ध्यान- मोफतची सुट्टी (Meditation retreat in Marathi)

प्रत्येक दिवस रविवार असावा. मी कामामध्ये खूपच व्यग्र झालो आहे. मला सुट्टीची गरज आहे. खरोखरच या धका-धकीच्या जीवनात सुट्टी साठी वेळ आहे.? तुम्ही मला चिडवताय. तुम्हाला कल्पना आहे ना. तीन-चार दिवस डोंगर माथ्यावरची सुट्टी केवढ्याला पडते. कित्येक महिने पैसे साठवून देखील जाऊ शकत नाही. आता एखादा देवदूत पृथ्वीवर यावा आणि त्यानेच त्याच्या पाठीवर बसवून विना खर्चिक प्रवासाला न्यावे.

हाच संवाद तुम्ही वारंवार स्वतःशीच किंवा आपल्या मित्राशी करताय ना...ठीक- परंतु एक आनंदाची बातमी हि आहे कि विना खर्चिक सुट्टीचा प्रवास नक्कीच शक्य आहे आणि तुम्ही स्वतःच स्वतःचे देवदूत बनू शकता.

जीवनातील एका छोट्या सुट्टीवर तुम्ही रोज जाऊ शकता- करायचे काय आहे- तुमचे डोळे वीस मिनिटांसाठी बंद करून ध्यान करा आणि तुमच्या आतील प्रवास सुरु.

स्वतःचे प्रवासी मध्यस्थ बना- सर्वोत्तम पर्याय जिंका.

ध्यान करणे म्हणजे आपला अंतर्गत प्रवास सुरु करणे- हा एकच सर्वोत्तम पर्याय  आहे जो इतर कोणीही ट्रॅव्हल-एजंसी तुम्हाला देऊ शकत नाही. रोज सुट्टीचे लाभ देणारा (उदा. - मानसिक शांती जिच्यामुळे तुम्ही शांत आणि आनंदी व्हाल, कार्यक्षम बनाल शिवाय “ वेळेचे नियोजनाचे कौशल्य विकसित होईल”) हा पर्याय तुम्हाला मोफतच मिळणार आहे.

आदिती वशिष्ठ म्हणतात, “मला माहित आहे, तणावग्रस्त दिवसामध्ये सहज समाधी ध्यानामुळे मी विश्राम करून पुन्हा ताजी-टवटवीत होऊ शकते. हा सर्वोत्तम पर्याय आहे जो मी स्वतःला दिलेला आहे, दररोज सुट्टी.”

रोज वेगळी सुट्टी!!!

सुट्टीच्या निरनिराळ्या अनुभवांसाठी निरनिराळ्या स्थळांना भेट देणे गरजेचे असते. तुमचे दैनंदिन ध्यान मात्र तुम्हाला दररोज वेगवेगळे अनुभव देते. यामुळे कोणताही सुट्टीच्या नियोजना शिवाय दररोज नवीन प्रवासास गेल्याचा अनुभव मिळतो. आपल्याला निव्वळ वीस मिनिटे डोळे बंद करून बसल्याने या प्रवासाचे सौंदर्य प्राप्त होऊ शकते.  “ पूर्वी मी विविध अनुभवासाठी वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना जात होते. परंतु आता दररोजचे ध्यान केल्याने मला रोज नव--नवीन अनुभव घर बसल्या मिळतात.”- दीप्ती सचदेव

अशी सुट्टी जी तुमची दमछाक करत नाही

अशा सुट्टीची कल्पना करा- एका सुंदर सकाळी पर्वताच्या टेकडीवर उभे आहात, चहूकडे हिरवीगार झाडी, पक्षांची किलबिल जणू भासावे कि निसर्गाचे गीत गाताहेत, हवेची थंडगार झुळूक. अशावेळी काय होते, असे वाटते कि डोळे बंद करावे आणि या अशा क्षणांच्या चक्क प्रेमात पडावे. या अश्या क्षणांना कायमचे कैद करून ठेवावेसे वाटते. कारण अश्या क्षणांमध्येच तुम्ही खोलवर स्वतःमध्ये उतरलेले असता. ध्यान तुम्हाला हाच अनुभव देते.

सुट्टीला “आराम” म्हणतो, कारण ती आपल्याला विश्राम देत असते परंतु बहुतांशी वेळा तुम्ही सुट्टीवरून थकून-भागून परत येता आणि तुम्हाला आणखी एक दिवसाच्या विश्रांतीची गरज भासते.

ध्यान एक वेगळी सुट्टी आहे जी तुम्हाला थकवत नाही तर ध्यानामध्ये तुम्हाला अशी खोलवर विश्रांती प्राप्त होते की, ध्यानानंतर तुम्ही ताजे तवाने होऊन कितीही काम करू शकता. अर्चा घोडगे म्हणतात, “दररोज मी स्वतःला काही मिनिटांच्या ध्यानाची सुट्टी देते, जिच्यामुळे माझा दिवस उत्साहाने, हसऱ्या चेहऱ्याने आणि न थकवणारा असा सुरु होतो.

अल्प वेळेमध्ये जादा लाभ

ज्यांच्यासाठी वेळ हाच पैसा आहे आणि ध्यानाची वीस मिनिटे देखील आर्थिक लाभासाठी गुंतवू इच्छीतात, त्यांना मी म्हणेन कि ही वीसच मिनिटे ध्यानासाठी वापरा आणि उर्वरित वेळ अत्यंत परिणामकारकरित्या जादा पैसे कमवण्यासाठी वापरू शकता कारण ध्यानामुळे तुम्ही आणखी शांत आणि अधिक कार्यक्षम बनता. तसेच तुम्हाला वेळेवर नियंत्रण प्राप्त होऊन, वेळेला तुमच्या इच्छेप्रमाणे नियोजित करणे सोपे जाते. किरण सिंह म्हणतात कि, “ माझ्या नोकरीमध्ये मला सतत एका नंतर एक वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. पूर्वी मला वाटायचे कि,ध्यानामधील ती वीस  मिनिटे वाया जातील, परंतु दररोजच्या ध्यानामुळे असे वाटते कि मी चांगले निर्णय घेऊ शकत आहे आणि मी जादा पैसे मिळऊ शकतो.

सुट्टीला जायला तयार?

मग तयार आहात तुम्ही अशा सुट्टीसाठी..! छान. तुमचा सीट-बेल्ट नीट लावा आणि सुरुवात करा प्रवासासाला. आरामदायी वाटणारी जागा निवडा. या प्रवासाला तुम्ही एकटे किंवा तुमच्या इतर ध्यान प्रेमी सहकाऱ्यांना निमंत्रित करू शकता. समुदायिक ध्यानामुळे गहन अनुभव मिळू शकतो. दिवसातील कोणत्याही वेळी जरी हा प्रवास सुरु करु शकत असला तरी, सकाळची वेळ उत्तम कारण त्यामुळे तुम्हाला दिवसभर शांत-स्थिर राहण्यास मदत होईल.

या सुट्टीसाठी धीर धरू शकत नाही ना..? लवकरात लवकर तुमच्या जवळपास “सहज समाधी ध्यान” शिबीर कोठे आहे पहा. तसेच तुम्ही तुमच्या आय-पॅड वर ध्यान डाऊनलोड करू शकता किंवा बुकमार्क करू शकता.

श्री श्री रविशंकरजी यांच्या ज्ञानचर्चेमधून प्रेरित

लेखिका दिव्या सचदेव

रेखाचित्रे – नीलाद्री दत्ता

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf

Get to learn Meditation