एकाग्रता सुधारण्यासाठी ध्यान

आपण एखादा कलाकार, व्यावसायिक, विद्यार्थी किंवा खेळाडू असा, किंवा आपल्या क्षेत्रातील सर्वात कुशल असा. तरीही तुमची कार्यक्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता ही शेवटी तुमच्या एकाग्रतेच्या किंवा लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.

तुम्ही कितीही प्रतिभावान किंवा तुमच्या क्षेत्रातील तज्ञ-दिग्गज असला तरीही आयुष्यात अशी काही आव्हाने किंवा आश्चर्ये येतात की मन एकाग्र करणे खूपच आव्हानात्मक बनते. अशी अवस्था कधीकधी काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षेसुध्दा टिकते. तसेच आजच्या काळातील सतत आणि कायम असणारी स्पर्धा आणि ताण हा मनाच्या एकाग्रतेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. एकूणच कामगिरीवर याचा परिणाम होतो आणि त्या बदल्यात आपल्या स्वास्थ्यावर आणि ख्यालीखुशालीवर परिणाम होतो.

बरेच लोक लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा एकाग्रता साधण्यासाठी खूप संघर्ष करतात. एकाग्रता भंग पावण्यासाठी खूप वेगवेगळी कारणे आहेत. उदा. थकवा, औदासीन्य, काळजी, चिंता. लक्ष केंद्रित न होणे किंवा एकाग्रता नसणे ही प्रामुख्याने विखुरलेल्या आणि अस्वस्थ मनाची अवस्था आहे. आपण आपल्या मनास एकाग्र करण्याचे प्रशिक्षण कसे देऊ शकाल?

एकाग्रता ही नैसर्गिक असते. केवळ मनाला विश्रांती किंवा आराम देऊन एकाग्रता नैसर्गिकरित्या वाढविणे शक्य आहे. मनाला आराम देण्यासाठी किंवा विश्रांती देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आवडी निवडी असू शकतात. परंतु तुम्ही निवडलेले साधन मनाची एकाग्रता टिकून ठेवेलच असे नाही. एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी ध्यानधारणाद्वारे मनाला विश्रांती देणे अत्यावश्यक आहे. या सोप्या प्रक्रियेचे बरेच फायदे आहेत आणि त्याच्या उप-उत्पादनांमध्ये सुधारित एकाग्रता, वर्धित बुद्धी आणि विचारांमधील स्पष्टता यांचा समावेश होतो.

एकाग्रता सुधारण्यासाठी ध्यानच का?

अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ध्यानधारणा करण्याचा नियमित सराव केल्याने लक्ष वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते. ध्यान  आपल्याला वर्तमान काळात राहण्यास अधिक सक्षम करते. विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ध्यानाचा सराव करणारे लोक हे त्यांच्यापुढे आलेले लक्ष विचलित करणारे अडथळे बाजूला सारून प्रायोजित कार्य पूर्ण करण्यास अधिक सक्षम असतात. आपण बर्‍याचदा ऐकतो की ध्यान करण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. परंतु, गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात की ध्यान करणे म्हणजे मन एकाग्र करणे नव्हे. सतर्कता आणि मनाचे लक्ष हे नियमित ध्यानसाधनेचे परिणाम आहेत. ध्यान आपल्याला फक्त एकाग्रता वाढविण्यासच नाही तर एकाग्रतेची शक्ती किंवा क्षमता वाढविण्यास मदत करते.

 

ध्यान आणि एकाग्रता सुधारण्यासाठीच्या सूचना:

अ. श्वासाचे निरीक्षण करणे:

श्वास हा प्राणिमात्र किंवा जीवन शक्तीचा मुख्य स्रोत आहे. आपल्या श्वासाचे निरीक्षण करून आणि श्वासाबद्दल जागृत होऊन आपण शांततेचा अनुभव घेऊ शकता. प्रथमतः आपल्यासाठी एक शांत जागा निवडा. नंतर आपल्या श्वासाच्या नैसर्गिक लयीचे निरीक्षण करा. त्यानंतर ध्यान करा. आपण येथे दिलेल्या कोणत्याही प्रकारे ध्यान करून स्थिर आणि शांत मनाचा अनुभव घेऊ शकता. 

ब. प्राणायाम 

प्राणायामात प्रामुख्याने आपण श्वास आत घेतो, रोखतो, आणि सोडतो. आपली अल्प आणि दीर्घकालीन उर्जा वाढविण्यासाठी प्राणायाम हा एक मार्ग आहे. आपण ध्यान करणे सुरू करण्यापूर्वी काही मिनिटांसाठी नाडीशोधन प्राणायाम करू शकता. प्राणायाम मनाला आनंदी, एकाग्र आणि शांत ठेवण्यास मदत करतो. 

