नवरात्रीतील मौन | Navratri Aani Maun

या जगातील आपल्याला दिसणारे सारे काही ऊर्जेपासून तयार झालेले आहे. अगदी सूर्यकिरणांपासून ते वाहत्या नद्या, सतत वाजणाऱ्या मोबाईल फोनपासून ते शांतपणे काम करणारे पेसमेकर्स – या प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आहे. न्यूटनचा नियम सांगतो त्याप्रमाणे ऊर्जा कधीही निर्माण होत नाही, तसेच नष्टही होत नाही; फक्त ती एका रूपातून दुसऱ्या रुपात परिवर्तीत केली जाऊ शकते. पण या ऊर्जेचा स्त्रोत काय आहे? अशी कोणती शक्ती आहे जी प्रत्येक क्षणाला सर्व वस्तू, सजीव आणि निर्जीव घटकांतून उर्जा पाझरायला कारणीभूत ठरते?

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार  मां देवी हीच साऱ्या ऊर्जेची स्त्रोत आहे. ह्या गुणविशेषामुळेच ती ‘शक्ती’ म्हणून ओळखली जाते. मां देवी या जगतातील सगळ्या अस्तित्वाला शक्ती पुरवीत असते आणि तिला टिकवून ठेवत असते. आणि नवरात्र हे पर्व आपल्या अस्तित्वासाठी निमित्त असलेल्या मां देवीचा आदर आणि पूजन करण्याचे पर्व आहे.

ज्याप्रमाणे नऊ महिने मातेच्या गर्भात बाळाची वाढ होत राहते, त्याचप्रमाणे नवरात्रीच्या या नऊ दिवसांत आपल्याला आपल्या स्त्रोतामध्ये परतून विश्रांती घेण्याची आणि परत नवचैतन्य प्राप्त करण्याची संधी मिळते. पण इथे, विश्रांती म्हणजे केवळ शारीरिक क्रियाकलापातूनच नव्हे तर मानसिक स्तरावर सुद्धा विश्रांती असा अर्थ सूचित आहे. आपल्या मनातील सततचा गलबला आपल्या शक्तीचा ऱ्हास करीत असतो आणि आपल्याला गहऱ्या विश्रांतीचा अनुभव घेण्यापासून वंचित करीत असतो.

सारे जग ऊर्जेने पुरेपूर भरलेले आहे - अशी ऊर्जा जिचा उपयोग आपल्याला पुन्हा चैतन्यदायी होण्यासाठी करता येईल. या विशाल ऊर्जेच्या स्त्रोताचा लाभ घेण्यासाठी आपल्याला केवळ आपल्या स्वत्वासोबत सूर जुळवून घ्यावे लागतील. जेंव्हा मन स्थिर असते तेंव्हा ते आपल्या सभोवताली असलेली ऊर्जा ग्रहण करून घेते आणि विस्तारित होते. यामुळे आपली सजगता वाढते, मन शांत होते आणि कार्यक्षमता वाढते. तसेच ध्यान आणि उपवास यासारख्या अध्यात्मिक अभ्यासाने अशी मनाची स्थिती प्राप्त होऊ लागते.

ध्यान आणि उपवासाने मनातील बेचैनी कमी होते आणि मन शांत होण्यास मदत होते. त्यासोबत मौनाची जोड मिळाल्यास तो अनुभव अधिक समृद्ध होतो. श्री श्री रविशंकरजी म्हणतात की,

“मौनाने आपली वाणी तर शुद्ध होतेच, पण त्यामुळे आपले कौशल्य अधिक विकसित होत जाते.तसेच, मौन राखल्याने मन शांत होऊ लागते आणि ते पूर्णपणे अंतर्मुखी होते, परिणामी तुम्हाला आपल्या आत अधिक गहऱ्या स्तरावर पोहोचता येते.”

तथापि, मौन म्हणजे केवळ बोलायचे टाळणे नव्हे तर त्याला अधिक विशाल परिमाण आहेत. थोडक्यात, मौनाला तीन प्रकारात विभागता येईल :

  • जेंव्हा एखादी व्यक्ती कुणाशीही बोलत नसते
  • जेंव्हा मन आपल्या भोवतालच्या कोणत्याही वस्तूमध्ये रस घेत नाही आणि ते अंतर्मुखी झालेले असते
  • जेंव्हा पूर्ण एकरूपता आणि तृप्ती असते

पहिल्या प्रकारच्या मौनात आपण न बोलता आणि कसलेही हावभाव न करता आपल्या ऊर्जेचे जतन करतो.

दुसऱ्या प्रकारात आपण एक पाऊल पुढे जातो आणि कोणत्याही भौतिक सुखाचा उपभोग न घेता त्यापासून दूर राहतो.

जेंव्हा जेंव्हा आपण भौतिक सुखात गुंतत जातो तेंव्हा आपले मन कार्यरत होते आणि त्यावर पोषण करून घेते. म्हणून मनाला विश्रांती देण्यासाठी भौतिक सुख टाळले जाते.

तिसऱ्या प्रकारच्या मौनात आपल्याला कशाचीच गरज भासत नसते  आणि आपण पूर्णतः शांत असतो आणि आपल्या भोवताली सारं काही विद्यमान असल्यागत तृप्त असतो. ह्यामुळे आपले मन स्थिर होत जाते आणि ते आपल्या मूळ स्रोताकडे परतू लागते.


तुम्ही विचार करता क, उत्सव केवळ गोंगाटात साजरा केला जातो आणि मौन म्हणजे शोकपर्व. लोक जेंव्हा उत्सव साजरा करतात तेंव्हा खूप कल्लोळ करतात आणि जेंव्हा ते मौनात असतात  तेंव्हा शोक व्यक्त करतात. कोणी दिवंगत झाला किंवा कोणी अतिशय बिकट परिस्थितीत असेल  त्यावेळी ते मौन बाळगतात. आपला उत्सव हा पूर्णपणे वेगळा आहे, आपले मौन संपूर्णतः विरुद्ध प्रकारचे आहे. हे आहे आनंदी राहणे, आणि तरीही मौनात असणे. याप्रकारे आनंद अधिक बहरून येतो आणि मौन खऱ्या अर्थाने एक प्रभावी शक्ती म्हणून आपल्या आयुष्यात सिद्ध होऊ लागतं. म्हणून हे मौन तसे दुःखाचे मौन होत नाही आणि उत्सव केवळ थिल्लर आणि वरवरचा राहत नाही. उत्सवाला गहरेपणा लाभण्यासाठी मौनाची गरज असते. मौनालाही पूर्ण तेजाने प्रकट होण्यासाठी तुम्हाला उत्सव साजरा करावा लागतो. - गुरुदेव श्री श्री रवि शंकर जी


नवरात्र जशी जवळ येऊ लागते  तसे शक्य तेवढे मौन राखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा आणि आपल्यातच कसा बदल होतोय ते बघा. मां देवीचे पूजन करण्याच्या या काळात  तिच्या खऱ्या शक्तीत चिंब भिजण्याची स्वतःला एक संधी द्या आणि देवीच्या शाश्वत दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्या.

नवरात्री संबंधित अन्य लेख

  1. चंडी होम | Chandi Homa
  2. नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
  3. नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
  4. नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
  5. नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
  6. आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
  7. नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
  8. २०२० च्या नवरात्रीचे ९ रंग | Colors of Navratri in Marathi
  9. ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
  10. देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
  11. आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi

ज्ञानासंबंधी अधिक लेख वाचा | Read more on wisdom

योगाबद्दल अधिक वाचा | Read more about Yoga