श्रावणी, तत्वमसी आणि ज्योती यांची जीवनकथा | The stories of Shravani, Tattvamasi & Jyoti

1

नटखट, हसतमुख आणि ध्यानमग्न : श्रावणी

 

श्रावणी, या खास मुलीची कथा जाणून घेण्यासाठी मला गुंटूर, आंध्र प्रदेशला जावे लागले. येथे आर्ट ऑफ लिविंगच्या ऑफिसमध्ये पोहोचता क्षणीच स्वादिष्ट जेवणाच्या सुगंधाने मला तेथील स्वयंपाकघरात खेचून नेले.

तेथे ती उभी होती-फुला फुलांच्या हिरव्या फ्रॉकमध्ये, आपल्या नाजूक हातांनी सांबार ढवळत, एका सुंदर हास्यासह. स्वयंपाक घरात ती अत्यंत सराईतपणे वावरत होती, तेथील वस्तू अत्यंत कुशलतेने हाताळत होती. मला न्याहाळत मॅडम माँ ला तिने विचारले कि मी परिधान केलेली सलवार नवीन फॅशनची आहे कां? इतके तिचे निरीक्षण सूक्ष्म होते. मी खूपच उतावळी होते तिची कथा ऐकण्यासाठी.

मॅडम माँ, आर्ट ऑफ लिविंगची स्वयंसेविका आणि या शाळेची प्रशिक्षिका आणि जिने मला श्रावणीबध्दल सांगितले होते, तिला ही श्रावणी खेटूनच बसली होती. स्वतःची जीवन कथा समजण्या इतपत ती मोठी होती. तिचे दोन्ही पालक एचआयव्हीने वारल्यावर या श्री श्री सेवा मंदिर मध्ये तिला आणण्यात आले तेंव्हा ती अकरा वर्षाची होती. पालकांचा उल्लेख झाल्याबरोबर तिची चमकती नजर एकदम झाकोळली. येथे आली तेंव्हा तिचे रक्त अॅलर्जीक झाले होते. पण व्यवस्थित औषधोपचार आणि संगोपनामुळे तिची प्रकृती आत्ता छान होती. ज्यांचे पालक नक्षलींच्या हल्ल्यात मारले गेलेत किंवा एचआयव्ही आणि एड्समुळे वारलेत किंवा पालकांनी टाकलेल्या अनाथ मुलांना या श्री श्री सेवा मंदिरात मिळणाऱ्या प्रेम, काळजी आणि संगोपनाप्रमाणे तिला देखील येथे ते सर्व मिळाले. गुंटूरमध्ये आर्ट ऑफ लिविंगची हि पहिली शाळा आहे जेथे विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आहे.

मॅडम माँ सांगत होत्या कि श्रावणी स्वतः सगळे करायला उत्सुक असते. त्यांनी तिच्या सात वर्षाच्या वास्तव्याची स्तुती केली. तिने भगवत गीता पाठांतर स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. योगाथॉन मध्ये यशस्वीपणे १०८ सूर्य नमस्कार घातले होते. भगवत गीतेचे नऊ अध्याय पूर्ण केले होते. गुरु पादुका स्तोत्रम् आणि शिव लिंगाष्टकम् मुखोद्गत आहे. शाळेतील विद्यार्थांसोबत सहलीमधून भारतातील बहुतेक मोठ मोठ्या देवस्थानाला जाऊन आली आहे. अभ्यासाव्यतिरिक्त तिला नृत्य करणे, सिनेमे पहाणे आणि ध्यान करणे आवडायचे.

वकील व्हायची इच्छा होती तिची. तिच्या तर्कशुध्द आणि तीक्ष्ण विचारसरणीमुळे आणि वाद घालण्याच्या स्वभावामुळे तिला वकीली पेशा उत्तम आहे, असे मॅडम माँ नीच तिला तसे प्रवृत्त केले होते.

मला निरोप देता देता मॅडम माँ नी श्रावणीला इतर मुलांना सायंकाळच्या प्रार्थनेसाठी तयार करायला सांगितले. आर्ट ऑफ लिविंगच्या सातत्याने आणि समर्पित भावाने स्वतःला सेवा कार्यात वाहून घेणाऱ्या स्वयंसेवकांमुळे जसे हजारो गरजुंचे जीवन समूळ बदलले आहे तसेच श्रावणीचे जीवन बदलताना मी पहात होते. भविष्यात चांगल्या वकिलाची गरज पडली तर ठोठावण्यासाठी मला एक दार मिळाले होते.

2

तत्वमसी : जिचा हट्ट आणि संताप श्री श्रींच्या ज्ञानात विरघळला.

 

तत्वमसी, एक लहान मुलगी, जी मंत्रोच्चार करते, ध्यान करते, इतर मुलांच्यात खेळते आणि स्वयंपाकासह इतर घरगुती कामे देखील करते. हे सर्व पहिले कि गत काळातील हट्टी आणि तापट मुलगी हीच आहे यावर विश्वासच बसत नाही.

