पश्चिम नमस्कारासन | Reverse Prayer Pose (Paschim Namaskarasana)

पश्चिम नमस्कारासन या आसनामुळे शरीराचा वरचा भाग विशेषतः हात आणि पोट बळकट होतात. याला विपरीत नमस्कारासन देखील म्हणतात.

पश्चिम नमस्कारासन कसे करावे | How to do Reverse Prayer PoseReverse Prayer Yoga Pose - Paschim Namaskarasana Yoga Pose

  • प्रथम ताडासन करावे.
  • खांदे सैल करा आणि गुडघे थोडे वाकवा.
  • दोन्ही हात मागे घेऊन बोटे खाली असलेल्या स्थितीत तळहात एकमेकांना चिकटवा.
  • श्वास घेत बोटे पाठीकडून वळवून वरच्या दिशेला करूया.
  • गुडघे वाकलेले आणि तळहात एकमेकांना व्यवस्थित चिकटलेले आहेत नां, इकडे लक्ष द्या.
  • दीर्घ श्वास घेत या स्थितीत स्थिर राहूया.
  • श्वास सोडत बोटे खाली वळवूया.
  • हळुवार हात शरीराशेजारी नेऊन ताडासनात उभे राहूया.

पश्चिम नमस्काराचे लाभ | Benefits of the Reverse Prayer Pose

  • पोटातील स्नायू खुलतात, त्यामुळे श्वास दीर्घ बनतो.
  • पाठीच्या वरच्या भागाला ताण मिळतो.
  • खांद्याचे सांधे आणि छातीच्या स्नायूंना ताण मिळतो.

पश्चिम नमस्कार कोणी करू नये | Contraindications of the Reverse Prayer Pose

ज्यांना कमी रक्त दाबाचा त्रास आहे तसेच हात आणि खांद्यांमध्ये काही दुखापत असल्यास हे आसन करू नये.

 

योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने  योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी या  info@srisriyoga.in या संकेत स्थळावर संपर्क करा.