गरुडासन | Eagle pose

 

Garudasana Yoga Pose - Eagle Yoga Pose

गरुडासन कसे करावे | Eagle Pose

  • सुरवातीला ताडासानात उभे राहावे.
  • गुडघ्यात वाकून डावा पाय उचलून उजव्या पायाला विळखा घाला.
  • खात्री करा कि उजवा पाय जमिनीवर स्थिर आहे आणि डावी मांडी उजव्या मांडीवर आहे. डाव्या पायाच्या पंजाचे टोक जमिनीकडे असावे.
  • दोन्ही हात जमिनीला समांतर असतील असे वर घ्या.
  • उजव्या हाताने डाव्या हाताला विळखा घाला आणि कोपरात घडी घालून हात जमिनीला काटकोनात स्थिर करा.
  • हात हळुवार असे फिरवा कि तळहात एकमेकासमोर येतील.
  • तळहात चिकटून ठेऊन बोटे वरच्या दिशेला ताणवा.
  • एका जागेवर नजर स्थिर करून दीर्घ श्वसन घेत आसनात स्थिर राहूया.
  • हात सैल करून सोडून शरीराशेजारी ठेऊया.
  • डावा पाय सैल करून जमिनीवर ठेऊया, ताडासनात उभे राहूया.

 

गरुडासनाचे लाभ | Benefits of the Eagle PoseGarudasana Yoga Pose - Eagle Yoga Pose

  • खांदे, वरची पाठ, कंबर आणि मांड्या यांच्यामध्ये ताण निर्माण होतो.
  • शरीराचा तोल सुधारतो.
  • पिंढरी मजबूत बनतात.
  • सायटिका आणि संधिवात कमी होण्यास मदत होते.
  • पाय आणि मांड्या सैल होतात, लवचिक बनतात.

 

गरुडासन कोणी करू नये | Contraindications of Eagle Pose

अलीकडे गुडघे, घोटे तसेच कोपरांची शस्त्रक्रिया झाली असल्यास हे आसन करू नये.

 

योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने  योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी  info@srisriyoga.in या संकेतस्थळावर भेट द्या.