हे सारे विश्वच तुमचे आहे. (World belongs to you in Marathi)

सुख आणि दु:ख म्हणजे खरंतर ह्या ४-६ फुटी शरीरामध्ये होणाऱ्या तीव्र संवेदना आहेत. जेव्हा तुम्ही ह्या मध्ये गुरफटणे थांबवाल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही "मी आपलाच आहे" असं म्हणू शकाल. जेव्हा आपण आपल्याच राग-द्वेष, इच्छा-आकांक्षा व शंकांच्या पलीकडे जाऊ, तेव्हा पूर्ण विश्व आपलंच बनून जाईल. आपले सारे दु:ख "मी मी मी" बद्दलचे असते. मला हे हवे आहे, मला ते आवडत नाही...." ह्यातून मुक्त व्हा. ज्या प्रमाणे सूर्य रोज उगवतो आणि मावळतो, गवत आपणहून उगवते, नदी आपणहून वाहत असते, चंद्र जसा प्रकाश देतो तसा मी इथे सदैव अस्तित्वात आहे.

प्रश्न: कोणी तरी तुमची स्तुती केली की तुम्हाला कसे वाटते?

उत्तर: तुम्ही लाजता, खुश होता, गोंधळून जाता /ओशाळता?

स्तुतीमुळे तुमच्या चेतने मध्ये काहीतरी होते. बरोबर? पण मला त्याचे काहीच वाटत नाही. तुम्ही जर चंद्राची स्तुती केलीत तर त्याला काही फरक पडणार आहे का? तसंच तुम्ही पर्वत, लुसिरीन नदीची किंवा ब्लॅक फोरेस्ट ची स्तुती केलीत तर त्यांना काही फरक पडणार आहे का?

काहीच नाही. ते आहेत तसेच राहणारआहेत.

अगदी तशाच प्रकारे मी देखील या सृष्टीचा भाग आहे. माझी स्तुती केल्याने तुम्हाला बरं वाटत असेल, तर ती जरूर करा, खरं तर तुमच्याकडे दुसरा पर्यायाच नाही. (प्रचंड हशा)

तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही मला तुमच्या खेळण्याप्रमाणे वागवू शकता. (प्रचंड हशा)

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf