योग आणि विज्ञान I The Science behind Yoga

भारतीय तत्वज्ञानानुसार ‘योग’ गेल्या पाच हजार वर्षांपासून प्रचलित अध्यात्मिक मार्ग असून त्याचा उद्देश व्यक्तितील अध्यात्मिक आणि मानसिक विकास साधणे हा आहे. तथापि  गेल्या काही वर्षात औद्योगिकरण आणि धावपळीच्या वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण झालेले तणाव, चिंता, औदासिन्य या समस्यांशी लढण्याच्या योगाच्या क्षमतेमुळे योग जास्त लोकप्रिय आणि उपयुक्त झाला आहे.

त्याची अध्यात्मिक बाजू सोडली तरी योगाच्या शारीरिक स्तरावर होणाऱ्या उपयोगीतेमुळे त्याच्या कार्यामागील मूळ वैज्ञानिक दृष्टिकोन नजरेस आला आहे. आपल्यावर होणारे मानसिक, शारीरिक आणि मनोकायिक स्तरावर परिणाम करणारे रासायनिक घटक आणि त्यांचा घातक प्रभाव कमी करण्याची क्षमता योगात आहे. मग आपण इतके उपयोगी असणाऱ्या योगामागील विज्ञान समजून घेऊ या.

तणावाला कारणीभूत हार्मोन्स नियंत्रित ठेवतो I Moderates Stress Hormones

जेंव्हा आपल्यामध्ये खूप ताण निर्माण होतो तेंव्हा कॉर्टिसोल नावाचे हार्मोन्स स्त्रवू लागते जे संघर्षासाठी आपल्याला सजग ठेवते. पण हेच दीर्घकाळ घडत राहिले तर ते शरीराच्या कार्यात अडथळा आणतात. पण योगामुळे व्यक्तीच्या ताण तणावाची तीव्रता कमी होते आणि त्यामुळे कॉर्टिसोल हार्मोन्सची निर्मिती घटते ज्यामुळे व्यक्ती शांत होण्यास उपयुक्त ठरते.

अँटी ऑक्सिडंट एन्झाईम्स स्त्रवू लागतात I Secretes Antioxidant Enzymes

वारंवार पर्यावरणातील प्रदूषणाला सामोरे जावे लागल्याने, तसेच शरीरातील चयापचयाच्या बाय प्रोडक्टच्या रुपात शरीरात मुक्त कण(अस्थिर ऑक्सिजन रेणू) तयार होतात ज्यामुळे कॅन्सरसहित बरेच आजार उदभवू शकतात तसेच आपली वृद्धत्वाकडे वेगाने वाटचाल होऊ लागते. ह्या मुक्त कणांना आटोक्यात आणण्यासाठी मानवी शरीरात अँटी ऑक्सिडंट एन्झाईम्सच्या रुपात शक्तिशाली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असते. योगाचा नियमितपणे सराव करणाऱ्या लोकांत अँटी ऑक्सिडंट एन्झाईम्सची पातळी लक्षणीयरीत्या उंचावल्याचे दिसून आले आहे ज्यामुळे मुक्त कणांकडून होणारा धोका टाळण्यासाठी आपली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होते.

Parasympathetic मज्जातंतू प्रणाली कार्यरत होऊ लागते I Stimulates Parasympathetic Nervous System

योगामुळे Parasympathetic मज्जातंतू प्रणालीला उद्दीपित केले जाते त्यामुळे जेंव्हा कोणी खूप मोठ्या तणावाला सामोरा जातो तेव्हा  त्याला समतोल साधत आतून शांतता लाभू लागते. जेंव्हा Parasympathetic मज्जातंतू प्रणाली कार्यरत होते तेंव्हा रक्तप्रवाह, अंतःस्रावी ग्रंथी, पचन संस्था आणि इतर अवयवांकडे पाठविला जातो, परिणामी वाढलेले हृदयाचे ठोके साधारण होऊ लागतात आणि रक्तदाब ही कमी होऊ लागतो.

रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य सुधारते I Improves Immunity Function

योगामुळे कॉर्टिसोल हार्मोन्स घटू लागतात. कॉर्टिसोल वाढल्यास आपली अंतर्गत सुरक्षा यंत्रणा(पांढऱ्या रक्तपेशी) निष्प्रभ होत रोग प्रतिकारशक्ती मंदावते. योगामुळे कॉर्टिसोलची निर्मिती नियंत्रित करून रोगप्रतिकारशक्ती वाढविली जाते.

व्यसनाधीनता दूर होते I Cures Addiction

डोपामाईन हे मेंदूतील एक रसायन आहे, ज्यामुळे मादक द्रव्याच्या सेवनाने मिळणारी तृप्तीची भावना अनुभवास येते.तेच रसायन योगामुळे शरीरात निर्माण झाल्याने,मादक द्रव्याची गरज पडत नाही. योगामुळे डोपमाईनच्या त्या स्तराची तृप्ती लाभते  आणि व्यसनासाठीची तृष्णा आपोआपच कमी होते.

मेंदूचा आकार वाढतो I Enlarges the Brain

काही MRI स्कॅन्सचा अभ्यास केल्यावर वैज्ञानिकांच्या लक्षात आले कि योग करणाऱ्या लोकांमध्ये ग्रे मॅटर (मेंदूच्या पेशी)चे प्रमाण योग न करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. संशोधनात आढळून आले कि एका सप्ताहाच्या काळात योगाच्या

योग करण्याचा काळ जसा वाढत गेला तसे मेंदूचा विशिष्ट भाग आकाराने तेवढा मोठा होत गेला. त्यावरून निष्कर्ष असा निघतो कि मेंदूचा आकार मोठा होण्यात योगाचा हातभार नक्कीच आहे.

योगी लोकांत मेंदूचा विशिष्ट भाग मोठा असतो ज्यात आपल्या मानसिक स्तरावरील आराखडा असतो, जो सजगता वाढवतो, तणाव कमी करण्यात निर्णायक ठरतो आणि स्वत्वाची जाणीव करून देतो.

वर्तमानात राहण्यास मदत करतो I Helps Stay in the Present

योगामुळे वर्तमान क्षणाप्रती सजगता वाढते आणि नकारात्मक विचारांबद्दल जागरूक होऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत स्वतःला संभाळून घेण्याची प्रवृत्ती विकसित होते.

योग मुद्रा I Yoga Mudras

योगमुद्रा ही हातांच्या बोटांची विशिष्ट स्थिती आहे ज्यामुळे शरीर आणि मेंदूतील ठराविक भाग उत्तेजित होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तान्ही मुलं आपोआप स्वतःच सुप्त प्रेरणेने ह्या मुद्रा करतात असे आढळून आले आहे.

आदि मुद्रा : नुकतेच जन्मलेले मुल आपले अंगठे तळहातात दुमडून असतो आणि त्याची इतर बोटे त्याभोवती आवळत मुठ तयार होते. हीच आदिमुद्रा होय ज्यामुळे मज्जा प्रणालीला विश्राम मिळतो, डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो आणि फुफ्फुसांची क्षमता वाढते.

चिनमुद्रा : जेंव्हा बाळ झोपतं तेंव्हा तर्जनीचे टोक अंगठ्याच्या टोकाला जुळलेले असते आणि इतर बोटे बाहेर उघडलेली असतात. हि चिनमुद्रा आहे, ज्यामुळे झोपेचा आणि विश्रांतीचा स्तर सुधारतो. शरीरात उर्जा वाढते, पाठीच्या कण्याच्या खालच्या भागातील वेदना कमी होते.

मेरुदंड मुद्रा : जेंव्हा बाळ आपला अंगठा चोखते तेंव्हा अंगठा वरच्या दिशेला असतो आणि इतर बोटे दुमडलेली असतात. हि मेरुदंड मुद्रा आहे ज्यामुळे शरीराच्या मधल्या भागात ऊर्जा प्रवाह वाढतो.

 

प्रथमदर्शनी योग जरी शरीर वाकवणाऱ्या काही व्यायामासारखा वाटत असला तरी जेंव्हा तुम्ही आपल्या शरीराला विशिष्टपणे पीळ देता आणि सजगतेने श्वास घेत असता तेंव्हा अंतर्गत स्तरावर बरेच काही घडत असते. तसेच योग म्हणजे चटईवर करण्याचा काही आसनांचा संच नव्हे तर ती एक जीवनशैली आहे. निरोगी शरीर आणि शांत मन असल्यास आनंदी व तणावमुक्त आयुष्य जगणे सहज शक्य होते.छान वाटतंय नां ऐकायला? पण लगेच कठीण आसने आत्मसात करण्याची घाई करू नका.प्रथम तुम्ही खात्री करून घ्या की श्री श्री योग प्रशिक्षकासारख्या प्रमाणित तज्ञाकडूनच योग शिकत आहात आणि दीर्घ काळाचे फायदे घेण्यासाठी नियमितपणे सराव करा.