ज्ञान मालिका: श्री श्री रविशंकर यांची निरुपणे (Sri sri ravi shankar commentaries in Marathi)

अष्टावक्र गीता

१९९१ मध्ये भारतातील बंगलोरमध्ये स्थित आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये रेकॉर्ड केलेली  अष्टावक्र गीता ही श्री श्री रविशंकर यांनी केलेल्या उद्बोधक निरुपणाची एक असामान्य मालिका आहे. अष्टावक्र गीता ही मन, अहंकार, कलह आणि आत्मा यांचे मर्मज्ञान अतुलनीय विद्वत्तेने आणि गहनतेने असे काही  विषद करते जे केवळ एक सद्गुरूच करू शकतो. प्राचीन ज्ञान, अभिजात कथा आणि व्यावहारिक ज्ञान यांची श्री श्री यांनी इतकी सुंदर गुंफण घातली आहे की ते मंत्रमुग्ध करून टाकतात. यामुळे सत्याच्या सच्च्या साधकाला अष्टावक्र गीता ही एक अमुल्य  साधन  आणि साथीदार बनते.

 

तुमच्या जवळपास अष्टावक्र गीता ज्ञान मालिका उपलब्ध करणाऱ्या स्थानिक सेंटरचा शोध घेण्याकरिता इथे क्लिक करा

पतंजली योग सूत्रे

“जडतेच्या पिंजऱ्यातून माणसाची सुटका करणे हे पतंजली योगसूत्रांचे ध्येय आहे. मन हे उच्च कोटीचे जडत्व आहे आणि चित्त किंवा अहंकार  यांच्या जाचातून सुटलेला मनुष्य  पावन होतो.” – श्री श्री रविशंकर.

पतंजली योग सूत्र हा सुभाषितांचा संच आहे ज्यामध्ये योगाचे शास्त्र, कला आणि तत्वज्ञान याबद्दल विस्तृतपणे वर्णन आहे. त्यांच्या साध्या आणि विषयावर प्रकाश टाकणाऱ्या भाष्यातून श्री श्री रविशंकर हे या प्राचीन ग्रंथाचे परीक्षण करतात आणि योगाची तत्त्वे दैनंदिन जीवनात कशा प्रकारे आणली जाऊ शकतात हे समजावतात.  हव्यास  आणि तिरस्कार यांना हाताळून, समदर्शी तरीसुद्धा कार्यक्षम जीवन जगणे, ज्ञान आणि सरावांनी मनाच्या वृत्तींना ताब्यात ठेवणे, जागरूकता बाणणे- हे श्री श्री यांनी केलेल्या भाष्यातील  काही  विषय आहेत. जगभरातील अनेक उत्साहीं योग अभ्यासकांना हे पुस्तक आणि व्हिडिओ मालिकेतील  भाष्य अतिशय मनापासून  आवडेल.

तुमच्या जवळपास पतंजली योग सूत्रांची ज्ञान मालिका उपलब्ध करणाऱ्या स्थानिक सेंटरचा शोध घेण्याकरिता इथे क्लिक करा