राष्ट्रीय हरित लवादाने मनोज मिश्रा यांची आर्ट ऑफ लिव्हिंगचा निधी वापरण्याची विनंती नाकारली | NGT rejects Manoj Mishra's plea to use Art of Living funds

इंडिया
21st of एप्रिल 2017

बंगलोर, २० एप्रिल, २०१७ : आदरणीय राष्ट्रीय हरीत लवादासमोर झालेल्या आजच्या सुनावणीत तीन निर्णय घेण्यात आले. तिन्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बाजून होते.

  1. मनोज मिश्रा यांची, आर्ट ऑफ लिव्हिंगने जमा केलेला निधी लगेच वापरण्याची विनंती अमान्य करण्यात आली.
  2. मनोज मिश्रा यांची, परिमाणवाचक अहवालावर आक्षेप नोंदविण्याची संधी आम्हाला दिल्याशिवाय खटल्याची सुनावणी करण्याची विनंती अमान्य करण्यात आली.
  3. मिश्रा यांच्या, आम्ही आमच्या वेब साईट वर व्यक्त केलेल्या मतासाठी, आमच्या विरुध्द कार्यवाही करण्याच्या विनंतीवर आदरणीय राष्ट्रीय हरीत लवादाने काहीही कार्यवाही केली नाही.


माध्यमांच्या अहवालाच्या उलट, आदरणीय हरित लवाद आम्हाला काही न म्हणता मनोज मिश्रांना सुनावले. त्यांना व्ह्यायला हव्या असलेल्या कोणत्याही कारवाईला परवानगी मिळाली नाही. न्यायालयात थट्टा अप्रस्तुत  आहे. प्रस्तुत आहेत ते निर्णय आणि जे आमच्या बाजूने लागले. दुर्दैवाने काही माध्यमांनी या खटल्याचे चुकीचे वृत्त दिले आहे. आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचाच विजय होईल याची खात्री आहे.