योगमार्गावरील गुरुचे महत्व | The Importance of a Guru on the Path of Yoga

“ कळीमध्ये जशी पूर्ण उमलण्याची क्षमता असते, तशी मानवी जीवनामध्ये पूर्ण बहरण्याची क्षमता असते. मानवी क्षमतेचे पूर्णपणे बहरणे म्हणजेच योग होय. ” – श्री श्री रविशंकरजी

प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी आत्म विकासासाठी विकसित आणि सिध्द केलेल्या मार्गाला ‘योग’ म्हणतात. यामध्ये वैयक्तिक उन्नत्तीसाठी आपापल्या क्षमतेनुसार योगप्रक्रियांच्या सहाय्याने आपण उन्नती करू शकतो. प्राचीन काळापासून योगाचे ज्ञान, विज्ञान आणि दर्शन हे शिष्यांना गुरुकडून शिकवले जाते. आणि गुरुकृपेमुळेच हे ज्ञान शिष्यापर्यंत पोहोचते.

 

गुरु आणि परंपरा | Guru & the path

‘परंपरा’ म्हणजे असे ज्ञान, जे शिष्याला वारसाहक्काने प्राप्त होते. हा एक संस्कृत शब्द आहे, ज्यामध्ये अगाध आणि अनादी असे ज्ञान, जे व्यक्ती सापेक्ष आणि व्यावहारिक अनुभवांवर आधारित आहे, ते जसेच्या तसे, त्याच्या खऱ्या आणि मूळ स्वरूपामध्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवले जाते. गुरु – शिष्य परंपरेमुळेच, या साखळीमुळेच हजारो वर्षापासुनचे पुरातन असे ज्ञान आजतागायत हस्तांतरित होत आले आहे. योग शिक्षण देखील प्रभावी, परिणामकारक आणि परिपूर्ण होण्यासाठी गुरु – शिष्य परंपरेतून यावे लागते. परंपरा अशी आहे कि हे ज्ञान शिष्याला गुरूच्या सानिध्यात कित्येक वर्षे व्यतीत केल्यानंतर, आपले तन, मन आणि आत्मा गुरूंना समर्पित केल्यानेच प्राप्त होते. असे असेल तरच तो शिष्य या ज्ञानासाठी पात्र आहे असे समजतात.

योगाचा उद्देश्य | Purpose of yoga

काही कालावधीपासून आपण योग आणि गुरु – शिष्य परंपरा यांच्या उद्देश्यापासून फार दूर गेलो आहोत. आपल्यापैकी किती लोक खरोखर योगाचे उद्देश्य जाणतात? जगभर शेकडो योग विद्यालय निर्माण झाले आहेत जेथे प्रशिक्षण देऊन कित्येक योग प्रशिक्षक बनवले जातात. परंतु या विद्यालयांमधील किती लोकांना खरोखर ‘योग सार’ माहित आहे? काही शारीरिक आसने करणे, प्राणायाम करणे आणि ध्यान प्रक्रिया इत्यादी करणे म्हणजे योग असे मानले जाते. हे चांगले आहे कि पृथ्वीवर हे पुरातन आणि उपयुक्त ज्ञान टिकून राहिले. परंतु या प्रक्रियांना चिकटून राहण्यापेक्षा, यापेक्षा पुढे जाणे आणि योगाचा खरा अर्थ, सार आणि उद्देश्य जाणून घेणे आवश्यक आहे.

खरे योग गुरु | A true Guru of yoga

समस्त योग इतिहासामध्ये खरे योगगुरु त्यांना मानले गेले आहे जे अध्यात्मिक गुरु आहेत. जे योग ते इतरांना शिकवतात त्यांचे तंतोतंत पालन करतात, जे त्या ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहे. ज्यांचे मन अध्यात्मिक तत्वज्ञानाचे शारीरिक रूप आहे, जे ते शिकवतात-बोलतात तसेच वागतात, त्यांना त्यांच्या गुरुकडून जे ज्ञान प्राप्त झाले ते संपूर्ण ज्ञान जे आपल्या शिष्यांना देतात ते खरे अध्यात्मिक गुरु होय.

हल्ली जगात ‘गुरु’ प्रती नास्तिकता, विरोधाभास आणि गैरसमज असले तरी गुरु तत्व काय आहे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

संस्कृत भाषेत शब्दशः अर्थ होत असल्याप्रमाणे, गुरु अशी व्यक्ती होय जी आपल्या शिष्याच्या मनातून  आणि हृदयातून “अंधकार” नाहीसा करते, “अज्ञान” नाहीसा करते.

अनंततता प्राप्य आहे परंतु स्पष्ट नाही, निश्चित नाही. मात्र गुरु दोन्ही - अनंत आणि स्पष्ट-निश्चित आहे, अनंत आणि स्पष्ट. दैवी शक्ती वस्तुनिष्ठ नसते मात्र गुरु दैवी आणि वस्तुनिष्ठ असतो. तुमच्या प्रगतीसाठी व्यक्तीशः असतो. गुरुतत्व विशाल, वस्तुनिष्ठ आणि सतत उपलब्ध असते. गुरु म्हणजे अनंत आणि अमर्याद प्रेमाचे मानवी रूप.


