कमी रक्तदाबामध्ये सुधारणा होण्यासाठी काही योगासने I Yoga poses to reduce Hypotension

कमी रक्तदाब काय आहे?| What is hypotension or low blood pressure?

कमी रक्तदाब किंवा हायपोटेन्शन एक आजार आहे ज्यामध्ये आपला रक्तदाब पाऱ्याच्या ९०/६० मि.मि. च्या खाली जातो. तज्ञांच्या अनुसार कमी रक्तदाबा मुळे जो पर्यंत चक्कर येणे, बेशुद्ध होणे किंवा धक्का बसणे या सारखे प्रभाव निर्माण करत नाही तोपर्यंत तो धोकादायक नाही.

हायपोटेन्शनची इतर लक्षणे म्हणजे डोके तसेच छातीत दुखणे, झटके येणे, दीर्घ कालावधीसाठी पोट झाडणे तसेच उलट्या होणे होय.

रक्ताचे कमी प्रमाण, अॅनिमिया, पोषक घटकांची कमतरता, हृदयाच्या काही तक्रारी आणि संप्रेरकामधील बदल तसेच अन्य कारणांनी हायपोटेन्शन होऊ शकते. कमी रक्तदाब हा उच्च रक्तदाबा इतका धोकादायक नाही. काही खबरदारी आणि जीवनशैलीमध्ये बदल करून याच्या धोक्यातून बाहेर पडायला मदत होते. योग्य देखभाल आणि औषधांमुळे रक्तदाब सामान्य राहू शकतो. शारीरिक व्यायाम आणि योगा मुळे शरीरातील रक्तप्रवाहामध्ये सुधारणा होते आणि कमी रक्तदाब ठीक होतो. तसेच संतुलित आयुर्वेदिक आहारामुळे रक्तदाब संतुलित ठेवण्याच्या प्रक्रियेला सोपे आणि गतिमान बनवते. कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खाली काही योगासने आणि प्राणायाम सांगितले आहेत.

कमी रक्तदाबामध्ये सुधारणा होण्यासाठी योग मुद्रा - आपल्या निरोगी जीवनाचा प्रवास सुरु करा.

कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी काही योगासने सुचवली आहेत.

या आसनामुळे डोक्यातील रक्त प्रवाहामध्ये सुधारणा होते आणि चक्कर येणे आणि थकवा सारख्या समस्या दूर होतात.

या आसनामुळे मेंदू शांत राहतो आणि थकव्यापासून आराम मिळतो.

या आसनामुळे रक्त संचालन वाढते आणि पाठीच्या खालच्या भागाचा तणाव निघून जातो.

या आसनामुळे तणाव आणि थकव्यापासून आराम मिळतो आणि डोके शांत रहाते.

या आसनामुळे डोक्यातील रक्त प्रवाह सुधारतो आणि यामुळे चक्कर आणि थकव्याच्या तक्रारी नाहीश्या होतात. सर्वांगासन दिव्य समाज निर्माण (डी.एस.एन.) शिबिरामध्ये शिकवले जाते.

Fish Pose - Matsyasana

या आसनामुळे पाठ आणि खांद्याचे स्नायु प्रसरण पावतात ज्यामुळे पूर्ण शरीरात योग्य आणि भरपूर प्रमाणात रक्त पुरवठा होत राहतो. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी प्राणायाम | Pranayama for Low BP Patients

Kapalbhati Pranayama in Hindi

श्वास घेण्याच्या या प्रकारामुळे रक्त संचारामध्ये सुधारणा होते आणि मन शांत होते.

Bhastrika Pranayama in Hindi

या प्राणायामाची श्वास घेणे, रोखणे आणि सोडणे या श्वसन प्रक्रियांना नियमित करण्यास मदत होते. मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळून रक्त शुद्धी होते. श्वसन संस्थेला आराम मिळतो.

यामुळे मन नियंत्रित होण्यास मदत होते. श्वासाची गती मंद होते. ज्यामुळे प्राणवायू संथ गतीने शरीरात जातो आणि विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर फेकले जात असल्याने डोके आणि मन शांत होते. यामुळे चक्कर येणे कमी होते. हा प्राणायाम श्री श्री योगाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करायला हवा. हा प्राणायाम श्री श्री योग-२ शिबिरामध्ये शिकवला जातो.

कमी रक्तदाब असणाऱ्यांसाठी खबरदारी | Precautions for Lower Blood Pressure

  • अचानक केलेल्या कामांमुळे चक्कर येऊ शकते किंवा बेशुध्द होऊ शकता. त्यापासून बचावा.
  • योग करताना योग्य श्वसन करत आहात याची काळजी घ्या.
  • भरपूर पाणी प्या. मद्यप्राशन करू नका.
  • तज्ञांच्यामते मीठ आणि कॉफीचे सेवन करावे. यांच्या सेवनाने रक्तदाब वाढतो. पण आहारात बदल करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

योग असे प्राचीन विज्ञान आहे ज्यामध्ये आसन, प्राणायाम आणि ध्यानाद्वारे निरोगी राहण्यास प्रवृत्त करते. यामुळे मन शांत आणि शरीर कोमल बनते. वैयक्तिक आणि व्यावसाईक जीवनामध्ये उत्साह निर्माण होतो. तर रक्त दाबाच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी आपली योगाची चटई अंथरा आणि योगाभ्यास सुरु करा.

योगाभ्यासामुळे शरीर आणि मन विकसित होऊन भरपूर आरोग्य प्राप्त होत असले तरी ते औषधांना पर्याय होऊ शकत नाही. योगासने श्री श्री योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकणे आणि सराव करणे अत्यंत गरजेचे आहे. काही शारीरिक व्याधी असतील तर तज्ञांचे आणि श्री श्री योग प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेऊन मुद्रांचा सराव करा. आपल्या नजीकच्या आर्ट ऑफ लीविन्गच्या केंद्रामधून श्री श्री योग शिबिराची माहिती करून घ्या.