ऐश्वर्य आणि माधुर्य (Aishwarya and Madhurya in Marathi)

जगात सहसा असं समीकरण असते, जिथे ऐश्वर्य असते तिथे माधुर्य नसते व जिथे माधुर्य असते तिथे ऐश्वर्य नसते. पण जे व्यक्तिमत्व पूर्णपणे बहरलेलं असतं,  तिथे दोन्ही एकत्र असणे शक्य आहे. ऐश्वर्य म्हणजे ईश्वरत्व, पूर्ण जगाचे / सत्याचे / जे 'आहे' त्याचे आधिपत्य. ऐश्वर्य शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे धन / संपत्ती आणि जिथे धन-संपत्ती असते तिथे प्रभूत्वदेखील असते.

प्रेम आणि अधिकार एकत्र राहू शकतात का?

पूर्ण बहरलेल्या व्यक्तिमत्वापाशी ऐश्वर्य आणि माधुर्य हे दोन्ही एकत्र असू शकतात. श्रीरामाकडे ऐश्वर्य होते पण फार थोडे माधुर्य होते. परशुरामाकडे फक्त प्रभुत्व होते आणि माधुर्य जराही नव्हते. बुद्धाकडे जास्त प्रमाणात माधुर्य होतं पण प्रभुत्व फार कमी होतं. पण कृष्ण आणि येशू ख्रिस्त ह्यांचाकडे दोन्ही होतं. "मीच तुम्हाला मार्ग दाखवू शकतो" ह्या वाक्यामध्ये प्रभुत्व दिसते पण त्यांच्या प्रेमाच्या व प्रार्थनेच्या अभिव्यक्तीमध्ये माधुर्य जाणवते.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग' ही अशी एकमेव सेवाभावी संस्था आहे जिला ”AMERICA BACK ON TRACK” (अमेरिका बॅक ऑन ट्रेक) या उपक्रमामध्ये भाग घेण्यास निमंत्रित केले होते. (एक अशी रेल्वे गाडी जी वॉशिंग्टन पासून न्यू यॉर्क पर्यंत जाउन आणखी २० शहरांना भेट देणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा हुरूप अमेरिकन नागरिकांमध्ये यावा या साठी हा उपक्रम राबविला जात आहे). आर्ट ऑफ लिव्हिंगची शिबिरे उरुग्वे व दक्षिण अमेरिकेत सुरु झाली आहेत. दक्षिण-पूर्व भागात आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक बैठकीत अफाट कृतज्ञता आणि उत्साह दिसून आला. आश्रमात सुरु असलेल्या 200 पेक्षा अधिक TTC सहभागींचा उत्साह ओसंडून वाहतो आहे.