  • गुरु (गु + रु = अंधकाराचा, अज्ञानाचा विनाशक) जो आपल्या सीमित अस्तित्वाचा अडसर दूर करून आपणासाठी असीमित, अनंत अश्या जीवनाचा मार्ग खुला करतो. आपणास अज्ञानातुन ज्ञानाकडे, अविद्येकडून विद्याकडे जाण्यास प्रवृत्त करतो.
  • गुरु आपला संशय आणि अज्ञान नाहीसे करतो, दुष्ट प्रवृत्ती आणि मानसिक संस्कारांना रुपांतरीत करतात.
  • गुरु फक्त ज्ञानच देत नाहीत तर आपल्यामध्ये प्राणशक्ती, जीवनऊर्जा जागृत करतात.
  • गुरु ज्ञानासोबत बुद्धीमत्ता देखील देतात. अतिशय तीक्ष्ण बुद्धी म्हणजे बुद्धीमत्ता.
  • गुरूच्या सानिध्यात आल्यावर शोध थांबतो आणि बहरणे सुरु होते.
  • गुरु म्हणजे अनंत, अमर्याद, विशाल आणि सर्व समावेशक अस्तित्व.
  • गुरूच्या एका असण्यामुळे सर्व नाते संबंधांना परिपूर्णता येते.

गुरु आणि ईश्वर| Guru & God

तुम्ही काय आहात आणि तुम्ही काही बनण्याची अंतिम शक्यता काय असू शकते, हे गुरु आपणास दाखऊन देतात. गुरु निव्वळ काही प्रक्रिया किंवा एखादा मार्गच दाखवत नाहीत तर आपल्या आत्म्याची ओळख आणि आपले अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी गुरु मदत करतात. गुरु हे ईश्वरी अवतार आणि आपल्या मुक्तीचे द्वार असतात. तसे पाहिले तर ईश्वर, गुरु आणि आत्मा हे समानार्थी आहेत. ईश्वराला पहायचे असेल तर गुरूला पहा. सर्व श्रेष्ठ गुरूंना हे ज्ञात होते.

हे समजावताना येशू ख्रिस्त म्हणाले होते, “ मी आणि माझे पिता एकच आहोत.”

भगवान बुद्ध उद्गारले होते, “ माझे विचारच सत्य आहेत, आणि माझा आत्माच सत्य बनला आहे.”  

श्रीकृष्ण म्हणाले कि, “ ज्ञानी मानवाचे अंतिम ध्येय आणि ते प्राप्त करण्याचा मार्ग मीच आहे.”

महान गुरुचे सानिध्य प्राप्त झाल्यास हा मार्ग आणखी सुकर होतो, असे सानिध्य एक अमुल्य भेट आहे, समजण्यास अति अवघड आणि स्वानुभव करण्यास अति उत्तम. असे गुरु पुरातन संस्कृतीचे पाईक आणि वंशज असणारे महामानव आहेत.

श्री श्री रविशंकरजी यांच्या ज्ञान चर्चेवर आधारित..

योग आणि गुरु | Yoga & the Guru

” दोन दशकापूर्वी सुरु केलेला माझा योग प्रवास माझा ‘छंद आणि उद्देश्य’ बनला. पण त्यात परिपूर्णता जाणवत नव्हती. मला जाणवू लागले होते कि योग गुरु, अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय माझा उद्देश्य सफल होणार नाही. मला माझ्या जीवनात गुरूची कमतरता खूप जाणवत होती. पुरातन योग साहित्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे गुरुकुल मध्ये जाऊन निवास करावा आणि सात्विक योगींकडून, गुरूंकडून योग शिकावा, ज्या योग मार्गावर मी चालले आहे त्याबाबत मार्गदर्शन घ्यावे आणि आशीर्वाद घ्यावा, अशी तीव्र इच्छा मनात उठत होती.

मी पहिल्यांदा गुरुदेव श्री श्री रविशंकरजीनां भेटले आणि माझा तो शोध संपला आणि माझ्या जीवनाला दिशा मिळाली. या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत होते मी. त्यांच्या कृपाशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे हे समजले कि आजतागायत मी जे केले ते विशाल अश्या योग सागराच्या तीरावरच गटांगळ्या खाणे होते. मग बेशिस्त आणि नीरसपणा जाऊन त्याजागी परमानंद, उपयुक्त शिस्त आणि प्रतिबद्धता आली. त्यांच्या सानिध्यातील योग प्रवास म्हणजे सुरवातीला काही शारीरिक आसने आणि प्राणायाम वाटत होते. नंतर त्यांची अमर्याद क्षमता लक्षात आली. माझ्या पूर्वीच्या सरावाला एक वेगळीच दिशा प्राप्त झाली. योग म्हणजे शरीर, मन, श्वास आणि आत्मा यांचा मिलाफ आहे. आत्ता सराव करताना मला याचा अनुभव येत होता.”

“ सध्या अनेक पुस्तके, वेबसाईट आणि डीव्हीडींच्या माध्यमातून प्रचंड योगिक ज्ञान उपलब्ध आहे. त्यांच्या सहाय्याने तुम्ही योगासने आणि प्राणायाम करू शकता. भरपूर माहिती त्यातून उपलब्ध होते. पण ते तुम्हाला योगाचा खरा अनुभव देऊ शकत नाहीत. त्या माहितीचे रुपांतर अनुभवात होण्यासाठी अध्यात्मिक, योग गुरूची गरज आहे. या प्रक्रियांपलीकडील अनुभव प्राप्त होण्यासाठी, योगाचा खरा सार जाणून घेण्यासाठी गुरु आवश्यक आहे.”

“ नुकताच २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. आज जगभर गुरु पौर्णिमा साजरी होत आहे. विशाल योग ज्ञान आपल्या जीवनात आपल्या गुरूमुळे आले आहे, या गुरु प्रती कृतज्ञ राहूया.”

डॉ. सेजल शाह.

प्रशिक्षिका, श्री श्री स्कूल ऑफ योगा