स्त्रियांसाठी मानसिक ताण घालवणारी योगासने

देवाने बनवलेल्या स्त्री आणि पुरुष या दोघांपैकी स्त्रीवर कुटुंबाची जास्त जबाबदारी पडते. मग ती मुलांची आणि कुटुंबाची जबाबदारी पेलणारी गृहिणी असो की नोकरी करणारी स्त्री असो, तिला ‘कुटुंबाचा कणा’ म्हणता येईल, जी जी घराची जबाबदारी अगदी एखाद्या व्यवस्थित तेल पाणी घातलेल्या माशिन्सारखी पेलत असते. घरातील स्त्री प्रवासाला गेलेली असेल किंवा काही कामानिमित्त बाहेर असेल अशा घरात दुर्लक्षित मुले, वृद्ध माणसे आणि घराची पूर्णपणे कोलमडलेली व्यवस्था बरेचदा बघायला मिळते !

घर चालवण्याची जबाबदारी, मुलांची काळजी घेणे, बाजार हाट करणे आणि नोकरीची कसरत करणे यात स्त्रिया खूपच थकून जातात. प्रसिद्धी माध्यमांनी आणि चित्रपटांनी रंगवलेली असामान्य स्त्री किंवा उत्तम व्यवसाय करणारी स्त्री होण्याच्या नादात किंवा सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात, किंवा एक चांगली बायको, सून, मुलगी, मैत्रीण होण्यासाठीचा प्रयत्न, अशा न संपणाऱ्या यादीच्या दाबावा खाली स्त्री खचून जाते.

तणावपूर्ण जीवनशैली आणि लक्षणीय कामगिरी करून दाखवण्याचा प्रयत्न याचा आज बऱ्याच स्त्रियांवर दबाव येत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे कालांतराने येणारे नैराश्य. या सर्व आव्हानांचा विचार कर्ता त्यांना या नैराश्यातून आणि मानसिक ताणावावातून बाहेर कसे काढायचे याचा विचार करुया.

योगिक ध्यान

योगिक ध्यान हा एक बोजड शब्द वाटतो. खरे तर, स्वत:शी असलेले नाते पुन्हा एकदा जाणून शांत आणि स्थिरचित्त होण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे. शांत व्यक्ती खूप जास्त कार्यक्षम, कामात चांगली, उत्तम गृहिणी, आकर्षक विश्वासू आणि भरवशाची असते. नियमितपणे रोज पंधरा मिनिटे ध्यान स्त्री तिचे ताण तणाव, समाजाकडून अश्लील अपेक्षांचे ओझे, ‘सोडून देऊ’ शकते आणि त्यामुळे तिला प्रचंड भावनिक शक्ती मिळू शकते.

आजच्या महिला नातेसंबंध आणि नोकरी व्यवसायात अनेक आव्हानांना धैर्याने तोंड देत असतात. अशावेळी ध्यानामुळे स्त्रियांची प्रतिक्षिप्त क्रिया होण्याच्या ऐवजी त्या प्रतिसाद देऊ लागतात. तसेच त्यामुळे नकारात्मक भावना, कृती आणि बोलणे याबद्दल त्या सजग होतात.

पद्मासन आणि वज्रासन यासारखी ध्यानासाठी असलेली साधी आसने आणि सोबत ध्यानमग्न श्वास याने प्रचंड फायदा होतो.

सूर्यनमस्कार आणि आरोग्य

निरोगी नसलेले मन आणि शरिर यामुळेही तणाव वाढू शकतो. जेव्हा स्त्री आजारी किंवा चांगल्या मनस्थितीत नसेल त्यावेळी ती ते सगळे कुटुंबियांवर काग्न्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मग घरात वादावादी, ताण वाढतो. सूर्यनमस्कार घालण्याने मन निवांत, मोकळे व्हायला मदत होते. जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी १० ते १५ मिनिटे सूर्यनमस्कार घालायला हवे. यात असलेली सर्व आसने सावकाश करावी आणि प्रत्येक आसनात श्वासावर आणि शरीराला दिलेल्या ताणावर लक्ष देत १० ते १५ श्वास पर्यंत थांबावे.

नोकरी- व्यवसाय, घर, मुले आणि घरातील जेष्ठांची काळजी घेणे असे धावपळीचे आयुष्य असणाऱ्या स्त्रियांनी हे जाणले पाहिजे की जीवनात जास्तीत जास्त गोष्टी करून त्याचा पूर्ण उपभोग घेण्यासाठी ‘माझा स्वत:चा वेळ’ असणे आवश्यक आहे, जो वेळ त्या आपल्या आध्यात्मिक आणि शारीरिक कल्याणासाठी देऊ शकतील. योग हा शारीरिक तंदुरुस्ती देणारा आणि आत्म्याला त्याच्या मूळ स्रोताशी जोडणारा असा सर्वंकष मार्ग आहे.

योगासाधानेमुळे शरिर आणि मन यांच्या आरोग्यास अनेक फायदे होतात पण तो औषधोपचारास पर्याय नाही. तज्ञ योग्शिक्षाकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर काही आजाराची लक्षणे असतील तर डॉक्टर आणि योग प्रशिक्षक यांच्या साल्यानेच योगसाधना करावी.