ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One

ललिता सहस्रनाम 'ब्रह्माण्ड' पुराणातुन आले आहे. ललिता सहस्त्रनामाला तीन भागांमध्ये विभाजित केले जाऊ शकते 

  •     पूर्व भाग - ज्यामध्ये सहस्रनामांची उत्पत्ती सांगितली आहे.
  •     स्तोत्र - यामध्ये देवीचे १००० नावे येतात.
  •     उत्तर भाग - यात फलश्रुति म्हणजे सहस्रनाम पठाणाचे लाभ सांगितले आहे.  

हे  भगवान हयग्रीव (महाविष्णु चे अवतार ) यांनी ऋषि अगस्त्य ना शिकवले.

ललिता सहस्त्रनाम काय आहे? | What is Lalitha Sahasranama?

चेतनेचा तेजस्वी, चैतन्यदायी आणि आनंददायक अविष्कार म्हणजे ललिता सहस्त्रनाम. आत्म केंद्रित तसेच कोणत्याही लालसा आणि द्वेष विरहित अशी मुक्त चेतना चैतन्यदाई आणि आनंददायकच असते. हा खरा ‘ललिता’ चा अर्थ होय.

ललिता सहस्त्र नाम मध्ये देवी मांच्या अर्थपूर्ण अश्या एक हजार नांवांचा उल्लेख आहे. पहा नां, जर आपण चंदन वृक्षाचा उल्लेख केला तर आपणास चंदन सुगंधाची आठवण होते  तद्वत ललिता सहस्त्र नामातील देवीच्या प्रत्येक नांवाला आगळे वेगळे महत्व आणि गुणधर्म आहे.

ललिता सहस्त्रनाम जपाचा काय आणि कसा लाभ होतो? | How does chanting of the names help?

बाल्यावस्थेपासून ते तरुणपणापर्यंत असे जीवनभर आपल्या गरजा आणि अपेक्षा बदलत राहतात. त्याप्रमाणे आपल्या चेतनेमध्ये देखील अमुलाग्र बदल होत असतात. जेंव्हा आपण ललिता सहस्त्र नामातील एकेक नाम उच्चारतो तेंव्हा त्यांचे गुणधर्म आपल्या चेतनेमध्ये जागृत होत राहतात आणि आपल्या गरजेनुसार वेळोवेळी ते प्रकट होत राहतात.

या सहस्त्र नामांच्या उच्चारामुळे या गुणांच्या जागृती आणि प्रकटीकरणासह त्या गुणधर्मांची आपल्या भोवतालच्या जगामध्ये जाणीव आणि त्यांच्या बद्दलचा कृतज्ञभाव आपल्यामध्ये निर्माण होतो. यामुळे आपला परिपूर्णता आणि समृद्धीच्या अवस्थेकडे प्रवास सुरु होतो. म्हणून पुराण पुरुषांनी (ऋषीनीं) हा विविधतेने भरलेला आपल्या चेतनेला पूर्णत्वाकडे नेणारा असा उपयुक्त उपासना मार्ग आपणास दिल्याबद्दल कृतज्ञ राहूया.

सहस्त्रानामाचे पठन करणे हा एक विधी आहे. त्यामुळे आपले मन शुध्द होते आणि चेतना प्रगत होते. आपले भटकणारे मन स्थिर होते. अर्ध्या एक तासाच्या उच्चारणामुळे देखील मन आत्म केंद्रित आणि सात्विक गुणधर्माचे बनते आणि भटकणे बंद होते. विश्राम प्राप्त होण्याचा तो एक नैसर्गिक मार्ग आहे.

ललिता सहस्त्रनामामधील भाषेचे काय वैशिष्ट्य आहे? | What is remarkable about the language of the Lalitha Sahasranama?

सहस्त्रनामाला एक आगळे भाषा सौंदर्य आहे. ती भाषा सुंदर, खोल अर्थपूर्ण आणि वेगळ्या लिपीत उपलब्ध आहे. उदा. कमल नयनी म्हणजे सुंदर आणि शुध्द दृष्टी. कमळ चिखलात उगवले तरी ते सुंदर आणि पवित्र असते. कमल नयनी म्हणजे जी या जगात राहते आणि तरीदेखील सर्व समस्यांशिवाय सुंदर आणि पवित्र राहते.

ललिता सहस्त्रनाम वाचकाला (पठण करणाऱ्याला) त्यातील अर्थ आणि मतितार्थ या दोहोंचे विविध गुणधर्म प्राप्त होऊन अंतर्ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. यातील विविध संदर्भ आणि गुणधर्म परस्परसंलग्न आहेत. या संलग्नतेमुळे एक वैशिष्ट्यपूर्ण असा वेगळा दृष्टीकोन प्राप्त होण्यास मदत होते.

हे ध्यानात असू द्या कि आपण एका सुंदर आणि उच्च अश्या उदिष्ट्यासाठी पृथ्वीतलावर जन्माला आलो आहोत. ललिता सहस्त्रनामाच्या सजगता आणि श्रद्धापूर्वक पठणामुळे आपणास चेतनेची शुद्धी प्राप्त होऊन आपण सकारात्मकता, चैतन्य आणि आनंदाची खाण बनतो. तेंव्हा याचा आनंद घेऊया आणि या विश्वाला आनंद देऊया.

ललिता सहस्रनाम स्तोत्र | Lalitha Sahasranamam Full Stotram

लेखिका : भानुमती नरसिंहन, गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या भगिनी आणि ध्यान प्रशिक्षिका. संचालिका, आर्ट ऑफ लिविंग महिला आणि शिशु कल्याण आणि कार्यक्रम.

हा लेख ललिता सहस्त्रनाम या पुस्तकातून घेतला आहे जे आपण Sattvastore.com येथे खरेदी करू शकतो.

नवरात्री संबंधित अन्य लेख

  1. चंडी होम | Chandi Homa
  2. नवरात्रीच्या पूजांची तयारी कशी केली जाते ? | Preperations for Homa during Navratri
  3. नवरात्रीत होणारे ७ होम कोणते ? | Benefits of Homa performed in Navratri
  4. नवरात्रीतील मौन | Silence during Navratri in marathi
  5. नवरात्र उत्सवाची भारतभरातील विविधता | Different Ways Of Celebrating Navratri Across India
  6. आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व | 5 reasons to include mantras in your daily playlist
  7. नवरात्रीतील उपवासाचे महत्व | Importance of fasting during Navratri
  8. २०१८ च्या नवरात्री मध्ये ९ रंगांचे महत्व | Colors of Navratri in Marathi
  9. ललिता सहस्त्रनाम : तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One
  10. देवी तत्व जाणून घेऊया | Understanding Devi
  11. आयुध पूजेचे महत्त्व | शस्त्र पूजनाचे महत्व | Significance of Ayudha Pooja in Marathi

ज्ञानासंबंधी अधिक लेख वाचा | Read more on wisdom

योगाबद्दल अधिक वाचा | Read more about Yoga