वजन कमी करण्याची पांच रहस्ये | 5 Secrets to Weight Loss

फास्ट फूड व धावत्या जीवनशैलीचे आगमन झाले आणि एका छुप्या मारेकऱ्याचा आपल्या आयुष्यात चोर पावलांनी प्रवेश झाला, जो पूर्वी कधीतरी केवळ सनसनाटी बातम्या देणाऱ्या छोट्या वर्तमानपत्रात आढळायचा. आता सारं जग त्याबद्दल बोलू लागलंय - लठ्ठपणा. त्या बाबतीत लोक आता जास्त सजग होऊ लागले आहेत. त्याला परतवून लावण्यासाठी कोणतेही प्रयास सोडले गेले नाहीत. त्याला सामोरे जाताना, सामान्यतः हाच प्रश्न भेडसावतो कि, पोटावरच्या ह्या गरगरीत चरबीच्या चिंधड्या उडवून त्याला सिक्स पॅक्समध्ये रुपांतरीत करावे कि अगदी आदर्श शिडशिडीत बांधा ठेवावा.

वजन घटवण्याचे बरेच पर्याय असू शकतात : कोणी वजन कमी करण्याचे ट्रेनिंग घेतील, कोणी कठोर व्यायामाचा पर्याय शोधतील. पण यासाठी महत्वाचे घटक आहेत : समर्पण, वचनबद्धता, शिस्तबद्ध जीवनशैली. आज आपण योगाद्वारे वजन कमी करण्याच्या पांच रहस्यांबाबतीत जाणून घेऊ. या सूचनांचा दैनंदिन जीवनात नियमितपणे अंमल केल्यास स्नायू मजबूत होऊन वजन घटण्यास मदत होईल.

१. हे जग पुरेसे नाही |The world is not enough

२. आशा सोडू नका - वजन सोडा |Don’t lose hope, lose weight

३.तुमचे शरीर हे बँक खाते आहे |Imagine your body as your bank account

४. शरीराला आश्चर्यचकित करा |Surprise your body

५. कंटाळा दूर सारा |Beat the boredom


१. हे जग पुरेसे नाही

संपूर्ण नवं जग तुमच्या योगा मॅटबाहेर तुमची वाट बघतेय. तुमचा योगाचा सराव हा एक बोनस समजा. खरे गमक तुमच्या रोजच्या दिनचर्येत व आहार पद्धतीत आहे. यासाठी मनालाही अनुकूल करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या आहारातील घटक पहा. सूर्यास्तानंतर पिष्टमय पदार्थ खाणे कमी/बंद करा. पोट थोडे हलके असल्यामुळे सकाळी झोपून उठल्यावर तुम्हाला ताजेपणा जाणवेल. कारण तुमच्या रात्रीच्या जेवणात पिष्टमय पदार्थ नसल्याने त्यांचे मेदात परिवर्तीत होण्याची प्रक्रिया थांबलेली असेल.


२. आशा सोडू नका - वजन सोडा

लक्षात घ्या, वर्षानुवर्षे पोटावर मेदाचे थर जमाच होत चालले होते. आशा सोडून देण्याची आणि उपाय योजना मध्येच थांबविण्याची आपली मानसिकता असते. महत्वाचे हे आहे की आपल्या सरावावर आपला दृढ विश्वास हवा, सरावात सातत्य हवे. योगाद्वारे वजन कमी होण्यास थोडा वेळ लागतो, लगेच होत नाही. आजकाल आपल्याला त्वरित निकाल अपेक्षित असतो. परंतु आपण हे विसरतो की हे जमलेले मेद बाहेर निघण्यास दुसरा पर्याय नाही. याबाबत मेहनत घेण्यास तसेच प्रोत्साहन देत मनापासून साथ देईल असा सोबती शोधा आणि तुम्ही सुद्धा त्याला साथ द्या. यामुळे तुमचा योग सराव सुधारेल आणि त्यात आवड देखील टिकून राहील.


३.तुमचे शरीर हे बँक खाते आहे

रोज आहारातून तुम्ही किती कॅलरीज घेता, त्यातील रोज किती खर्च करता आणि यातील उरलेल्या कॅलरीज त्या दिवशी तुमच्या खात्यावर(शरीरात) जमा झाल्याच म्हणून समजा. आहारातून घेण्याच्या कॅलरीज कमी करून आणि खर्च करण्याच्या कॅलरीज वाढवून त्यातील हा फरक तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा. आपले आयुष्य नीट चालू राहण्यासाठी किमान कॅलरीजची गरज असतेच. म्हणून कडक पथ्य पाळणे योग्य नाही. बरीच पथ्ये ही केवळ लहरीखातर पाळली जातात. आणि ते पथ्य सोडताच परत वजन वाढते. म्हणूनच संतुलित कॅलरीज खर्च करणे हा योग्य मार्ग आहे. भोजन नियमित वेळेवर घेतल्यास मध्येच भुकेची फसवी संवेदना जाणवणे कमी होते. तसेच रोज सकाळचा नाश्ता राजासारखा, दुपारचे भोजन राणी सारखे आणि रात्रीचे भोजन दरिद्री माणसासारखे म्हणजे अतिशय कमी घ्यायला हवे. आपण नेमके ह्याच्या उलट करतो आणि सरतेशेवटी भरपूर कॅलरीज न वापरता शिल्लक ठेवतो.


४. शरीराला आश्चर्यचकित करा

ते कसे? तर वेगवेगळे योगाचे प्रकार करून. जर तुम्ही पोटासाठी त्रिकोणासन करीत असाल तर आता शिशूआसन करा. आपल्या स्नायूंवर वेगवेगळ्या पद्धतीने कसरत करून सुक्ष्मपणे वजन कमी होईलच. हा वजन घटविण्याचा पर्याय नसेलही पण आपले उद्दिष्ट असलेली आदर्शवत शरीरयष्टी प्राप्त करण्यास मदत होईल. त्याच स्नायूबंधावर मेहनत घेण्यासाठी नवनवीन योगासने शिका. योगासनामध्ये इतके विविध प्रकार आहेत की तुम्ही आपल्या रोजच्या सरावात त्यांचा अंतर्भाव करू शकता.


५. कंटाळा दूर सारा

थोडा अधिक पल्ला गाठून रोजच्या त्याच त्या योग सरावाचा आपल्याला कंटाळा येऊ लागतो. जेंव्हा वाटेल की खरंच काही फरक पडेल काय? किंवा आता थोडा ब्रेक घ्यावा - अश्या वेळी आपला व्यायाम आणखी जोमाने करा, त्याचा वेळ अजून थोडा वाढवा. त्यामुळे त्यातील तोच तो पणा दूर होईल आणि मनाची प्रवृत्ती बदलेल. सुट्टीदिवशी योगासनांना सुरुवात करण्यापूर्वी दमछाक करणारे व्यायामप्रकार करा. एकदा तुमच्या शरीराला योगासनांची सवय झाली की मग तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांनी मैदान मारलेच म्हणून समजा.

या वजन कमी करण्याच्या पांच रहस्यांचा लाभ झालेला आहे. परंतु आपण आपल्या आवडीप्रमाणे मनाला घडवितो आणि शरीराला काय जास्त योग्य आहे हे माहीत असूनही तोंड फिरवतो. शरीराला जे योग्य आहे तेच करा. खूपच जास्त कसरत आणि कडक पथ्ये टाळा. समतोल मन आणि शारीरक प्रयत्न हेच दीर्घ काळासाठी साथ देतील.