ध्यान केल्याने बुद्ध्यांक वृद्धिंगत होतो (Meditation increases intelligence in Marathi)

जर तुम्ही तुमच्या जीवनाचे सिंहावलोकन केले तर तुम्हाला दिसून येईल की असे अनेक क्षण होते जेव्हा कोणीतरी तुम्हाला म्हणाले, “तुम्ही भलतेच बुद्धिमान आहात!”, “चलाख शक्कल लढवलीत!”, किंवा “तुम्ही एक बुद्धिमान व्यक्ती आहात.” अशा क्षणी स्वतःबद्दलचा अभिमान, कौतुक आणि आत्मविश्वासाने आपली छाती फुलून जाते. असे वरचेवर व्हावे असे तुम्हाला नाही का वाटत? तुमचे दैनंदिन कार्य करताना तुम्ही अधिक हातोटीने, अधिक कुशलतेने करायला तुम्हाला आवडेल का आणि असंख्य ताऱ्यांमध्ये तुम्ही पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असावे असे तुम्हाला नाही का वाटत? आपण सर्वांना हे सर्व नक्कीच हवं असतं, बरोबर? असा बदल घडून यायला मार्ग अगदीच सोपा आहे. त्याचे गुपित आहे नियमित ध्यान करणे. नियमित ध्यान केल्याने मनाला वंगण मिळते आणि मग तुमचे मन अधिक कार्यक्षम आणि अधिक मननशील होते.

#१ – स्फटिकासारखे निर्मळ मन

आपले मन हे गतकाळातील विचार आणि अनुभव, भविष्याच्या अपेक्षा, आणि वर्तमानकाळातील व्यवहार यांचा आरसा असते. त्याला संपूर्णपणे कामाला लावणे आणि त्याला परिणामकारक ठेवणे हे अतिशय अवघड काम आहे. ध्यानामुळे या प्रवृत्तींना आळा बसतो. तुमच्या अस्तित्वाच्या मुळाशी संपर्क राहतो आणि तुम्ही नैसर्गिक राहता. ध्यान म्हणजे साध्या शब्दात मनाची साफसफाई : केर-कचऱ्याला बाहेर काढून टाकणे, तुमच्या तुमच्यातील प्रतीभा / कलागुणांना विकसित  करते आणि तुम्हाला तुमच्या स्वयंच्या संपर्कात आणते. नियमित ध्यानाचा परिणाम म्हणजे मानसिक भार हलका झाल्याचे जाणवते आणि आपण सर्व गोष्टींकडे मोठ्या दृष्टीकोनातून पाहायला लागतो. जेव्हा तुमचे मन निर्मळ असते आणि तुमच्या प्रवृत्तींचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसतो तेव्हा प्रसंगानुसार मनाला सद्यपरिस्थितीत / वर्तमानात आणणे आणि अधिक संवेदनशील असणे सोपे होऊन जाते. ध्यानामुळे तुमच्या विचारांची गुणवत्ता सुधारण्यात मदत होते.

#२– केंद्रित होणे आणि एकाग्रता

आपल्या शरीरामध्ये अमर्याद उर्जेचे शक्तिशाली स्रोत आहे हे एकदा कधी न कधी आपल्या ध्यानात आले आहे. आपल्या सर्वांना हे माहित आहे की आपल्या आतमध्ये भरपूर शक्ती आहे जी अतुलनीय आहे. याचा आपल्याला जितका जास्त अनुभव येतो तितके अधिक आपण बलवान बनत जातो. त्याने आंतरिक शक्ती आणि स्थिरचित्तता ठेवण्यात मदत होते आणि त्यामुळे मन भक्कम बनते. ध्यानाच्या नियमित सरावाने तुमचे मन अतिशय तीक्ष्ण बनते. त्याने तुम्ही एकदम केंद्रित होता, तुमचे मन शिथिल राहते आणि त्यामुळे तुम्हाला तुमची कार्ये सफलपणे पार पडता येतात. “तुमच्या मनाच्या स्थितीवर तुमच्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून आहे”, श्री श्री रवीशंकर. या जगात काय घडते यावर आपण नियंत्रण नाही ठेऊ शकत, परंतु आपण ध्यानाद्वारे आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेऊ शकतो.

