योगाच्या सहाय्याने सशक्त बना I Build your Strength with Yoga

बहुदा जेंव्हा योगासनांबद्दल विचार येतो तेंव्हा डोळ्यासमोर आपले अंग गाठ मारल्यागत पिळवटलेले किंवा समोर वाकून पायाच्या अंगठ्यांना अलगत स्पर्श करणारा योगी असे तेच ते एकसुरी चित्र तरळू लागते. परिणामी योगाची सुरुवात करणाऱ्या बहुतेकांची चुकीची धारणा बनते की योग करण्यासाठी आपण लवचिक असायला हवं. अर्थात योग करताना लवचिकता मदतीस येतेच पण खरी गरज असते तसेच योगामुळे लाभते  ती आहे ताकत. आसन पूर्णत्वास नेण्यास, त्यात समरस होण्यास लवचिकता आणि ताकत ह्या दोहोंचे योगदान असते.

योग करताना आपण शरीराच्या मध्यभागातील, आपणास शक्ती प्रदान करणाऱ्या आतल्या मुख्य स्नायूंचा वापर केल्याने योगातून लाभणाऱ्या सामर्थ्याचे खूप महत्व आहे. योगाच्या परिभाषेत त्याला ‘बंध’ असे म्हणतात. बंध म्हणजे स्नायूंचे आकुंचन आणि ऊर्जेची कोंडी करणे. या बंधांचा आपण सराव करू आणि त्यांचा वेळ वाढवू तसे आपली साधना अधिक स्थिर आणि केंद्रित होऊ लागते आणि आपला अहंकार कमी होण्यास मदत होते. प्रत्येक आसनात तोल सांभाळताना, पीळ देताना, उलट्या स्थितीत आणि अर्थातच पोटाच्या स्नायूंना बळ देणाऱ्या आसनांत शरीराच्या मध्य भागाचा वापर होतो.

साधारणतः योग करणाऱ्या पुरुषांना लवचिकतेची गरज भासते कारण ताकत त्यांच्यात असतेच. तर स्त्रिया थोड्या लवचिक असतात पण त्यांना स्नायूंच्या बळकटतेची गरज भासते. नियमित आणि शिस्तबद्ध योग सरावाने या सर्व बाजूंनी प्रगती साधणे शक्य होते. जिममध्ये जाऊन मेहनत घेण्यापेक्षा, योगामध्ये आसनांत स्थिर राहण्याचा  कालावधी हळूहळू वाढवत नेत आणि श्वासाची जोड देत स्नायूंना बळकटी देता येते. स्नायूंची ताकत वाढविण्यासाठी जिमसारखी वजने आणि मशीनचा वापर करण्याऐवजी योगामध्ये आपले वजन आणि शरीराचाच उपयोग केला जातो, जे जिम साहित्याचा वापर करण्यापेक्षा जास्त आव्हानात्मक आहे.

योग सरावाची सुरुवात साधारणतः सूर्य नमस्कार सारख्या वॉर्म अप व्यायामांनी केली जाते ज्यामुळे शरीराची उष्णता वाढू लागते आणि रक्त गतीने वाहू लागते. नंतर आसनांची सुरुवात पायांच्या स्नायूंना कार्यरत करीत (त्यात शरीराचे मध्यातील स्नायू सुद्धा येतात) उभ्या स्थितीतील आसने, समोर झुकणे (पाय, पाठ आणि मध्यातील स्नायूंसाठी), मागे वाकणे(हात, खांदे, पाय आणि मध्यातील स्नायू) आणि उलट्या स्थितीतील आसने (संपूर्ण शरीर) या क्रमाने होते. ह्या सर्व आसनांत स्नायूंच्या उती गहिऱ्या स्तरावर कार्यरत होत आपणास ऊर्जा, लवचिकता आणि ताकत मिळवून देतात.

