धुळे येथे स्वच्छता अभियान (Cleanliness campaign in dhule Marathi)

धुळे, महाराष्ट्र : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोषजी महाले (९४२०८९१९७६) म्हणाले “२ ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त आपल्या शहराला स्वच्छ शहर-सुंदर शहर बनवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी आपले अमुल्य असे चार तास दिले. अंदाजे ६० लोकांनी एकत्र येऊन आग्रा रोड ते जेल रोड आणि त्या मधील झोपड पट्टीचा भाग स्वच्छ केला”.

स्वयंसेवकांच्या या मोहिमे मागे संतोषजी प्रेरणास्थान होते. वृंदाजी  राव यांनी या मोहिमेचे संघटन केले.