योगाने स्थूलपणा कमी करा (Yoga for obesity in Marathi)

आपल्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आरोग्यावर होणाऱ्या अनेक दुष्परिणामांपैकी स्थूलपणा हा सर्वात हानिकारक परिणाम आहे. 'शरीरात अतिरिक्त चरबी' अशी स्थूलपणाची व्याख्या करता येईल आणि स्थूलपणा हा हृदयविकारांसारख्या घातक रोगांना निमंत्रण देतो.

स्थूलपणा म्हणजे काय?

डब्लूएचओ च्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार १९८० च्या तुलनेत जागतिक स्थूलपणा हा आता दुप्पट झाला आहे. २००८ मध्ये ३०० दशलक्ष महिला आणि २०० दशलक्ष पुरुष हे स्थूल होते. ही आकडेवारी पाहून तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी वाटू लागली आहे कां? दरदरून घाम फुटला कां? काळजी करू नका.कारण वजन जास्त असूनही कदाचित तुम्हाला 'स्थूल'  म्हणता येणार नाही.  कारण तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर स्थूल असणे हे वजन जास्त असणे, यापेक्षा वेगळे आहे. साध्या शब्दात सांगायचे झाले तर जर बॉडी-मास-इंडेक्स (बीएमआय) हा २५ पेक्षा जास्त असेल तर त्याचे वर्गीकरण जादा वजन आहे, असे केले जाते. परंतू ३० किंवा त्याहून जास्त बीएमआय असणे हे स्थूलपणाच्या प्रकारात मोडते.

यावर कोणता मार्ग आहे?

तुम्ही कोणत्याही प्रकारात मोडत असलात तरी दोन्ही परिस्थितीत तुम्ही गांभीर्याने कृती करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला नक्की समजत नसेल की स्थूलपणावर नियंत्रण कसे आणावे तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेला आहात. स्थूलपणा कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते तुम्ही तुम्हाला अपाय करणाऱ्या गोष्टी बंद करणे आणि तुमच्या आरोग्याकरिता हितकारक गोष्टी सुरु करणे. सुरवात करायची झाली तर ती सर्वप्रथम पोषक आहार योजना  आणि काही शारीरिक व्यायम करून. जर तुम्ही जिमला जात नसाल तर योगाचा आधार घ्या.

नैसर्गिकरित्या आरोग्य कमवा:

योग हे एक प्राचीन तंत्र आहे जे चांगली जीवनशैली, सुधारित आहाराच्या सवयी आणि शारीरिक व्यायाम यांच्याद्वारे समग्र जीवन जगण्याला प्रोत्साहित करते. हे एक नैसर्गिक तंत्र असून निरनिराळ्या आसनांमधून नियंत्रित श्वसनावर लक्ष केंद्रित करते. योग हे पूर्णपणे हानीमुक्त आहे आणि अॅलोपथीच्या वजन कमी करण्याच्या गोळ्यांना एक उत्तम पर्याय आहे. तुमचे बीएमआय एकदम जास्त असू दे किंवा तुम्हाला फिट राहायचे असू दे, योग सर्वांच्या गरजा भगवते. खाली काही योगासने दिली आहेत ज्यांच्या प्रारंभाने तुम्ही तुमचे वजन कमी करण्यास सुरुवात करू शकता. :

[कपाल भाती प्राणायाम]

या श्वसन तंत्रामुळे  चयापचयाची प्रक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यात मदत करते.यामुळे पचनसंस्थेचे कार्य, पोषक द्रव्यांचे शोषणे व पाचकता सुधारते.

[पश्चिमोत्तानासन]

 

या आसनामुळे  उदर व ओटीपोटातील इंद्रियांना मालिश होते आणि पोट सुडौल बनते. पचनक्रिया सुधारते.त्यामुळे स्थूलपणा कमी होण्यास हे आसन अतिशय परिणामकारक आहे.

 

[वीरभद्रासन]

या  आसनामुळे शरीराचे संतुलन आणि जोम वाढतो.
हे आसन केल्याने पोटातील इंद्रियांना चालना मिळते.

[दंडासन]

हे आसन केल्याने पोट सुडौल बनते.
हे आसन शरीराच्या वरच्या भागाकरिता उत्तम आहे. तसेच मनगटे आणि हात
बळकट होतात.

 

[पूर्वोत्तानासन]

या आसनामुळे आतडी आणि पोटातील इंद्रिये ताणली जातात.तसेच पोट सुडौल बनते.

