भोवळ (व्हर्टिगो) बरे करण्यासाठीचा योगोपचार

भोवळ येणे किंवा व्हर्टिगो म्हणजे नक्की काय?

भोवळ किंवा व्हर्टिगो हे चक्कर येण्याचे लक्षण आहे. मेंदूच्या समतोल आणि स्थिरतेमध्ये गडबड किंवा बिघाड झाल्यामुळे जी संवेदना तयार होते त्यामुळे भोवळ येते म्हणजेच व्हर्टिगोचा त्रास होतो. भोवळ येण्यामुळे कानाच्या आतील एक भाग जो कॅल्शियमपासून किंवा द्रव पदार्थापासून बनलेला असतो आणि जो गती व हालचाल यांवर लक्ष ठेवतो, त्याला अपाय होतो. परंतु, ठराविक योगासनांचा अभ्यास केल्यामुळे स्थिरता आणि समतोल यांमध्ये सुधारणा होऊन मज्जासंस्था उत्तेजित होते आणि भोवळ येणे किंवा व्हर्टिगो शरीरामधून समूळ नाहीसा होतो.

व्हर्टिगोची कारणे आणि लक्षणे

व्हर्टिगो हा प्रामुख्याने कानाच्या आतमध्ये पुरेसे रक्तप्रवाह न झाल्यामुळे उद्भवतो. कधीकधी साध्या थंडीतापाचे सामान्य विषाणूसुद्धा कानाच्या आतील भाग जो मेंदूपर्यंत जोडलेला असतो, त्यांवर हल्ला करतात आणि त्यामुळे भोवळ येण्याची शक्यता असते. माणसाच्या कवटीला कोणतेही नुकसान झाल्यामुळेसुध्दा मळमळ आणि श्रवणशक्ती गमावण्यापर्यंत हानी होऊ शकते. विशिष्ट खाद्यपदार्थ किंवा हवेमधील विनाशकारी कण (उदा. धूळ) यांची ज्यास ऍलर्जी आहे त्यास त्यामुळेदेखील भोवळ येऊ शकते. मज्जासंस्थेशी निगडीत असलेल्या आजारामुळेंसुद्धा समतोलावर परिणाम होऊन भोवळ येणे किंवा व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो.

योगासने ही भोवळ किंवा व्हर्टिगो येण्यासंदर्भातील आजारांमध्ये फायदेशीर आहेत का?

निवडक योगासने ही मज्जासंस्था आणि कानामधील संतुलन साधण्यासाठी जी केंद्रे किंवा अवयव असतात त्यांना कार्यक्षम करण्यासाठी मदत करतात. योगासने मज्जासंस्थेवरही थेट परिणाम करून डोके आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. मेंदूच्या पेशींमध्ये निरोगी, शुद्ध रक्तप्रवाहचा शिरकाव करणे हे बरे होण्याच्या प्रक्रियेचा सार आहे. मज्जासंस्थेला उत्तेजन देणारी आणि मेंदूकडे शुद्ध रक्त घेऊन जाणारी योगासने व्हर्टिगोसाठी अतिशय इष्टतम आहेत.

व्हर्टिगोच्या रुग्नांसाठी फायदेशीर योगासने

१. षण्मुखी मुद्रा

२. नाडीशोधन प्राणायाम

३. सालम्ब शीर्षासन

४. हलासन

५. पश्चिमोत्तानासन

६. शवासन

षण्मुखी मुद्रा: ही मुद्रा मेंदू आणि मज्जासंस्था यांना आराम देऊन चिंता, चिडचिड किंवा राग रोखण्यासाठी आणि कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. त्याचप्रमाणे डोळे आणि चेहऱ्यावरील शिरांना आराम देऊन पुनरुज्जीवन करते.

नाडीशोधन प्राणायाम: हा प्राणायाम रक्त आणि श्वसनप्रणालीला शुद्ध करतो. दीर्घश्वासामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळून श्वसनप्रणाली मजबूत होते आणि मज्जासंस्था संतुलित होते.

सालम्ब शीर्षासन: या आसनामुळे अवयवांवर गुरुत्वाकर्षणाच्या उलट वेगाच्या परिणामामुळे यकृत, मूत्रपिंड, पोट, आतडे आणि पुनरुत्पादक अवयवांच्या समस्यांवर मात करण्यास  मदत होते. व्हर्टीगो बरा करण्याशिवाय, काही काळ सराव केल्यावर ते पिट्यूटरी आणि पाइनलग्रंथींना देखील उत्तेजित करते. या ग्रंथी वाढीस आणि सेक्स हार्मोन्सच्या निर्मितीस मदत करतात. 

हलासन: हलासन मान, खांदे, अंगावरील आणि मागच्या स्नायूंना बळकट आणि खुले करते. हे आसन मज्जासंस्था शांत करते, तणाव कमी करते आणि थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. हे रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना मदत करते.

पश्चिमोत्तानासन: हे आसन तणावमुक्ती म्हणून कार्य करते आणि चिंता, क्रोध आणि चिडचिडेपणा दूर करते. हे मासिक पाळीचे संतुलन राखते आणि विशेषत: प्रसूतीनंतर स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

शवासन: या आसनामुळे सखोल आणि ध्यानासारखी आरामदायी विश्रांती मिळते, जी पेशींच्या दुरुस्तीमध्ये आणि तणाव दूर करण्यास मदत करू शकते. हे आसन रक्तदाब, चिंता आणि निद्रानाश कमी करण्यास देखील मदत करते.

व्हर्टीगोपीडित व्यक्तींसाठीचे पथ्य 

सामान्यत: व्हर्टीगोपीडित व्यक्तींनी पुढे, खाली वाकून करण्याऱ्या क्रिया टाळाव्यात किंवा सावधानतेने कराव्यात. त्याचप्रमाणे हा आजार असणाऱ्या व्यक्तींनी योगासनांचा अभ्यास हळू हळू चालू करावा. 

अंतिमतः, मेंदूच्या पेशींमध्ये निरोगी, शुद्ध रक्तप्रवाह जाणे हा व्हर्टीगो बरा होण्याच्या प्रक्रियेचा सार आहे. ज्या व्यायामामुळे मज्जासंस्था उत्तेजित होते आणि मेंदूकडे जाणारे रक्त शुद्ध होते असे व्यायामाचे किंवा आसनांचे प्रकार करणे हा सर्वात उत्कृष्ट उपाय आहे.