आर्ट ऑफ लिव्हिंग (पार्ट २) (Part 2 program in Marathi)

आर्ट ऑफ लिव्हिंगचा अॅडव्हान्स प्रोग्रॅम हा बहुतेक वेळा निवासी पद्धतीचा असतो आणि अंतर्मुख होण्यासाठी सोयी सुविधा पुरवल्या जातात जेणे करून आपल्या मनातील कोलाहल शांत होऊन गहिरी विश्रांती आणि अंतर्मनातील निरव शांतता अनुभवास येते. आर्ट ऑफ लिव्हिंग (पार्ट १) प्रोग्रॅम मध्ये शिकवलेल्या ‘सुदर्शन क्रिया’ या श्वसन प्रक्रियेवर आधारित हा कोर्स पुढे जातो.

मौन साधना - शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पुनरुज्जीवनासाठी, मन विचलित करण्याऱ्या बाहेरील गोष्टींपासून आपली शक्ती आणि लक्ष जाणीवपूर्वक काढून घेण्याची ही साधना अनेक परंपरांमध्ये पूर्वापार वापरली जाते. नेहमी क्रियाशील असलेल्या आपल्या मनाला त्यापलीकडे घेऊन जाण्यासाठी, या कोर्ससाठी खास तयार केलेल्या विविध प्रक्रिया केल्याने आपल्यात असाधारण अशी शांतीची भावना निर्माण होते आणि नवचैतन्य घेऊन आपण आपल्या रोजच्या जीवनासाठी घरी परततो. .

अपरिहार्य अट :

  • आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस प्रोग्राम

 

 

  • फायदे
  • अनुभव कथन
  • तंत्र
  • “चंचलतेपासून स्तब्धता, आवाजा पासून शांतता ह्या प्रवासाला ध्यान म्हणतात”. – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक.

    • गहन आत्मशांती अनुभवा, समाधी ची एक स्थिती
    • आत्म-जागरूकता आणि चेतनेची पारदर्शकता वाढवा
    • जास्त उर्जित रहा
    • आपल्या कल्पकतेची स्तर वाढवा
  • “अॅडव्हान्सड् कोर्स मधील प्रत्येक क्षण माझ्यासाठी नवीन अनुभव होता. : ध्यान आणि मौन” – नीता आर


    “मला नेमके सांगता येणार नाही पण पार्ट २ कोर्स करण्याच्या आधी आणि नंतर या मध्ये खूप फरक आहे. मला वाटतय की मी एक नवीन व्यक्ती झाले आहे. त्यामुळे पार्ट २ कोर्स म्हणजे माझ्या नवीन जीवनाची सुरवात आहे असे मी म्हणेन. एक नवी मी अगदी आरामात आहे. मला अगदी धन्य आणि छान वाटते आहे. खरं तर, असा कोर्स करायला मिळाला त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. अशी संधी दिल्याबद्दल धन्यवाद.” -- शोको

  • हा कोर्स निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी निवासी पद्धतीने घेतला जातो. बरेचसे सदस्य याला शरीर, मन आणि आत्म्यासाठी असलेली सुट्टी आहे, असे मानतात यात आश्चर्य नाही..

    • श्री श्री रविशंकर यांच्या खास अशा मार्गदर्शित ध्यानपद्धती.
    • कोर्सध्ये शिकवली जाणारे काही खास प्राणायाम प्रकार.