पुर्वोत्तानासन | Upward Plank Pose (Poorvottanasana)

पुर्वोत्तानासन – याचा शब्दशः अर्थ पूर्व दिशेकडे करावयाचे आसन असे जरी असले तरी त्याचा अर्थ पूर्व दिशेकडे द्यावयाचा ताण आसन असा होत नाही. पुर्वोत्तानासन म्हणजे आपल्या सूक्ष्म प्राण शक्तीला ऊर्ध्व म्हणजे पुढील बाजूस वाहते करणे असा होतो.

 

पुर्वोत्तानासन कसे करावे | How to Practice the Upward Plank Pose

  • दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करत, सरळ, पुढे, ताठ करून बसुया. पाठीचा कणा ताठ असू द्या.
  • दोन्ही हात कंबरेच्या किंवा खांद्याच्या रेषेत जमिनीवर ठेवूया. बोटे बाहेरच्या बाजूला असुद्या. हात ताठ.
  • मागे झुकून शरीराचे वजन हातांवर टाकूया.
  • श्वास घेत कंबर वर उचलुया, संपूर्ण शरीर ताठ करूया.
  • गुडघे ताठ असुद्या. पायाचे तळवे जमिनीला चिकटवूया. आत्ता डोके जमिनीकडे सैल सोडूं देऊया.
  • अंतिम स्थितीत स्थिर राहून श्वसन सुरु ठेऊया.
  • श्वास सोडत परत आरामात बसुया.
  • आत्ता हाताची बोटे आतल्या बाजूला करून हे आसन परत करूया.

पुर्वोत्तानासनाचे लाभ | Benefits of the Upward Plank Pose

  • मनगटे, हात, खांदे, पाठ आणि पाठीचा कणा मजबूत बनतो.
  • पाय आणि कंबरेला ताण बसतो.
  • श्वसन संस्था सुधारते.
  • पचन संस्था आणि पोटातील अवयवांना ताण मिळतो.
  • थॉयराईड ग्रंथींचे स्त्रवणे सुधारते.

पुर्वोत्तानासन कोणी करू नये | Contraindications of the Upward Plank Pose

  • या आसनामध्ये शरीराचा संपूर्ण भार हात आणि मनगटांवर येत असल्याने मनगटांमध्ये काही व्याधी असतील तर हे आसन करू नये. ज्यांच्या मानेमध्ये काही दुखापत आहे अश्यानी हे आसन करू नये किंवा आसन करताना खुर्चीचा आधार घ्यावा.

 

योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने  योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी  info@srisriyoga.in या संकेतस्थळावर भेट द्या.

 

 

 

Interested in yoga classes?