क्रॉसफिट व्यायाम योगाच्या बरोबर जास्त चांगला (Yoga for crossfit in Marathi)

जिम मधील व्यायाम आता मागे पडला आहे. ‘क्रॉसफिट’ म्हणजे साधारण दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत सुरु झालेला आणि आता जगभरातील लाखो लोक करीत असलेला व्यायामप्रकार. मेहनतीसाठी लागणारा दम वाढवणे आणि कोणतेही शारीरिक आव्हान पेलण्यासाठी तयारी करणे यासाठी अधिक तीव्र असे व्यायामप्रकार एकत्रितपणे करणे या तत्वावर ‘क्रॉसफिट’ चालते. एरोबिक व्यायाम प्रकार, वेट लिफ्टिंग आणि जिमनॅस्टिक्स या सर्वांचा ‘क्रॉसफिट’ व्यायाम सत्रात समावेश असतो.

‘क्रॉसफिट’ मधील मिश्र व्यायाम पद्धतीचा फायदा झालेले अनेकजण त्याच्या परिणामकारकतेची ग्वाही देतात. हा कठोर व्यायाम एक तासाहून कमी वेळ चालतो पण शारीरिक कष्टाची गरज असलेला, त्यातील अति वेगामुळे कवचित कधीतरी इजा पोहोचवणारा असतो. अशा इजांवर मात करण्यासाठी आणि ‘क्रॉसफिट’ पुरेपूर फायदा घेण्यासाठी या व्यायामाच्या आधी आणि नंतर योगासनाचा समावेश करू शकता.

योग ही एक प्राचीन कला आहे, जी शरिराचे अवयव मोकळे करणारी, मन शांत करणारी आणि सर्व गोष्टींकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन देणारी आहे. ‘क्रॉसफिट’ व्यायामात योगाचा सामावेश करण्यामागचा उद्देश हा आहे की तुमच्या शरीराचा ताठरपणा जाऊन ते जास्त लवचिक व्हावे आणि कठोर व्यायाम करण्याआधी मन शांत व्हावे. तुमच्या गावात होणारा श्री श्री योगाच्या कोर्समध्ये तुम्हला आसने शिकून घेता येतील जेणे करून तुमची सहनशक्ती वाढेल आणि व्यायामाचा चांगला अनुभव घेता येईल.

‘क्रॉसफिट’ व्यायाम करण्याआधी खालील साधी सोपी आसने करून आपले शरिर मोकळे करुया.

सूर्य नमस्कार :

 

सूर्य नमस्कारात अनेक आसने असतात ज्यामुळे, पाठीपासून मांड्यांपर्यंत, हातापासून पायापर्यंत शरीरातील वेगवेगळे अवयव मोकळे होतात. ‘क्रॉसफिट’ व्यायाम करण्याआधी सूर्यनमस्कार घालणे खूप फायदेशीर आहे.

अर्ध मत्स्येन्द्रासन: (बसून पाठीच्या कण्याला पीळ देणे)

बसून पाठीला थोडा पीळ देण्याच्या या असनाने पाठीचा कणा लवचिक बनतो आणि छाती फुलते. ‘क्रॉसफिट’ व्यायामाच्या वेळी जेव्हा वजन उचलायचे असते तेव्हा तुमच्या क्षमतेच्या मर्यादा पार करण्यासाठी पाठीतील लवचिकपणाचा उपयोग होतो.

वीरभद्रासन : योद्ध्याप्रमाणे आसन

 

शरीरातील आणि मनातील तणावाचा परिणाम ‘क्रॉसफिट’ व्यायामातील तुमच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. वीरभद्रासन केल्याने ताण निघून जाऊन शरीरातील समतोल वाढतो. तसेच हात, पाय आणि पाठीचा खालचा भाग बळकट होतो.

 

त्रिकोणासन

          

त्रिकोणासनाने पाय, गुढगे, घेते, दंड, आणि छाती बळकट होते. या आस्नाने शारीरिक आणि मानसिक समतोल राखण्यास मदत होते. ‘क्रॉसफिट’ व्यायाम करणाऱ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे.r.

धनुरासन

पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट करणे, हात आणि पायाचे स्नायू मजबूत बनवणे, पाठ लवचिक बनवणे हे या असनाने शक्य आहे. ‘क्रॉसफिट’ व्यायामानंतर येणारा थकवा या असनाने टाळू शकता.

 
६ 

शवासन

 

                           

शवासनात विश्रांती घेण्याने टिश्यू आणि पेशी यांची दुरुस्ती होऊन शरिर आणि मन पुनरूज्जीवित  होते. तसेच चिंता आणि रक्तदाब कमी होतो. ज्यांना ‘क्रॉसफिट’ व्यायाम आवडतो त्यांनी व्यायामानंतर हे आसन नक्की करावे.

योगासने हा क्रॉसफिट व्यायामाला पर्याय नाही पण त्यात भर घालण्यासारखा नक्की आहे. या दोन्ही तंत्रांना एकत्र करण्याने तुमचा दम वाढवणे आणि शरिर मोकळे करणे या दोन्हीसाठी फायदा होतो. लोकांना व्यायामाच्या वेळी होणाऱ्या इजा कमी करण्यासाठी, बऱ्याचशा ‘क्रॉसफिट’ प्रशिक्षण केंद्रात योगासनांचा समावेश त्यांच्या व्यायामात केला आहे..

नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी नाही. श्री श्री योगा प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा  सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबिराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf