निरोगी हृदयासाठी २० आसने (Yoga postures for healthy heart in Marathi)

योगासने करणे ही श्वासावर लक्ष ठेवत विविध आसनात विश्राम करण्याची कला आहे. परिणामी प्रत्येक आसनाचा श्वसनसंस्थेवर आणि त्यामुळेच हृदयावरही विशिष्ठ परिणाम होतो.

खालील आसने सुरवातीला साधी आणि हळू हळू जास्त दम आणि बळ लागणारी अवघड आसने आहेत.आसनांच्या शेवटी शरीर विश्रांत आणि पुनरुज्जीवित होते.

१. ताडासन

या आसनाने हृदय बळकट होते आणि शरीर लवचिक होते.

TRee pose

२. वृक्षासन

हे आसन मन शांत करून मनाचे संतुलन साधते. शांत मनामुळे हृदय स्वस्थ आणि निरोगी बनते.

 
Utthita Hastapadasana

३. उत्थित हस्तपादासन

या आसनात तोल सांभाळण्यासाठी खूप शक्ती आणि एकाग्रता लागते.

Trikonasana

४. त्रिकोणासन

हे उभे राहून छाती फुलवणारे आसन आहे ज्यात हृदय व रक्तवाहिन्यांना व्यायाम मिळतो. खोल श्वास घेताना छाती फुलवली गेल्यामुळे तग धरण्याची क्षमता वाढते.

 
warrior pose

५. विरभद्रासन

यात शरीराचा तोल सांभाळला जातो आणि तग धरण्याची क्षमता वाढते. मन शांत होते.मनावरचा ताण कमी होतो आणि छातीचे कार्य नियंत्रणात रहाते.

Chair pose

६. उत्कटासन

यात हृदयाचे ठोके आणि श्वासाची गती वाढलेली जाणवेल. उष्णता वाढवणारे आणि मजबुती आणणारे हे आसन आहे.

 
Cat pose

७. मार्जारासन

उत्कटासना नंतर करण्यासाठी हे चांगले आहे. याने हृदयाचे ठोके पूर्ववत होऊन शांतपणे आणि पुन्हा लयीत सुरु रहातील.

Dog Pose

८. अधोमुख श्वानासन

हे आसन विश्रांती आसन म्हणून केले जाते. याने शरीर शांत होऊन शक्ती वाढते.

 
Cobra Pose

९. भुजंगासन

या आसनाने छातीला बळकटी येते आणि ‘स्फिंक्स’ पुतळ्याप्रमाणे असलेल्या आसनामुळे जास्त शक्ती लागते.

Bow pose

१०. धनुरासन

संपूर्ण शरीराला चालना देणारे आणि शक्ती लागणाऱ्या या आसनाने छातीचा भाग मोकळा होऊन बळकटी येते.

 
Bridge Pose

११. सेतूबंधासन

यात धनुरासानापेक्षा कमी शक्ती लागते. यात दीर्घ श्वसन केले जाते.छातीकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो.

Half Shoulder stand

१२. सालंब सर्वांगासन

हे आसन, अनिच्छावर्ती स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जातंतूंच्या संदेशानंतर त्या स्नायूंकडून काम करून घेणाऱ्या मज्जासंस्थेला शांत करते आणि सक्रिय बनवते.

 
Sitting Half Spinal twist

१३. अर्ध मत्स्येन्द्रासन

संपूर्ण पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो आणि छातीच्या दोन्ही बाजू मोकळ्या होतात..

Paschimottanasana (Two-legged forward bend)

१४. पश्चिमोतानासन

बसून पुढे वाकण्याचे हे आसन विश्रांती आसन म्हणून केले जाऊ शकते. पुढे वाकताना डोके छातीपेक्षा खाली जात असल्यामुळे हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास नियंत्रित होतात आणि विश्रांती मिळते.

 
Stick Pose

१५. दंडासन

या आसनाने उभे रहाण्याची ढब सुधारते, पाठीला बळकटी येते त्याचप्रमाणे छाती आणि खांदे ताणले जातात.

१६. मकरासन

हे आसन अधोमुख श्वानासनापेक्षा जरासे अवघड आहे. याने सामर्थ्य वाढते आणि शरीराच्या वरच्या भागाला बळकटी येते आणि छातीसाठी असलेल्या इतर आसनांची पूर्वतयारी होते.

 

१७. मकरासन

या आसनाने रक्ताभिसरण पूर्ववत सुरु होते.

 

१८. स्फिंक्स पुतळ्याप्रमाणे आसन

या आसनाने छाती फुलवली जाते. यात किंचित मागे वाकले जाते त्यामुळे छाती फुलते आणि, फुफ्फुसे आणि खांदे ताणले जातात.

 

Shavasana  

 

१९. शवासन

सर्व आसनांवर उतारा असणाऱ्या या आसनाने सखोल विश्रांती मिळते आणि संपूर्ण शरिरसंस्थेच्या स्वास्थ्याला आवश्यक असलेली,शरीर आणि श्वास यांच्यातील सूक्ष्म एकतानता घडून येते.

२०. अंजली मुद्रा

(नमस्कार स्थिती) याने हृदय मोकळे होते, मेंदू शांत होतो, ताण आणि चिंता कमी होते तसेच प्राणायाम आणि ध्यानाची पूर्वतयारी होते.