योगासाठी योग्य कपडे निवडण्याच्या सूचना | Yoga Wear | Secrets for choosing the right yoga clothes

योग करताना घालण्यासाठी वस्त्रे निवडताना मुख्य निकष हाच पाहिजे की योग करतेवेळी ती वस्त्रे परिधान केली आहेत हे देखील लक्षात येत कामा नये. भल्या पहाटे जेव्हा सारं जग निवांतपणे गाढ झोपलेलं असतं तेव्हा तो विशेष वेळ मी 'श्री श्री योगा'ची आसने, प्राणायाम आणि ध्यानासाठी राखून ठेवते. दिवसाचे रुटीन सुरू करण्यापूर्वी हे माझे निवांत दोन तास असतात. योगासाठी कोणती वस्त्रे वापरावीत या साध्या बाबीकडे अगोदरच लक्ष दिल्यास मग योग करतेवेळी सारे लक्ष योगाकडेच केंद्रित करू शकते. नुकतेच सर्वांगासनाची धडपड करतेवेळी माझा टी शर्ट चेहऱ्यावर ओघळत येऊ नये म्हणून तो घट्ट पकडण्याची झोकांड्या घेत केलेली धडपड म्हणजे  फार मजेशीर चित्र होते ते. ह्यावर उपाय म्हणून योगाची वस्त्रे मिळतात त्या दुकानात एक चक्कर टाकण्याचे मी ठरविले. त्या खरेदीसाठी काही गोष्टी मी ध्यानात ठेवल्या.

सूचना # १ : स्वतःचा विचार करा | Be yourself

योगाचा सराव हा इतर व्यायामापेक्षा पूर्णतः वेगळा आहे. आपल्या कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आहे. इतरांची मते ग्राह्य धरायची तसेच सौंदर्य मानदंडाचा विचार करण्याची गरज नाही. योग ही स्वतःला जाणून घेण्याची प्रक्रिया आहे. हा प्रवास सारखाच वाटत असला तरी अशी वस्त्रे घाला की ज्यामुळे तुम्हाला स्वतःला छान आणि हलके फुलके वाटायला हवं, आनंद वाटायला हवा.

सूचना # २ : अंगावर चपखल बसणारी आणि सहज हालचाल करता येईल असे कपडे निवडा | Choose yoga wear that hugs your body shape, and allows for easy movement

योगा टॉप्स : योगासाठी अशी वस्त्रे निवडा जी आरामात अंग झाकतील आणि अवास्तव प्रदर्शन करणार नाहीत. योग करताना आपले कपडे वारंवार ओढून खाली खेचण्याची पाळी यायला नको. स्त्री पुरुष दोघांसाठी ताणले जाणारे सुती मिश्रणाचे टी शर्ट जे शरीरावर चपखल बसतील हा उत्तम पर्याय आहे. ढगळ कॉलर किंवा गळा असलेले शर्ट टाळायला हवे, कारण उलट्या स्थितीतील आसने करताना ते त्रासदायक ठरू शकतात, जसे माझ्या सर्वांगासनाच्या वेळी झाले. महिलांनी ब्रा ची पट्टी अडकवता येतील असे टॉप्स निवडावेत.

योगासाठी विजार : योगासाठीची विजार कंबरेला इलॅस्टिक पट्टी असणारी आणि शरीराला चपखल बसणारी हवी. स्त्रियांसाठी योगाची विजार जास्त आरामदायी आणि सहज हालचालीसाठी दुमडलेल्या कंबरपट्टी सहित उपलब्ध असते. कॅप्री सारख्या विजारी स्त्री पुरुष दोघांतही लोकप्रिय आहेत. सर्फिंग करणाऱ्यांना वेगळ्या विजारी विकत घेण्याची गरज नाही. सर्फर्स बीचवर घालतात त्या पुरुषांच्या बोर्ड शॉर्ट्स भरपूर लांब असतात आणि दिसतात ही छान.

स्टायलीश व्हा : पर्यावरण प्रेमी योगींसाठी सुती, बांबू आणि लिनन सारख्या नैसर्गिक सुतांचे कपडे मिळतात. हलक्या आणि मातकट रंगाचे कपडे योगाच्या झेन इफेक्ट सोबत छान जुळवून घेतात. फॅशन क्षेत्रातील मान्यवरांसाठी योगाचे कपडे विविध नक्षी आणि कशीद्याच्या डिझाईनमध्ये मिळतात.

