"युवा सबलीकरण आणि कौशल्य कार्यशाळा "- युथ एमापोवरमेण्ट & स्किल्स वर्कशॉप (एस!+) (Yesplus in Marathi)

एक यशस्वी कारकीर्द आणि एक परिपूर्ण व्यावहारिक आयुष्य:

मी दोन्ही मिळवू शकतो का?

विद्यार्थी दशेत असलेल्या आणि नुकत्याच नोकरी व्यवसायात उतरलेल्या तरुण पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या हेतूने त्याना जीवन जगण्याची कौशल्ये शिकवणारा एक सक्षम कार्यक्रम.

   योग प्राणायाम (नियंत्रित स्वसोच्वास), ध्यान आणि सुदर्शन क्रिया, आधुनिक वैचारिक देवाणघेवाण ह्यांचा गाभा

असलेला YES+ COURSE तरुण पिढीला नव्या जगाला पूर्ण तयारीनिशी सामोरं जायचं सामर्थ्य देतो. YES+

जगभरातील कित्येक विख्यात संस्थामध्ये आयोजित केला जातो.

 

व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्याचा समतोल राखण्याचे सोपे गणित:

 

१. एकाग्र बुद्धी = दिवसात जास्त कार्यक्षम तास

बहुतेकदा आपण कामाच्या किवा अभ्यासाच्या तणावाखाली असतो तेव्हाच एकाग्र होतो. पण ह्याचा आपल्या कार्यक्षमतेवर त्याचा ५०% परिणाम होतो. आजच्या जगात, जिथे वेळ म्हणजेच पैसा असल्याचा समीकरण आहे तिथे शांत चित्त आणि एकाग्र मनाची नितांत गरज आहे. YES + तुम्हाला हे साध्या करून देतो.

     चित्रपट बघताना किवा TV समोर आपण एकाग्र होऊन काळ वेळेचा भान हरपून दोन एक तास सहज बसू

शकतो. मग हीच एकाग्रता अभ्यासात किंवा कामात कशी बारा आणायची?

 

२. उत्साह वृद्धी = दृढ़ आत्मविश्वास

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसला कि हमखास आत्मविश्वास धासाळतो. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे किंवा मला नाही वाट हे मला जमेल. आत्मसंदेह हे उर्जा कमी असल्याचे लक्षण आहे. आपली उर्जा अबाधित ठेवणे हे खरं गुपित आहे.

   YES+ मध्ये शिकविल्या जाणाऱ्या प्रभावी श्वसनक्रिया तुमच्यात प्रचंड उर्जा निर्माण करतात ज्यामुळे नाहक

आत्मसंदेह,  संकोच नष्ट करता जेणेकरून तुमच्यात दृढ़ आत्मविश्वास निर्माण होतो.

 

३. आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची क्षमता:

जेव्हा अश्या मनस्थितीत आपण एखादा निर्णय घेतो तेव्हा तो योग्य असेलच का? गरज आहे आपला मन ह्या

कोलाहलातून मुक्त करण्याची आणि रोज पडणारा मानसिक ताण-तणाव सुदर्शन क्रिये द्वारे धूऊन काढायची.

वस्तुस्थिती आहे तशी बघायला शिकायची. ह्यामुळे सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून योग्य निर्णय  घेण्यास मदत होते.