ध्यानासाठी कुठल्या योगासनात बसावे?

"तुम्हाला एका पायावर उभे राहून ध्यान करायचे असेल तर तेही चालेल." दिनेश घोडके, आर्ट ऑफ लिव्हिंग चे ज्येष्ठ शिक्षक, त्यांनी हसत या प्रश्नाला उत्तर दिले. "कुठलेही आसन ज्यामध्ये तुम्ही आरामात आहात आणि स्थिर राहू शकता, अशा आसनात तुम्ही ‌ध्यान करु शकाल. पातंजली योगसूत्र, योगासनावरील प्राचिन ग्रंथांमध्ये "स्थिरम् सुखम् आसनम्" असे योगासनाचे वर्णन केले आहे, म्हणजेच आसन तेच, जे स्थिर आहे आणि आरामदायक आहे.”

तुम्हाला एका जागी बसायला खूप अस्वस्थ वाटते का?

खालीलपैकी एक किंवा अधिक गोष्टी एकत्र करून बघा.

रोज ७ मिनिटे सूक्ष्म योग करा. हे तुम्ही खुर्चीवर बसून पण करु शकता.

तुमच्याकडे वेळ आणि जागा असेल तर योगामॅट पसरुन पद्मसाधना करू शकता.

त्यानंतर नाडी शोधन प्राणायाम (आलटून पालटून ‌प्रत्येक नाकपुडीने श्वास घेणे)

उत्साहवर्धक ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया

आरामात बसा पण शिथिल नको

एकदा एक आगाऊ विद्यार्थी म्हणाला की त्यांच्यासाठी सर्वात स्थिर आणि आरामदायक आसन म्हणजे वेफर्सचा पुडा घेऊन टिव्हीसमोरच्या कोचावर आडवे पडून राहाणे. अशा प्रकारे ध्यान होणार नाही. शवासनातसुद्धा योगनिद्रा होते, ध्यान नाही.

बरेच लोकं ध्यानाला बसण्यासाठी योगासनांची निवड करतात, जसे की पद्मासन, वज्रासन आणि सुखासन.या आसनामुळे पोटावरील दाब कमी होतो आणि पाठ सरळ राहते. या आसनांचे वर्णन पुढे दिलेले आहे. शरिर, खांदे व मान सैल सोडा आणि पाठ व डोके सरळ ठेवा.

ध्यानासाठी योगासन निवडा.

सुखासन

मांडी घालून बसा

हाताचे कोपरे शरीराच्या जवळ आणा.

हात गुडघ्यावर, तळवे आकाशाकडे उघडलेले

पाठीचा कणा ताठ, डोकं सरळ

"सुख" म्हणजेच आनंद. चेहऱ्यावर हास्य ठेवायला विसरू नका. मांडी घालता येत नसेल तर खुर्चीवर बसून ध्यान करा.

तुम्हाला हवे तर भिंतीला टेकून बसू शकता.

सुखासनाचे अधिक फायदे जाणून घेण्यासाठी वाचा. खाण्याची योग्य पद्धत.

पद्मासन

हे अतिशय लोकप्रिय आणि सर्वांना माहीत असलेले आसन आहे. या आसनात पाठीचा कणा ताठ रहात असल्यामुळे हे तुमचे सर्वात आवडते आसन बनू शकते.

बसा आणि तुमचे दोन्ही पाय सरळ पसरा.

उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीवर ठेवा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवून डावे पाऊल उजव्या मांडीवर ठेवा.

टाचा आकाशाकडे. हाताचे तळवे गुडघ्यावर, आकाशाकडे उघडलेले. पाठीचा कणा ताठ आणि डोकं सरळ.

वज्रासन

गुडघे एकमेकांना चिकटतील अशा प्रकारे गुडघ्यावर बसा.

तुमच्या पावलांमुळे जी रिकामी जागा झाली आहे, त्यात बसा, टाचांवर नाही. पाठीचा कणा ताठ आणि डोकं सरळ.

सूचना: टॉवेलची गुंडाळी किंवा पातळ उशी पायाखाली ठेवा म्हणजे घोट्याना आधार मिळेल.

वज्रासनामुळे मांड्या आणि पिंढऱ्यांच्या स्नायूंना बळकटी मिळते. पचनशक्ती सुधारते.

चला, आता आपण योगासनात बसूया आणि ऑनलाईन मार्गदर्शक ध्यान लावून सूचनांचे पालन करुया.

(श्री श्री रविशंकर यांच्या ध्यानाची रहस्ये या व्याख्यानांवर आधारित)