कोणते कपडे टाळावेत : खालील कपडे टाळल्यात तर योगाचे नवसिखे देखील अनुभवी योग्यांप्रमाणेच सहजपणे सराव करू शकतात. जास्त ढगळ पॅन्ट घसरू शकते आणि योगासने करताना अडथळा आणू शकतात. नाड्याच्या विजारी पोटावर लेटता तेव्हा गैरसोयीच्या ठरतात. शॉर्ट्स घालणे टाळा कारण उलट्या स्थितीतील आसने करताना त्या गोळा होतात.

सूचना # ३ : योगा क्लासच्या थंड वातावरणासाठी शॉल जवळ असू द्या | Layering your yoga clothing beats yoga class microclimates.

पहाटेच्या वेळी योगा करताना वॉर्मअप पूर्वी तसेच योगा केल्यावर ध्यानात जाताना सुद्धा गारवा जाणवू शकतो. कधीकधी योगा क्लासेस एसी हॉलमध्ये घेतले जातात. तेव्हा गारठ्याचा त्रास टाळण्यासाठी योगाचे कपडे एकावर एक वापरावीत म्हणजे उबदार वाटेल. झिप जॅकेटवर घेतलेली उबदार शॉल हाताळायला आटोपशीर असते. तसेच त्या शॉलचा दुहेरी उपयोग होईल योगनिद्रेच्या वेळी अंगावर ओढून घेण्यासाठी. आहे नां बहु उपयोगी?

सूचना # ४ : योगा मॅट आणि योगा कपडे आत्ता ऑफिसमध्ये | With some skillful planning, yoga clothes can go from the yoga mat to the office.

योगामुळे तणाव दूर होऊन कार्यक्षमता वाढते हे सर्वाना ज्ञात आहे. बऱ्याचशा कामाच्या ठिकाणी योगा करविला जातो. तिथे त्या कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान आणि उत्पादकता वाढल्याचे ध्यानात येऊ लागले आहे. पण त्यांनी तुमच्या योग पँटसकडे लक्ष देऊ नये. ऑफिस मध्येही घालता येतील अशा योगा पॅन्ट आता स्त्रिया वापरू लागल्या आहेत.

घरूनच काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी, जे नियमितपणे योगाचा सराव करतात, त्यांना आता जाणवू लागले आहे की मिटिंगला, खरेदीला जाताना किंवा मुलांना शाळेतून घ्यायला जाताना योगा पॅन्टस हा उत्तम पर्याय आहे. फॅशनच्या काही साध्या बाबींचा वापर करीत सूचना क्र. २ मध्ये सांगितल्याप्रमाणे योगा पॅन्टसचे ऑफिसमध्ये घालण्यालायक स्थित्यंतर झाले आहे. योगाक्लासच्या बाहेर योगा पॅन्टसचा लेगिन्स म्हणूनही वापर होऊ शकतो. विणलेल्या धाग्यांच्या किंवा जाड इलॅस्टिक कापडाच्या बनलेल्या योगा पॅन्टस ऑफिसमध्ये सहजपणे घालून जाऊ शकता. अगदी मांड्यापर्यंत येईल असा लांब टॉप घातला की झाले. कॉटन, लिनन किंवा सिल्कचे ट्युनिक सुद्धा शोभून दिसतील.

मी अगोदर शॉलचा उल्लेख केला होता ते ध्यानात आहे नां? ऑफिसला जाताना तुमची सर्जनशीलता वापरत आपल्या फॅशन सेन्सला शोभेल अश्या रीतीने तिला उपयोगात आणा. एखादा दागिना, सपाट चपला किंवा बुट आणि योगाक्लास नंतर ऑफिसच्या मिटिंगसाठी लगेच तयार.

 (मेरिलीन ही योग अनुयायी असून तिला योगासनांबद्दल आणि अध्यात्माबद्दलची आपली प्रेरणा लेखांतून आणि कलेतून सादर करायला आवडते.)

प्रभावी योग सरावाबद्दलच्या सूचनांसाठी इथे अधिक माहिती मिळेल.