योगाभ्यास करा, चांगले धावपटू बना (Best running tips in Marathi)

"कष्ट नाहीत तिथे कशाचीच प्राप्ती नाही !”

सात वेळा मिस्टर ऑलिम्पिया जेते आर्नोल्ड श्वार्झनेगर यांचे एक वाक्य म्हटले जे आपल्या काळात व्यायामाच्या क्षेत्रात कानमंत्र बनले. एका अर्थी ते योग्यच आहे, पण कष्ट खरोखर महत्वाचे आहेत का? पण जर व्यायामाची अशी एखादी पद्धत असेल ज्यामध्ये कष्ट कमीतकमी आणि फायदा जास्तीतजास्त असेल तर? खरं नाही ना वाटत?

आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण तसे शक्य आहे. कमनीय बांधा कमावण्याचा विचार येतात  तेव्हा सर्वात पहिला व्यायाम प्रकार आपल्या मनात येतो तो म्हणजे धावणे. वजनात असलेले अतिरिक्त ”किलो” उतरविण्याचा हा सर्वात सोपा आणि स्वस्त व्यायाम प्रकार आहे त्याने जोमसुद्धा वाढतो- म्हणजे सर्वदृष्टीने याचा फायदाच फायदा आहे.

परंतु सांभाळून पाय ठेवा. धावण्याचे दुसरे नाव आहे दुखापती. धावण्याच्या आधी नितंबाच्या, मांडीच्या, गुढघ्याच्या, पायाच्या, घोट्याच्या आणि पावलांच्या. स्नायू ताणण्याचे व्यायाम करावे असे जवळ जवळ सगळे शिक्षक सुचवतात परंतु केवळ स्नायू ताणणे हे पुरेसे नाही आहे. एका धावपटूने श्री श्री योग शिबीर यात शिकवली जाणाऱ्या थोड्याफार योगासनांचा सराव करणे जरुरी आहे. या शिबिरामुळे त्याला हे समजते की या आसनांमुळे आपण आपली शक्ती पूर्णपणे वापरू शकतो. काही मिनिटे या प्राचीन योग आसनांमध्ये विश्राम करण्यात घालवली तर ट्रेडमिलवर काही अधिक मैल जाऊ शकता.

खास धावपटूंसाठी योजलेल्या १० सोप्या आसनांनी तुमचे शरीर जलद धावण्यास तयार होते.

  1. बद्धकोनासन |Badhakonasana
  2. अर्ध मत्स्यइंद्रासन |Ardha Matsyendrasana
  3. हस्तपादासन | Hastapadasana
  4. प्रसारिता पादोत्तनासन |Prasaritapadottanasana
  5. त्रिकोणासन | Trikonasana
  6. वृक्षासन | Vrikshasana
  7. वीरभद्रासन II | Virabhadrasana 2
  8. कोनासन | Konasana
  9. पूर्वोत्तानासन | Poorvottanasana
  10. उत्कटासन | Utkatasana
1

बद्धकोनासन | Badhakonasana

(फुलपाखरू आसन) - बद्धकोनासन मांड्या, जांघ, हँमस्ट्रिंग (गुढघ्याच्या मागचे स्नायुबंध) आणि गुढघा यांच्या स्नायूंच्या तणावासाठी फारच चांगले आहे.

2

अर्ध मत्स्येन्द्रासन | Ardha Matsyendrasana

(बसलेल्या स्थितीत पाठीच्या मणक्याला अर्धे वळवणे) अर्ध मत्स्येन्द्रासनामुळे पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते आणि वाकणे सहजशक्य होते.

3

हस्तपादासन | Hastapadasana

(उभ्या उभ्या समोरच्या दिशेने वाकणे) - हस्तपादासनामुळे शरीराचे मागच्या बाजूचे सर्व स्नायू, ताणल्या जातात, उदरातील इंद्रियांची कार्यक्षमता वाढते आणि पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढण्यात मदत होते.