योगाचा प्राचीन आणि श्रेष्ठ ग्रंथ पतंजली योगसूत्र मध्ये महर्षी पतंजलींनी सांगितले आहे, 'स्थिरम् सुखम् आसनम्' (योगासने स्थिर आणि सुखदायी असावीत). म्हणूनच आसन करताना आपण जास्त ताण दिला आणि ते आसन अस्थिर होऊ लागले (जेंव्हा स्नायू तेवढे तयार आणि मजबूत नसतील) तेंव्हा आपण थोडे सैल होत स्थिर व्हावे जेणेकरुन आसनात तुम्ही सहज आणि आनंददायक स्थितीत स्थिर रहाल. आसनांच्या नियमित सरावानंतर आपले शरीर सशक्त होते, शरीर खुलू लागते आणि आपली क्षमता वाढू लागते.

काही दिवसांच्या चिकाटीनंतर शरीर अधिक प्रबळ आणि लवचिक झालेले जाणवू लागेल. जसजसे आपले शरीर मजबूत होऊ लागते आपले मनही सक्षम आणि कणखर बनू लागते. मग आपण प्रापंचिक घटना आणि बिकट परिस्थितीने सहजासहजी विचलित होणार नाही.

म्हणून सशक्त शरीर आणि मनाची गुरुकिल्ली : रोजचा योग सराव आणि संयम ठेवत अजून प्रगत आसनात हळुवार, क्रमाक्रमाने आणि गहनपणे उतरत राहणे.

हा लेख मीना एर्सेल यांनी लिहिला आहे.​

१९९९ मध्ये न्यूयॉर्क शहरात आर्थिक व बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना योगाची आवड निर्माण झाली. २०१० मध्ये टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम केल्यानंतर त्या तुर्कस्तान व इतर देशांत योग शिकवित आहेत. तसेच त्या आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात. दर सप्ताहाला इंटरनॅशनल न्यूयॉर्क टाईम्सच्या तुर्कस्थान आवृत्तीत लिखाण करतात. तसेच त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 'हॅपिनेस प्रोग्रॅम'च्या टीचर आहेत.

योगाच्या सरावामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होत असले तरी ते कोणत्याही औषधोपचारासाठी पर्याय होऊ शकत नाही. श्री श्री योगा प्रशिक्षकाच्या कुशल मार्गदर्शनाखालीच योगासने शिकणे आणि सराव करणे गरजेचे आहे. काही आरोग्याच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांच्या आणि श्री श्री योगा प्रशिक्षकांच्या सल्ल्याने योग सराव सुरु करावा. तुमच्या जवळच्या ‘आर्टऑफ लिव्हिंग’ केंद्रात ‘श्री श्री योगा’ कार्यक्रमाबद्दल विचारणा करा. इतर माहिती आणि आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी आम्हाला info@srisriyoga.in वर संपर्क करा.​

शांत आणि सक्षम मनासाठी सुदर्शन क्रिया I Sudarshan Kriya for a stronger and calmer mind

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ च्या हॅपिनेस प्रोग्रॅमचा मुख्य भाग म्हणजे मन निरोगी आणि आनंदी ठेवणारे शक्तिशाली गुपित आहे – ‘सुदर्शन क्रिया योग’. ही एक सोपी पण शक्तिशाली श्वसन प्रक्रिया आहे ज्याच्या सहाय्याने मनातील ताणतणाव आणि नकारात्मक भावनांपासून मुक्ती मिळते. आणि दैनंदिन परिस्थितीस सामोरे जाण्याची क्षमता प्राप्त होते. योग, ध्यान, प्राणायाम आणि निरामय जीवन प्राप्त करून देणाऱ्या आणि परस्पर नाते संबंध सुधारण्यासाठी गरजेच्या विशेष प्रक्रिया हॅपिनेस प्रोग्रॅममध्ये आहेत ज्यांचा लाभ जगभरातील करोडो लोकांना होत आहे.​

I want to stay Happy!