तत्वमसीचे दोन्ही पालक नक्षलवादी, पोलिसांच्या चकमकीत मारले गेल्यावर पोलिसांनीच तिला आर्ट ऑफ लिविंगच्या गुंटूर शाळेत आणून सोडले. आक्रमकपणा जणू तिच्या रक्तातच होता. सर्वांसोबत ती तशीच वागायची. दिलेल्या जेवणाची थाळी सुद्धा फेकून द्यायची आणि मग उचलून जेवायची. पायात घुसलेला काटा कितीही प्रेमाने आणि काळजीने काढत असले तरी हिची अर्वाच्य भाषा सुरु असायची, धसमुसळेपणाने ती जखम आणि रक्तस्त्राव आणखी वाढायचा. एकदा तर इंजेक्शन द्यायला दवाखान्यात नेल्यावर तिने असा दंगा करून सारा दवाखाना डोक्यावर घेतला कि तिला स्पर्श करायला कोणीही धजावेना.

अशी हट्टी, आक्रमक आणि तापट मुलगी शांत आणि आनंदी होऊ शकेल काय? काही महिन्याच्या प्रेम, काळजी आणि संगोपनामुळे तिच्यामध्ये बदल दिसू लागला. आत्ता ती हसू लागली होती आणि कश्यानेही संतापत नव्हती. गुंटूरमधील आर्ट ऑफ लिविंग स्वयंसेवकाच्या प्रयत्नामुळे एक हट्टी, आक्रमक आणि तापट अनाथ मुलीच्या जीवनातील हिंसा नाहीशी होऊन त्यात अमुलाग्र बदल झाला होता. हीच तर श्री श्री रविशंकरांची खासियत आणि शिकवण आहे.

3

ज्योती : सुदर्शन क्रियेने तिला तारले

 

१४ वर्षाची असताना ज्योती श्री श्री सेवा मंदिरात आली होती. आत्ता ती एमए होऊन त्याच शाळेत शिक्षिका बनली होती. तेथे सर्वच शिक्षकांना युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीर आणि आर्ट ऑफ लिविंगची इतर शिबिरे करावी लागत.

सगळे काही छान चालले होते जोपर्यंत तिच्या आई वडिलांच्या मनात तिच्या लग्नाचा विचार नव्हता. तिचे आई वडील शाळेकडेच हुंड्यासाठी पैसे मागू लागले, जे शक्य नव्हते आणि नाकारले गेले. तिला शाळा आणि वसतिगृह सर्व काही खूप आवडायचे. पण तिचे पालक तिला घेऊन गेले. ज्योतीने शाळेचा राजीनामा दिला आणि पालकांसोबत राहू लागली. त्यांनी तिचा छळ केला. दोन महिने तिला अन्न पाणी देखील दिले नाही. अन्न पाण्याशिवाय कोणीही दहा दिवसापेक्षा जास्त जगू शकत नाही. मग तिची अन्न नलिका सुकून गेली, तिची आंतडी ओढली गेली, अगदी तिची लाळ देखील आटली. अश्या अवस्थेत तिच्या पालकांनी तिला हॉस्पिटलमध्ये सोडून गेले. ज्योतीने डॉक्टरांना विचारल्यावर तिला सांगितले गेले कि जर तिचे त्वरित ऑपरेशन केले नाही तर ती दोन आठवड्यापेक्षा जास्त जगणार नाही. तिने हे सर्व गुंटूर शाळेतील सह शिक्षकांना सांगितले. ते धावत पळत आले, त्यांनी ऑपरेशन आणि उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. आत्ता ती पूर्णपणे बरी झाली. एका चांगल्या कुटुंबात तिचे लग्न झाले.

दोन महिने अन्न पाण्यावाचून ती कशी जगू शकली? तिचा विश्वास आहे कि, सुदर्शन क्रिया आणि श्री श्री रविशंकरांच्या कृपेमुळेच ती जिवंत राहिली.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कित्येक मुलींपैकी श्रावणी, तत्वमसी आणि ज्योती हि तीन उदाहरणे आहेत ज्यांना पुनर्रुजीवन मिळाले आहे. अगतिक जगण्यातून सर्व साधारण जीवन प्राप्त झाले आहे. ‘सर्वजण तणावमुक्त व्हावेत, ज्ञान प्रसार व्हावा आणि शांती पसरावी आणि समाजात बदल घडावा,’ हे श्री श्री रविशंकरांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी स्वयंसेवक अथकपणे सेवा करताहेत. जेंव्हा आपण एक होऊ तेंव्हा महिला आणि मुली यांच्या बाबतीत घडणाऱ्या अमानवीय कृत्याविरोधी एक परिवर्तनाची लहर येईल आणि क्रांती घडेल.

जर आपण आमच्या शैक्षणिक तसेच महिला सक्षमीकरण प्रकल्पामध्ये सामील होऊ इच्छित असाल, आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला webteam.india@artofliving.org येथे लिहा.

लेखिका : मोनिका पटेल

Related Stories

Nurturing the Abandoned

The Little Angels

Reaching out and catching them young

Free Education : A tour Through Guntur... Sri Sri Seva Mandir!