मजबूत मनगटे आणि हातांसाठी योगा | Yoga for Stronger Arms and Hands in Marathi

एखादा दिवस तरी आपण आपल्या दोन हातांशिवाय विचार करू शकतो? नाही नां! सकाळी दात घासण्यापासून स्वयंपाक बनवेपर्यंत, दरवाजा उघडण्यापासून ते कंप्युटरवर टाईप करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण हातांचा वापर करतो. तुमचे दोन हात तुमच्यासाठी इतकं काही करतात,मग त्यांची काळजी घेणे तुमची जबाबदारी आहे नां.

मजबूत हातांसाठी कोणती योगासने करायची हे आपण पूर्वीच पाहिले आहे. मनगटे आणि हातांना अधिक ऊर्जा मिळण्यासाठी आम्ही अजून काही योग मुद्रा सांगतो आहोत त्या खालील प्रमाणे:

आपल्या रोजच्या कामातून पाच दहा मिनिटांची विश्रांती घेऊन तुम्ही सुक्ष्म योगा मुद्रा करु शकता. यांच्या सहाय्याने ज्या अवयवांचा व्यायाम कराल त्या भागात रक्त संचार वाढेल.

या मुद्रेमुळे खांद्याचे सांधे आणि छातीचे स्नायूंना ताण मिळून ते मजबूत बनतील. या मुद्रेमुळे शरीराचा वरचा भाग अधिक मजबूत बनेल.

 

 

मकर अधोमुख श्वानासन | Makara Adho Mukha Svanasana

या योग मुद्रेमुळे तुमची मनगटे सुदृढ बनतील. जेंव्हा आपण आपला सर्व भार मनगटांवर टाकतो तेंव्हा ती मजबूत आणि पुष्ट बनतात.

या मुद्रेचे विविध प्रकार आहेत- गुडघ्यांवर बसून खांदे पसरवायचे. या आसनामुळे खांदे सशक्त होतात. आसनाच्या नावांप्रमाणे या मुद्रेत बसून काही वेळ स्थिर रहा. दीर्घ श्वास घेत रहा. दुसऱ्या पायाने हीच कृती करा.

डॉल्फिन पोज़ | Dolphin pose

हा अधोमूख श्वानासनाचाच दुसरा प्रकार आहे.. डॉल्फिन मुद्रेप्रमाणे आपल्या हातांवर पूर्ण भार टाका. याने बाहू व खांदे सुदृढ बनतील.

हातांचा व्यायाम | Hand exercises

हातांचा व्यायाम केल्याने हातांतील रक्त संचार वाढतो आणि हातातील तणाव नाहीसा होतो. सुरुवातीला हात पसरा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंतवा. हात अशा प्रकारे फिरवा की तळहात छताच्या दिशेने राहातील. हात वेगळे करु नका, तसेच फिरवत रहा. हात जेंव्हा खाली येतील तेंव्हाच त्यांना मोकळे करा. मग तळहात पूर्ववत स्थितीत आणा.

आता हात झटकण्याचा व्यायाम करुया. हात शरीराच्या बाजूला पसरा. हात कोपरात घडी खांद्यावर विश्राम स्थितीत टेकवा. कपालभाति श्वासाबरोबर हात झटका. असे २० वेळा करा.

दंडासन | Dandasana

जेंव्हा एका आसनातून दुसऱ्या आसनात सहजपणे जाऊ शकाल तेव्हा दंडासन करा. दंडासन केल्याने हात आणि खांदे मजबूत बनतात.

योगासन केल्याने शरीर लवचिक आणि मजबूत बनते, मन शांत होते व मूड चांगला राहू लागतो. या साध्या आणि सोप्या योगासनांमुळे मनगटे, हात आणि खांदे सुदृढ बनतात.

योगाभ्यास शरीर व मनासाठी फायदेशीर असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे योग्य ठरेल. जर शारिरीक किंवा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रामध्ये शिकू शकता. जर तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती हवी असल्यास तसेच सूचना द्यायच्या असल्यास info@artoflivingyoga.in या संकेत स्थळावर संपर्क करा.