#३ – अंतर्ज्ञानी मन

काही शांत क्षण असे असतात जेव्हा आपल्या आतून एक आवाज ऐकू येतो जो काही तरी विलक्षण विचार-कल्पना देउन जातात. त्या काही क्षणांमध्ये आपली आकलनशक्ती पूर्णपणे विस्तारलेली असते. हे सगळं अगदी सहजपणे होते. हे विचार तुमच्या अंतःप्रेरणेमधून येतात. तुम्हाला वाटते की सर्वकाही त्या अंतःप्रेरणेमधून होत आहे. अश्या अंतर्ज्ञानाला मानवी मनाला मिळालेला वरदान समजले जाते. संशोधनाने हे सत्य सिद्ध केले आहे की अंतर्ज्ञानी मनामुळे आपण अधिक विचारी, धोरणात्मक आणि तीक्ष्ण बनतो. अ जीवनसत्व मिळवण्यासाठी गाजर खाणे गरजेचे आहे तसेच अंतर्ज्ञानाकरिता ध्यान हे तसेच आहे. ते तुमच्या मूळ विचारशक्तीला खतपाणी घालते आणि तुम्ही आत्म्याशी अधिक जोडलेले राहता.

सारा डब्ल्यू लाझर आणि नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, युएसए येथील त्यांच्या टीमनी केलेल्या स्वतंत्र संशोधनात त्यांना असे आढळले की ध्यानामुळे प्रमस्तिष्काची जाडी वाढण्यात मदत होते, यामुळे तुमचे लक्ष अधिक केंद्रित होण्यास मदत होते. ऐलीन लुडेर्स यांनी आणखी एक संशोधन करून सिद्ध केले की ध्यानामुळे जे मेंदूतील करड्या द्रव्यामध्ये वाढ करते आणि मेंदूमधील करडे द्रव्य हे विचार क्षमतेचे मुख्य स्रोत आहे.

 

#४ – सृजनशीलतेचा स्फोट

सृजनशीलतेचा विस्फोट झाल्याचे तुम्ही कधी अनुभवले आहे का? तळ्याकाठी फिरत असताना, अंघोळ करत असताना, रपेटीला गेले असताना, किंवा तुमची आवडती धून ईयरफोनवर ऐकत असताना. विनासायास, शिथिल आणि समाधानी असणे म्हणजेच नियंत्रण सोडून देणे हेच सृजनशीलतेचं गुपित आहे. “नियंत्रण करणे हे फार थकवा आणणारे आहे, तर मेंदूच्या प्रतिमांवर संशोधन केले असता असे दिसून आले की शिथिलता ही झीज तर भरून काढतेच शिवाय त्यामुळे स्मरणशक्तीमध्ये वृद्धी होते आणि बौद्धिक पातळी उंचावते” असे एम्मा सेप्पाला, सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि कॅलिफोर्नियातील स्टँनफोर्ड विश्वविद्यालय येथील संशोधिका यांचे म्हणणे आहे. तुम्ही जितके अधिक सृजनशील असाल तेवढे कामाच्या ठिकाणी तुम्ही अधिक अद्वितीय बनाल आणि तुमची अपरिहार्यता वाढेल. ध्यान तुम्हाला अधिक शिथिल होण्यात आणि त्याद्वारे अधिक सृजनशीलबनण्यात मदत करते.

#५ – मध्यम मार्ग

या गल्लीच्या नाक्यावर जे पिझ्झाचे हॉटेल आहे तिथे तो नीट बेक केलेला पिझ्झा तुम्हाला फारच आवडतो कारण त्यात योग्य ब्रेड, चांगल्या कापलेल्या भाज्या योग्य प्रमाणात असतात, चविष्ट चीझ असते आणि स्वादिष्ट सॉस असतो आणि चिमुटभर मसाले आणि तिखट असते ज्याची चव एकदम न्यारी असते. अद्वितीय आणि तल्लख विचार हे पण तसेच असतात. त्यांना संतुलित करणे आणि त्यांचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे. त्यांची स्वतःची एक विशिष्ठ शैली असते. ध्यान ही  शैली आणि या विचारांचे संतुलन राखण्यात मदत करते. ध्यान हे तुमचा डाव्या बाजूचा मेंदू आणि उजव्या बाजूचा मेंदू यांच्यामध्ये कमालीचे संतुलन निर्माण करते ज्यामुळे भावना, वस्तूनिष्ठता, तर्क आणि मीमांसा हे सर्व योग्य प्रकारे उत्पन्न होतात, ज्यामुळे तुम्ही नीट विचार तर करू लागताच शिवाय तुमच्या विचारात एक प्रकारची शांतता निर्माण होते. “ध्यानाबरोबर माझा परिचय ३ वर्षांपूर्वी झाला. तेव्हापासून मी नियमित ध्यान करीत आहे. व्यवसायाने मी डिझायनर. आहे आणि या व्यवसायात जीवघेणी स्पर्धा असल्याने, इथल्या वेगात टिकायचे असेल तर आपल्याला सतत नवनवीन शोध लावणे अत्यावश्यक आहे. ध्यानामुळे मी स्वतःचे संतुलन टिकवून ठेवून माझ्या गिऱ्हाईकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो.” असे प्रकाश यांचे म्हणणे आहे.