क. सुदर्शन क्रिया 

सुदर्शन क्रियेमध्ये श्वासाच्या विशिष्ट नैसर्गिक लयींचा समावेश आहे ज्यामुळे शरीर, मन आणि भावना समक्रमित होतात. सुदर्शन क्रिया हे श्वास घेण्याचे एक अतिशय शक्तिशाली पण खूप सोपे तंत्र मनातील तणाव दूर करून मन शांत आणि एकाग्र करण्यास मदत करते. संशोधनाद्वारे असे आढळले आहे की सुदर्शन क्रिया नियमित करणाऱ्या व्यक्तींना रोग प्रतिकारशक्ती, तग धरण्याची क्षमता आणि निरंतर उच्चऊर्जेची पातळी प्राप्त होते.

ड. एकाग्रता प्राणायाम

अडीच मिनिटांचे हे तंत्र तीन तास एकाग्रता टिकवून ठेवण्यास आणि सुधारण्यात मदत करू शकते. लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी खास बनवलेल्या आर्ट ऑफ लिविंगच्या कार्यक्रमांमध्ये हे तंत्र शिकवले जाते. एकाग्रता प्राणायाम विचलितता कमी करण्यात आणि एकाग्रता सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

एकाग्रता वाढविण्यासाठीच्या अजून काही सूचना

१. व्यायाम किंवा योगासने

व्यायामामुळे मन शांत रहाते. सूर्यनमस्कार किंवा योगासनांचा अभ्यास स्थिर गतीने करा. योगासने करताना प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्या आणि प्रत्येक अवयव ताणताना त्यास श्वासोच्छवासासह समक्रमित करा. असे म्हटले जाते की केवळ २० मिनिटांच्या योगासनांच्या अभ्यासामुळे मेंदू कार्यरत होऊन मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते. म्हणूनच मन एकाग्र करण्यासाठी योगाभ्यास हा एक नैसर्गिक मार्ग आहे.

2. आरोग्याला पोषक अन्न खा

असे म्हणतात की तुम्ही जसे अन्न खाता तसेच तुम्ही बनता. आपण खाल्लेल्या अन्नाचा परिणाम फक्त शरीरावरच नाही तर मन, विचार, बुद्धी आणि जागरूकतेवरदेखील होतो. आपली स्मरणशक्ती आणि बुद्धी तेज आणि आपला रागरंग उत्साही राहण्यासाठी निरोगी आहार आवश्यक आहे. आपल्या जंक फूड सेवनावर आपले कायम बंधन ठेवावे. बऱ्याच तज्ञांनी मांसाहार देखील न करण्याचा सल्ला दिला आहे.

३. वर्तमानात जगा 

एकाग्रता वाढविण्यासाठी ही एक महत्वाची प्रथा आहे. ज्या क्षणी आपल्या लक्षात येते की मन भरकटलेले आहे, त्यास आपला श्वासोच्छ्वास वापरुन वर्तमान क्षणाकडे परत आणा. मन वर्तमानात आणण्याच्या क्रियेलाच जीवनाचा मार्ग बनवा.

आपल्यासमोरील आव्हाने

मनाला शांत आणि केंद्रित करण्यासाठी आपण कधी वेळ काढून आपल्या दिवसाचे वेळापत्रकाचे निरीक्षण केले आहे का?

  • आपण काय वाचता?
  • आपण टीव्ही किंवा लॅपटॉप समोर किती वेळ घालवता?
  • आपण कोणत्या प्रकारच्या मित्र-मंडळींसोबत किंवा कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर दिवसभर वावरता?

काल्पनिक कथा, मासिके, जाहिराती किंवा मनाला त्रास देणाऱ्या बातम्या पाहिल्याने किंवा वाचल्याने मन अधिक बेचैन होते. टीव्ही आणि इंटरनेटमुळे मन गोंधळून जाते आणि निरर्थक प्रसंग मनात घर करतात.

त्याऐवजी तुम्ही

  • आपल्या दिवसात किंचित हलके आध्यात्मिक वाचन समाविष्ट करा.
  • प्रेरणादायक, चांगले विचार उद्युक्त करणाऱ्या कल्पना, तत्वज्ञान यांवर विचार करा.
  • निसर्गाच्या सानिध्यात चक्कर मारा. 

ह्यामुळे मन स्थिर आणि एकाग्र होण्यास मदत होते.

दैनंदिन जीवनातील बर्‍याच क्षेत्रांमध्ये मन एकाग्र करण्यामुळे दूरगामी फायदे होतात. मन एकाग्र करण्यासाठी रोज थोडा वेळ अभ्यास करणे फायदेशीर आहे. आपण जाणीवपूर्वक लक्ष एकाग्र करण्याचा शेवटचा प्रयत्न कधी केला होता? आजच स्वतःमध्ये पाहू इच्छित असलेल्या फरकाकडे लक्ष देण्यासाठी पाऊल उचला.

आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम आपली आंतरिक उर्जा उत्तेजित करून समर्पण भावाने उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत करू शकते. हॅपीनेस प्रोग्राममध्ये योगासन सारख्या नैसर्गिक पद्धती आणि सुदर्शन क्रियेसारख्या श्वासोच्छवासाच्या क्रियांचा समावेश आहे. ह्यामुळे आपले भटकते मन शांत होऊन एकाग्रता वाढते आणि अर्थपूर्ण आणि इच्छित स्थळी जाण्यास मदत होते.