अद्भुत आहे ! भारतीय नव वर्षाची संकल्पना | Interesting points to ponder over about Indian new year celebrations

२०७३ वर्षापूर्वी भारतात एक अत्यंत धार्मिक राजा होऊन गेला.तेंव्हा पासून हि काल गणना त्यांच्या नावावरून सुरु झाली,म्हणून हे नूतन वर्ष विक्रम संवत २०७४.।  विक्रम राजापुर्वी श्रीकृष्णाच्या नांवावरून वर्षगणना होत होती, त्यानुसार हे ५११९ वर्ष आहे.

भारतातील नव वर्ष प्रणाली

नव वर्षाची ही प्रणाली ब्रम्हांडावर आधारित आहे. वर्षारंभ हा सूर्य किंवा चंद्र जेंव्हा मेष राशीच्या प्रारंभी प्रवेश करतो तेंव्हा असतो. आज चंद्र मेष राशीत प्रवेश करतो. जेंव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेंव्हा देखील आपण ‘ वैशाखी ‘ नावाने वर्षारंभ साजरा करतो.

असे निम्मा भारत चंद्राप्रमाणे गुढी पाडवा तर निम्मा भारत सूर्याप्रमाणे वैशाखी साजरा करतो. त्यात देखील एकसारखेपणा नाही आहे, सर्वांना त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे. पंजाब (ਵਿਸਾਖੀ - Vaisakhi), बंगाल ( পয়লা বৈশাখ - Poila/Pohela Baishakh) , उड़ीसा (Pana Sankranti) ,तमलिनाडु (புத்தாண்டு, Puthandu), असम (বিহু - Bihu) और केरल राज्यांमध्ये सूर्याप्रमाणे वर्षारंभ ‘ वैशाखी ‘ साजरी  करतात। कर्नाटक (ಯುಗಾದಿ - Yugadi), महाराष्ट्र (गुढीपाडवा - Gudi Padwa), आंध्र प्रदेश (ఉగాది -Ugadi) आणि इतर कित्येक राज्यांमध्ये आज म्हणजे चंद्राप्रमाणे वर्षारंभ (गुढी पाडवा) साजरा करतात. आर्ट ऑफ लिविंगमध्ये आपण प्रत्येक दिवस साजरा करत असतो.

प्राचीन काळी जगभरात चंद्रावर आधारित काल गणना प्रचलित होती.आज देखील तुर्की आणि इराण मध्ये हि काल गणना प्रचलित आहे.त्यांचा मार्च मध्ये वर्षारंभ असतो.लंडनच्या किंग जॉर्जचा जन्म जानेवारी महिन्यात झाल्याने त्यांची इच्छा होती कि सर्वत्र जानेवारी मध्ये वर्षारंभ व्हावा.जानेवारी हा त्यांचा वर्षारंभ आहे यात काही शंका नाही परंतु त्यांनी ते सर्व ब्रिटीश साम्राज्यभर लागू केले.हे आठव्या कि नवव्या शतकात घडून गेले, परंतु लोकांनी एप्रिल महिन्यातला वर्षारंभ देखील साजरा करायचा सुरु ठेवला.म्हणून किंग जॉर्ज त्या दिवसाला ‘ एप्रिल फूल डे ‘म्हणत.ते म्हणत कि,जे कोणी हे साजरे करत ते फूल आहेत, अश्यारितीने एक एप्रिल हा ‘ फूल्स डे’ बनला.

कडुलिंबाची पाने आणि गुळाचे महत्व | Importance of Neem and Jaggery

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (गुढी पाडवा)अत्यंत कडू अशी कडू निंबाची पाने गोड गुळासोबत खाण्याची प्रथा आहे.यातून हेच सूचित होते कि,जीवन कडू आणि गोड, दोन्हींनी युक्त आहे, स्वीकारायचे असते.काल परत्वे कडू आणि गोड दोन्ही अनुभव येतात.असे समजू नका कि प्रिय व्यक्ती चांगले अनुभवच देतील,काही कटूता देखील मिळेल.शत्रू निव्वळ कटू अनुभवच देतील असे होणार नाही तर काही चांगले अनुभव देखील देतील.जीवन हे विरोधाभासांनी युक्त आहे.थंडी पण आहे,गरमी पण आहे, आहे नां? नववर्ष या संदेशाने सुरु होते.

तुम्हाला माहित आहे, महिने आणि दिवसांची नांवे संस्कृत मध्ये आहेत? | Names of months and days are in Sanskrit

दिवसांची नांवे ग्रहांवरून आहेत.

