उत्कर्ष योग – उत्कृष्ठतेसाठी सर्वांगीण प्रशिक्षण | Utkarsha yoga for children in Marathi

स्वत:विषयी तसेच इतरांविषयी आदर  भावना विकसित करण्यासाठी आपल्या पाल्यास मदत करा. श्वसनक्रियेची सहज सुलभ तंत्रे, ज्यात सुदर्शन क्रियेचा पण समावेश आहे, या शिबिरात शिकवली जातात. यामुळे आपल्या पाल्यास अस्वस्थता, चिंता, निराशा, द्वेष या सारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण राखण्यास मदत होईल.

     हा कार्यक्रम विशेष करून (वयोगट = ८ ते १३ वर्षे ) या वयोगटाच्या मुलामुलींसाठी विकसित केला आहे म्हणून

त्यामध्ये खेळ, मौज, व्यायाम  इ. आहे. मुलं स्वत:मधील स्नेहभाव, क्षमाशीलता आणि आदर ही दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी तत्त्वे जोपासण्यास / अंगीकार करण्यास शिकतात. आपण शिक्षक असा वा पालक, आर्ट एक्सेल कोर्स हा आपल्या पाल्यास अध्यात्म, मानवता, स्वयंशिस्त आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास यांची ओळख करून देण्यासाठीचा सर्वोत्तम पर्यायआहे.

 

  • फायदे
  • थोडक्यात आढावा : कोर्स विषयी
  • कोर्समध्ये खालील गोष्टींचा समावेश
    • भीती, चिंता, ताण, अस्वस्थता, निराशा, क्रोध इत्यादी नकारात्मक भावनांपासून मुक्तता
    • स्मरणशक्ती आणि एकाग्रता यामध्ये वाढ
    • आनंद, सृजनशीलता आणि सकारात्मकता यामध्ये वाढ
    • सभाधीटपणा येईल / चार चौघांच्या समोर बोलण्याचा आत्मविश्वास विकसित होतो.
    • इतरांसोबत जुळवून घेत गटामध्ये काम करण्यास शिकेल
    • इतरांशी सहकार्य करण्याची वृत्ती वाढेल
    • दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्याची सोपी तत्त्वे आत्मसात करेल
    • श्वसनक्रिया, योग, ध्यान यांचे महत्व
    • नवीन मित्र जोडण्यास शिकेल
    • सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास
    • अध्यात्म, भारतीय परंपरा यांची ओळख
    • मन प्रसन्न राहते.
    • श्वसनाच्या समस्या नाहीशा होतील
    • वयोगट = ८ ते १३ वर्षे
    • कालावधी = ४ ते ६ दिवस
    • दररोज = ३ ते ४ तास
    • सुदर्शन क्रिया
    • ध्यान व श्वसनक्रिया यांची तंत्रे
    • दैनंदिन जीवनातील तत्वे
    • भीती व अस्वस्थता यावर मात करण्याचे तंत्र
    • सुसंवादी प्रक्रिया
    • सांघिक खेळ
    • खाद्यपदार्थांविषयी जागरुकता
    • गटचर्चा
    • मैदानी खेळ (शक्य असेल तेथे)
    • मौज व खेळ याद्वारे शिक्षण
    • दुस-यास मदत करणे