4

प्रसारिता पादोत्तनासन |Prasaritapadottanasana

Prasarita Padahastasana

(पायात अंतर ठेवून उभ्या उभ्या समोरच्या दिशेने वाकणे) - प्रसारित पादहस्तासनाने हँमस्ट्रिंग (गुढघ्याच्या मागचे स्नायुबंध), पाय आणि पावले यांचे स्नायू ताणले जातात.या आसनामुळे पाठीचे मणके लंबाकार होतात आणि उदर बळकट होते.

5

त्रिकोणासन | Trikonasana

Trikonasana

(कोणाकृती आसन) - त्रिकोणासन केल्याने पाय, गुढघे, घोटे, हात आणि छाती यांना बळकटी प्राप्त होते. या आसनाने नितंब, जांघ, हँमस्ट्रिंग (गुढघ्याच्या मागचे स्नायुबंध), पोटऱ्या, खांदे, छाती आणि पाठीचे मणके हे ताणले जातात आणि तेथील स्नायू मोकळे होतात. तसेच हे आसन केल्याने मानसिक आणि शारीरिक संतुलन वृद्धिगत होते.

6

वृक्षासन | Vrikshasana

Vrikshasana in Hindi

वृक्षासन पायांना सशक्त करते, संतुलन वाढवते आणि नितंबांना मोकळे करते.

7

वीरभद्रासन II | Virabhadrasana 2

(योद्धा आसन) - वीरभद्रासन केल्याने हात, पाठीचा खालचा भाग आणि पाय यांची कार्यक्षमता वाढते. याने जोमसुद्धा वाढतो आणि हे आसन शरीरात संतुलन आणते.

8

कोनासन | Konasana

Konsana

(उभे राहून एका बाजूस वाकणे) - कोनासन केल्याने शरीराची डावी आणि उजवी बाजू आणि पाठीचे मणके यांना ताण पडतो. याने हात, पाय आणि उदरातील इंद्रिये यांची कार्यक्षमता वाढते.

9

पूर्वोत्तानासन | Poorvottanasana

Poorvottanasana (Upward Plank Pose)

(ऊर्ध्व फळकुट आसन) - पूर्वोत्तानासन केल्याने नितंब आणि पाय यांना ताण पडतो; मनगट, हात, खांदे, पाठ आणि मणके हे सक्षम होतात.

10

उत्कटासन | Utkatasana

(खुर्ची आसन) - उत्कटासन केल्याने मणके, नितंब आणि छातीचे स्नायू यांना व्यायाम मिळतो. याने मांड्या, घोटे, पाय आणि गुढघे हे अधिक कार्यक्षम होतात.

 

धावणे हा अतिशय उत्तम व्यायाम आहे जो तुम्हाला शरीराने निकोप ठेवतो आणि तुमचा जोम वाढवतो. जर तुम्हाला धावण्याची आवड असेल तर तुम्ही स्थानिक धावपटूंच्या गटामध्ये सहभागी होऊ शकता आणि अंतिमतः तुम्ही मँरथोनमध्ये भाग घेऊ शकता. तुमच्या धावण्याच्या आवडीला योगाबरोबर जोडून तुम्ही तुमची क्षमता वाढवू शकता जेणेकरून धावणे अधिकच रोचक होईल.

योग सराव, शरीर आणि मन विकसित करून आरोग्यस भरपूर चालना देते. परंतु ते औषधांसाठी पर्याय नाही. प्रशिक्षित श्री श्री योग शिक्षकाच्या च्या देखरेखीखाली योगभ्यस करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही वैद्यकीय कारणासाठी, डॉक्टर आणि एक श्री श्री योग शिक्षक सल्लामसलत केल्यानंतरच योगभ्यस करावा.

श्री श्री योग शिबीर(कार्यक्रम) आपल्या जवळच असलेल्या आर्ट ऑफ लिविंग केन्द्रावर शोधा. आपणास शिबिरबद्दल माहिती हवी असेल किंवा अभिप्राय पाठवायचा असल्यास आम्हाला लिहून कळवा - info@srisriyoga.in.