योगाचे फायदे | Yoga benefits in Marathi

योगाचे दहा महत्वाचे फायदे | 10 Benefits of Yoga in Marathi

वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.

योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे आता आपण बघणार आहोत.

  1. सर्व स्तरांवर तंदुरुस्ती | All-round fitness
  2. वजनात घट | Weight loss
  3. ताण तणावा पासून मुक्ती | Stress relief
  4. अंर्तयामी शांतता | Inner peace
  5. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ | Improved immunity
  6. सजगतेत वाढ होते | Living with greater awareness
  7. नाते संबंधात सुधारणा | Better relationships
  8. उर्जा शक्ती वाढते | Increased energy
  9. शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते | Better flexibility & posture
  10. अंतर्ज्ञानात वाढ | Better intuition
1

सर्व स्तरांवर तंदुरुस्ती

 

नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. श्री श्री रविशंकरजी नेहमी म्हणतात “ फक्त रोग विरहीत शरीर असण्याला स्वास्थ्य म्हणता येणार नाही तर आनंद, प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल.”

या ठिकाणी योगाच तुमच्या मदतीला धावून येतो. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यान धारणा या गोष्टी उत्तम आरोग्य राखायला आपल्याला उपयोगी पडतात.

2

वजनात घट

 

याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे ! योगाचा फायदा इथे सुद्धा होतो. सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची सजगता आपल्याला येते. योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते.
3

ताण तणावा पासून मुक्ती

 

रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव तुम्हाला श्री श्री योग लेव्हल-२ शिबिरामध्ये येईल.

4

अंर्तयामी शांतता

 

आपल्या सगळ्यांनाच एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते. परंतू आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच वसलेली आहे हे फार थोड्या लोकांना माहित असेल. फक्त या शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढायला हवा. या छोट्याशा सुट्टीत रोज योग आणि ध्यान केल्याने त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळतात. अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगा सारखा दुसरा उपाय नाही.

5

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ

 

здравословна храна

शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

6

सजगतेत वाढ

 

मन हे सतत कुठल्या ना कुठल्या क्रियेत गुंतलेले असते. ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताण तणावातून मुक्त होऊ शकतो आणि मनाला शांत करू शकतो. योग आणि प्राणायामांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे धावणाऱ्या मनाला आपण सतत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते.

7

नाते संबंधात सुधारणा

 

तुमचा जोडीदार,आई-वडील,मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात.तणावमुक्त,आनंदी आणि समाधानी मन नात्यांसारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते. योगआणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.
8

 उर्जा शक्ती वाढते

 

दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते कां? सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. तुमच्यात काही त्राण उरत नाही. परंतू रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यातून तुम्ही मध्येच दहा मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केलेत तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्यात परत उत्साह संचारेल आणि हातात घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पुरे कराल.

9

शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते

 

 तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. चुकीच्या पद्धतीने बसण्या उठण्यामुळे पूर्वी जे अंग दुखायचे तसे ते दुखणार नाही.

10

अंतर्ज्ञानात वाढ

 

 तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योग आणि ध्यानधारणे मध्ये आहे. तशी वाढ झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योग केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते.

एक लक्षात ठेवा योग ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिचा सराव सतत करत रहा !

 

योगाच्या सरावामुळे शरीर आणि मन जरी कणखर बनत असले तरी औषधांना तो पर्याय नाही (जरूर ती औषधे ही घेतलीच पाहिजेत).श्री श्री योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगा शिकणे आणि त्याचा सराव करणे महत्वाचे आहे.औषधोपचार सुरु असेल तर श्री श्री योग प्रशिक्षक आणि डॉक्टर यांचा सल्ला घेतल्या शिवाय योगासने करू नका.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या केंद्रांवर चौकशी करून श्री श्री योगाचा कोर्स कुठे आहे याची चौकशी जरूर करा.तुम्हाला कोर्स बद्दल आणखीन काही माहिती पाहिजे असल्यास किंवा तुमचे अनुभव कथन करायचे असल्यास पुढील ईमेल वर संपर्क साधा – info@srisriyoga.in