन कमी करण्यासाठी या आसनांमध्ये विश्राम करा | Yoga asanas for weight loss in Marathi

वजन कमी होण्याबरोबर तुम्हाला एक समर्पक, बांधिलकीची आणि शिस्तबद्ध जीवनशैली मिळते. खूप जणांना वजन कमी करायचे असते. यासाठी आपण विविध आहारांचे प्रयोग करतो, व्यायाम प्रशिक्षण चालू करतो; त्यात आधुनिक प्रकारांसोबत योग सुद्धा करतो. परंतु कालांतराने आपण निराश होतो, निरुत्साही होतो आणि हे सर्व प्रयोग आणि प्रशिक्षण सोडून देतो. हे दुष्टचक्र चालू राहते आणि शरीराला देखील हे “अंगवळणी” पडल्यामुळे पुन्हा तुम्ही जेंव्हा आणखी एखादा प्रयोग किंवा प्रशिक्षण सुरु करू पाहता तेंव्हा शरीराला लागलेले वळण तोडायला खूप वेळ लागतो. याचा अर्थ पुढच्या वेळेस जेंव्हा तुम्ही वजन घटविण्याच्या तयारीला लागता तेंव्हा तुम्हाला तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी अधिक श्रम घ्यावे लागतील. फलित साध्य होण्यासाठी रात्रंदिवस घाम गाळावा लागेल, आळस झटकावा लागेल. कंटाळा करून चालणार नाही. कालांतराने आरशात पाहून कोणीतरी गाली खुद्कन हसणार आहे!

वजन घटविण्यासाठी योगाची मदत होऊ शकते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे योगा केल्यानंतर तुम्हाला अधिक उत्तेजित आणि ताजेतवाने दमदार वाटते. योगासनांची तुलना एरोबिक सारख्या व्यायामाशी केली जाते. पण इतर (तितकेच परिणामकारक) तरीही खडतर व्यायाम प्रकारांच्या तुलनेत कमी कॅलरीज जळतात. फोपशा (कॅलरीज) कमी करण्याची योगाची स्वतःची सौम्य-मृदू पध्दत आहे. प्रक्रिया मंद गतीची जरी असली तरी सुरी लोणी कापते त्याप्रमाणे तो आपली चरबी कमी करते. मग चरबी कमी करण्यास मदत करणारे काही उत्तम आसन प्रकार पाहूया:

वजन कमी करण्यासाठी योगासन

  1. सूर्य नमस्कार | Surya namaskar
  2. वीरभद्रासन | Virabhadrasana
  3. भुजंगासन | Bhujangasana
  4. धनुरासन | Dhanurasana
  5. त्रिकोणासन |Trikonasana

सूर्य नमस्कार | Surya namaskar

विविध १२ आसनांचे एकत्रीकरण म्हणजे सूर्यनमस्कार. आसनांच्या बाबतीतला हा एक उत्तम प्रकार आहे. संपूर्ण शरीरावर याचा परिणाम होतो; विशेषतः मोठ्या स्नायू गटांवर. वजन घटविण्यास याची मदत होते आणि याला आसनांचा राजा म्हटले आहे सूर्यनमस्कार कसे करतात हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा


वीर भद्रासन |Virabhadrasana

Virabhadrasana (Warrior pose)

पुढे वाकल्यामुळे शरीराचा भार मांड्यांवर येतो. त्यामुळे वीर भद्रासनात पायाच्या पोटऱ्या, मांड्या, घोटा, धोंड्शीर, इ. बळकट होतात. पोटातील ग्रंथी उत्तेजित होण्यास मदत होते ज्यामुळे शरीरातील त्राण वाढतो. त्राण वाढल्यामुळे तुमच्या अंगातील नैसर्गिक सामर्थ्य वाढते व तुम्ही अधिक काळ तग धरू शकता. हे आसन ३ प्रकारे केले जाते

वीरभद्रासन कसे करतात हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा


भुजंगासन | Bhujangasana

Bhujangasana (Cobra Pose)

छाती व पाठीच्या भागावर हे आसन काम करते. हृदय उघडणारे हे आसन आपल्याला खोलवर श्वास घेण्यास मदत करते ज्यामुळे शरीरभर ताजे शुध्द रक्त पोहोचते. या शुध्द रक्तामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. नितंब देखील आकारात येतात.

भुजंगासन कसे करतात हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा


धनुरासन | Dhanurasana

Dhanurasana (Bow pose)

योगातील हे एक प्रगत आसन आहे. पण या आसनामुळे चरबी कमी होतेच, तसेच हात आणि पाय देखील कमानदार होतात. हे आसन करताना ओटीपोटात ताण निर्माण होतो. त्यामुळे त्या भागातील चरबी सैल होण्यास मदत होते. नियमितपणे हे आसन केल्यास ही सैल झालेली चरबी पुढे वितळून जाते. धनुरासन कसे करतात हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

याशिवाय वजन कमी करण्यासाठी सुमारे ८ टिप्स वाचा

 

 
शरीरावर या आसनांचा आश्चर्यकारकरित्या परिणाम घडतो. पण आधी सांगितल्याप्रमाणे वजन घटविण्यासाठी विविधांगी गोष्टींचे एकत्रीकरण व संयोजन गरजेचे आहे. एक शिस्तबद्ध जीवनशैली आणि आहार तुम्हाला तुमच्या स्वप्नातील शरीरापर्यंत नेण्यास दूरवर उपयोगी ठरेल.