  • रविवार हा रवीचा दिवस,
  • सोमवार हा सोम म्हणजे चंद्राचा दिवस,
  • मंगळवार मंगळाचा,
  • बुधवार बुधाचा,
  • गुरुवार गुरूचा,
  • शुक्रवार शुक्राचा तर
  • शनिवार हा शनीचा दिवस.

या सात ग्रहांच्या नावांवरून सात दिवसांची नांवे पडलीत.खरेतर हे सर्व संस्कृत मध्ये आहे. पुरातन भारतात संस्कृत मध्ये कॅलेंडर,पंचांग बनवले जायचे.कालांतराने ते इजिप्त मध्ये पोहोचले.

बारा महिन्यांची नांवे बारा राशींवरून म्हणजे, सूर्याच्या त्या त्या राशी स्थितीवरून उदा. ती स्थिती मेष,वृषभ,कन्या,कर्क,सिंहेमध्ये आहे, त्यावरून  महिन्याची नावे ठेवली गेली; म्हणून महिन्यांची नांवे संस्कृत शब्दांशी संबंधित आहेत. दशांबर हा डिसेंबर आहे. संस्कृतमध्ये दश म्हणजे दहा आणि अंबर म्हणजे आकाश. नवंबर म्हणजे नोव्हेंबर म्हणजे नववे आकाश.ऑक्टोंबर म्हणजे अष्टन्बर, सप्टेंबर म्हणजे सातवे आकाश.

पहा,एखादे नांव योगायोगाने जुळेल परंतु सर्वच नांवे जुळत असतील तर तो योगायोग म्हणता येणार नाही. षष्ठ म्हणजे सहावा म्हणजे ऑगस्ट, हा आठवा महिना नाही तर मार्च पासून सहावा आहे. फेब्रुवारीच पाहा नां, मार्च जर सुरवात असेल तर फेब्रुवारी शेवटचा,बारावा महिना येतो. मार्च हा नवीन वर्षाचा पहिला महिना आहे.

चंद्र नववर्ष और चंद्र कैलेंडर काय आहे ? | What is Lunar calendar and Lunar new year

चंद्रावर आधारित कालगणनेनुसार नववर्ष २० मार्चला सुरु होते, परंतु एका ब्रिटीश राजाने (किंग जॉर्ज), ज्याचे अमेरिका आणि कॅनडासह निम्म्या जगावर कब्जा आणि साम्राज्य होते, त्याने हे सर्व बिघडून टाकले आणि आपल्या वाढदिवसाप्रमाणे नववर्ष सुरु केले. दुर्दैवाने बहुतांशी भारतीय महिन्यांची पारंपारिक नांवे आणि त्यांचे अर्थ विसरलेत. चंद्र कालगणनेनुसार महिन्यांची नांवे: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन आहेत.

आकाश गंगे मध्ये एकूण २७ नक्षत्रे आहेत. सव्वा दोन ताऱ्यांचे मिळून एक नक्षत्र बनते । या संख्येला 12 ने  गुणल्यावर बरोबर  27 तारे होतात । पौर्णिमा पौर्णिमेचा चंद्र जेंव्हा एका नक्षत्राच्या कक्षेमध्ये येतो तेंव्हा त्या महिन्याला त्या नक्षत्राच्या नावाने जाणले जाते. उदा. चित्रा नक्षत्रामध्ये जेंव्हा पौर्णिमा उगवते तो महिना पहिला महिना म्हणजे चैत्र. पुढचा महिना वैशाख. किती अचूक हिशोब आहे कि ज्या महिन्यामध्ये ज्या नक्षत्रामध्ये चंद्र येतो त्या महिन्याला त्या नक्षत्राचे नांव.

चंद्र काल गणनेनुसार एका महिन्यात २७ दिवस असतात, म्हणून दर चार वर्षातून एक ‘अधिक ‘ महिना (Leap year) म्हणजे एक जास्तीचा महिना येतो.जसे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात तसे हिंदू वर्षात एक अधिक महिना येतो.

सूर्य कालगणनेनुसार इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे एक ‘अधिक‘ दिवस (leap day) असतो. वैशाखी कधी १३ एप्रिलला तर कधी १४ एप्रिलला येते. एक दिवस फरक होतो.

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेछया !!

- गुरुदेव श्री श्री रविशंकर के ज्ञान वार्तेतून संकलित

तमलिनाडु (புத்தாண்டு - Puthandu) - Tamil New year