अमेरिकेतील डेट्रॉइट सह २५ पेक्षा जास्त शहरांनी एकाच वेळी साजरा केला ‘श्री श्री रवि शंकर दिन’ | Detroit joins 25+ US cities to celebrate 'Sri Sri Ravi Shankar' Day

इंडिया
11th of जुलै 2018


बेंगलुरू: ११ जुलै, २०१८ :अमेरिका आणि कॅनडा मधील २५ पेक्षा जास्त शहरांच्या यादीमध्ये सामील होत डेट्रॉइटच्या महापौरांनी शिक्षण, सेवाभावी प्रकल्प आणि योग – ध्यान यांच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना प्रेरणा दिल्याबद्दल ७ जुलै हा दिवस ‘श्री श्री रवि शंकर दिन’ साजरा करून गुरुदेवांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला.

डेट्रॉइटचे महापौर माइकल डुगन यांनी निवेदन जाहीर करून डेट्रॉइटच्या नागरिकांना गुरुदेव श्री श्री रवि शंकर जी द्वारा स्थापित आर्ट ऑफ़ लिविंग और मानवी मुल्यांची आंतरराष्ट्रीय समिती (IAHV) च्या विश्व शांती आणि जागतिक स्तरावर समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी असलेल्या प्रतिबद्धतेसाठी धन्यवाद व्यक्त करण्यासाठी त्यांच्याबरोबर सामील होण्याचे आवाहन केले.

एक हिंसामुक्त आणि तणावमुक्त समाज बनवण्यासाठी गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी यांनी केलेल्या अद्वितिय कार्याबध्दल मिशिगन राज्यानेही त्यांचा खास सन्मान केला.

श्री श्री रवि शंकर दिन साजरा करणाऱ्या या २५ शहरांशिवाय गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी यांना त्यांच्या वैश्विक
मानवतावादी कार्यासाठी ३ देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले आहे. जगभरातील विविध शासनांकडून ३५ पेक्षा जास्त सन्मानपत्रे, पुरस्कार आणि १५ पेक्षा जास्त मानद डॉक्टरेट्स प्राप्त झाल्या आहेत.