[नौकासन]

या आसनामुळे पोट सुडौल बनते,
पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांना चालना देते.

 

[शलभासन]

या आसनामुळे  पोटातील इंद्रियांना मालिश होते आणि  पोट सुडौल बनते.
पचनक्रिया सुधारते,शरीर लवचिक बनते.

[हलासन]

या आसनामुळे पोटांचे स्नायू बळकट बनतात,त्यांना चालना मिळते. हे तणाव आणि थकवा यांना दूर करते.

 

जीवनशैलीत बदल:

तुम्ही स्थूलपणा कमी करण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांचा परिणाम अधिक प्रभावी ठरण्यासाठी एक समग्र चांगली जीवनशैली आपलीशी केली पाहिजे. योगाच्या सोबतीला जर तुम्ही आयुर्वेदिक जीवनशैली अनुसरली तर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना वेग येईल. 'योगाची भगिनी' अशा प्रकारे उल्लेखिले जाणारे आयुर्वेद हे योगाच्या बरोबरीनेच अस्तित्वात आहे. आयुर्वेद ही एक प्राचीन,नैसर्गिक आणि समग्र औषध पद्धती आहे जी उत्तम आरोग्याच्या लाभाकरिता जीवनशैलीत कराव्या लागणाऱ्या बदलांच्याबाबतीत मार्गदर्शन करते.तसेच आयुर्वेदिक पाककला ही वजन कमी करण्याच्या परिणामासोबत जिभेचे चोचले देखील पुरवते.

तुमच्या क्षमतांचा आदर ठेवा :

सुरवातीला योगामुळे हिंमत खचल्यासारखे वाटते परंतू असहाय्य करून टाकणाऱ्या स्थूलपणाच्या समस्येवर योग ही खरोखर पर्यायी,सोपी पद्धत आहे. प्रारंभी काही आसनांमध्ये वाकायला त्रास होईल पण सरावात सातत्य राखल्यास दिवसागणिक तुम्हाला वाकणे, ताणणे यात सहजता अनुभवायला मिळेल. तुमच्या शरीराला त्याच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे आणि लवकर वजन कमी व्हावे म्हणून या मर्यादांच्या पलीकडे जाऊन स्वतःला ताणणे योग्य ठरणार नाही. तुमच्या शरीराला जेवढे शक्य आहे तेवढेच ताणा आणि जागरूकपणे श्वसन करीत त्या आसनात आराम करा.

तुमचे वजन कमी करा-तुमची मनःशांती न घालवता :

योग हे त्वरित वजन कमी करीत नाही. परंतू त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. प्रारंभी तुम्हाला वाटेल की वजन कमी करण्यात तुमची काडीचीही प्रगती होत नाही आहे परंतू तुम्हाला आतून अधिकाधिक कार्यक्षम आणि ताजेतवाने वाटायला सुरुवात होईल. सरतेशेवटी शरीर प्रतिसाद देऊ लागेल आणि बांधा सुडौल बनू लागेल. चिकाटी ही फार महत्वाची आहे हे सतत लक्षात ठेवा. आशा सोडू नका आणि तुमचा सराव नियमित चालू ठेवा. तुमच्या योग प्रशिक्षकाचा सल्ला घ्या आणि त्यांच्याकडून तुमचे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर अशी योगाभ्यासाची रूपरेषा आखून घ्या.

निरोगी शरीर हे शांत आणि ग्रहणक्षम मनाचे घर होऊ शकते. यामुळे तुम्ही सुंदर तर दिसू लागताच आणि शिवाय तुमचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे तुमच्या आरोग्याला असलेले धोके कमी होतात आणि त्यामुळे तुम्ही तुमचे जीवन आणखी मुक्तपणे उपभोगू शकता. हे सगळे मिळवण्यात योग मदत करते.ते तुम्हाला हानीकारक असलेले वजन कमी करते  आणि तुम्हाला तुमच्या शरीरावर पुन्हा ताबा मिळवून देते. अशा प्रकारे यामध्ये सर्वार्थाने तुमचा फायदाच आहे. चला तर मग तुमची योगाची सतरंजी अंथरा आणि स्थूलपणा कमी करण्याच्या नैसर्गिक मार्गावर मार्गक्रमण करा.

 

योगाच्या नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्याय नाही. श्री श्री योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे आणि  त्याचा सराव करणे  अतिशय महत्वाचे आहे. आरोग्याच्या काही समस्या असल्यास योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबीराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे कां किंवा तुम्हाला तुमची  प्रतिक्रिया नोंदवायची आहे कां? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा.