विश्व सांस्कृतिक महोत्सवाने आले भारतीय सरकारी तिजोरीत ४२ दशलक्ष डॉलर !! WCF earned the Exchequer $42 million

इंडिया
26th of डिसेंबर 2016

विश्व सांस्कृतिक महोत्सवाचा भारतावर, विशेषतः राजधानी नवी दिल्लीवर झालेल्या परिणामांचा सविस्तर अहवाल

२०१६ हे वर्ष भारतासाठी अनेक घटनांनी भरलेले होते. पठाणकोटचे अतिरेकी हल्ले, भारत पाक सीमेवरील तणाव आणि आर्थिक मंदी अशा गोष्टी भारताने अनुभवल्या| या सर्व चिंतेच्या वातावरणात आर्ट ऑफ लिव्हिंगने दिल्लीमध्ये एकमेवाद्वितीय अशा विश्व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले|

आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या विश्व सांस्कृतिक महोत्सवात १५५ देशातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणून केवळ सांस्कृतिक प्रभाव पाडला असे नाही तर मोठ्या प्रमाणावर मूर्त स्वरूपातही परिणाम करता आला|

या अहवालात प्राथमिक आणि माध्यमिक संशोधन केले| या कार्यक्रमाचा परिणाम जाणून घेण्यासाठी शासनाच्या अनेक विभागांतील (पर्यटन विभाग, आर्थिक व्यवहार विभाग) गोळा केलेल्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र नीती यानुसार तयार केलेली कार्यपद्धती वापरण्यात आली|

  • सभेला हजर असलेल्या लोकांच्या संख्येनुसार WCF चा २६ वा क्रम लागला|
  • WCF मध्ये ३२ देशांमधील राजकीय मुत्सदी उपस्थित होते|
  • मार्च महिन्यात आलेले प्रवासी WCF ळा उपस्थित रहाण्यासाठी आले होते|
  • ३.५ दशलक्ष लोकांची उपस्थिती असलेले WCF ही २०१६ मधील सर्वात मोठे संमेलन होते|
  • जगातील सर्वात मोठे शांती ध्यान : हे जगातील पहिलेच होते|
  • ३.५ दशलक्ष लोक|
  • सर्वात मोठे शांती ध्यान : विश्व शांतीसाठी एकाच ठिकाणी ३.५ दशलक्ष लोकांनी केलेले हे जगातील पहिलेच ध्यान होते|
  • संपूर्ण जगातील ३७,००० पेक्षा जास्त कलाकारांनी WCF मध्ये आपली कला सादर केली|
  • ८५०० संगीतकारांनी ४५ प्रकारची वाद्ये असलेले वृंद वादन एकाच व्यासपीठावर सादर केले|
  • आदिवासींच्या कलेचे पुनरुज्जीवन : छत्तीसगड, महाराष्ट्र आणि सिक्कीम या राज्यातील खास भारतीय आदिवासी कलांचे WCF मध्ये पुनरुज्जीवन झाले|

 

अभ्यास

विश्व सांस्कृतिक महोत्सवात मध्ये १५५ देशातील प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आणल्याने केवळ सांस्कृतिक परिणाम झाला असे नव्हे तर अर्थकारण, समाज, वातावरण, संकृतीचे पुनरुज्जीवन आणि लोकांना आध्यात्माची ओळख करून देणे या सर्व बाबतीत प्रभाव पडला| विश्व सांस्कृतिक महोत्सवात चा परिणाम जाणून घेण्यासाठी क्रमश: सादर करीत असलेल्या अहवालांपैकी हा तिसरा अहवाल आहे| प्राथमिक अहवालात कार्यक्रमाच्या आधी मुख्यत्वे दिल्ली आणि बंगलोर येथील अर्थकारणावरील परिणामांचा अंदाज वर्तविण्यात आला होता| तर या अहवालात कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर परिणामांचे विश्लेषण करण्यात आले आहे| प्राथमिक व माध्यमिक संशोधन करण्यात आले आणि विश्व सांस्कृतिक महोत्सवात च्या परिणामांचे पद्धतीने विश्लेषण करण्यात आले|

 

आर्थिक परिणाम

  • परदेशी प्रवाशांचे आगमन
  • परकीय चलनातून मिळालेले उत्पन्न

१. पर्यटन

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बंगलोर मधील आंतरदेशीय टीमने केलेल्या प्राथमिक संशोधनातून असे दिसून आले आहे की जगभरातील विविध भागांमधून सुमारे २०००० लोक दिल्ली येथील या भव्य कार्यक्रमासाठी आले होते|

आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योगावर WCF च्या झालेल्या परिणामांचे विश्लेषण, जानेवारी ते जून २०१६ या काळात परदेशी प्रवाशांचे आगमन (FTA) आणि परकीय चलनाची प्राप्ती (FEE) याचा अभ्यास करून करण्यात आले|

  • दरवर्षी होणारी (YOY) परदेशी पर्यटनातील वाढ, मार्च महिन्यात WCF मुळे सर्वात जास्त होती|
  • दिल्लीत येणाऱ्या दर ६ प्रवाशांपैकी १ प्रवासी WCF मध्ये उपस्थित रहाण्यासाठी आला होता|
  • कर्नाटकातील दर ८ प्रवाशांपैकी १ प्रवासी WCF मध्ये उपस्थित रहाण्यासाठी आला होता|

  • परकीय चलन

आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम हा परकीय चलनाच्या प्राप्तीवरून (FEE) ठरवता येईल. शासनाकडील माहिती असे दर्शविते की मार्च महिन्यात भारतातील निरनिराळ्या शहरांमध्ये सुमारे ८.१७ लाख परदेशी पर्यटक आले|

पर्यटन विभागाकडील माहितीचे (FEE) साठी विश्लेषण करण्यात आले|

  • परकीय चलनाच्या उत्पन्नात ९.८ % वृद्धी . मार्च महिन्यात $ १७८३ दशलक्ष ते $ १९५६ दशलक्ष इतकी बरतात दरवर्षी होणाऱ्या वाढीच्या प्रमाणात २०१६ मध्ये सर्वात जास्त|
  • WCF च्या काळात अंतर राष्ट्रीय पर्यटनानाने $ ४२ दशलक्ष इतके उत्पन्न. १६ % परकीय चलनाची प्राप्ती WCF च्या काळात झाली|
  • कर्नाटकच्या उत्पन्नातील ११ % WCF ने आणले|

परदेशी मुत्सदी

WCF मध्ये ३४ देशातील राजकीय प्रतिनिधी आले होते आणि त्या सर्वांनी WCF किंवा जागतिक नेतृत्व सभेतील (Global Leadership forum) व्यासपीठावर येऊन भाषण केले| WCF मुळे केवळ आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नती झाली असे नाही तर मुत्सदेगिरीवरही चांगला परिणाम झाला|

WCF मध्ये प्रतिनिधित्व केलेल्यांची टक्केवारी

  1. सार्क (SAARC)  -७५%
  2. ब्रिक्स (BRICS)  - ५०%
  3. संयुक्त राष्ट्र (UN)  - १८%
  4. जी२० (G20) - ३०%
  5. जी४ (G4) - ७४%
  6. आशिया कॉर्पोरेशन डायलॉग ( Asia Corporation Dialogue) ५०%
  7. इंडियन ओशन रिम असोसिएशन ( Indian Ocean Rim Association) २९%

निष्कर्ष

WCF मध्ये राजकारणी, सुप्रसिद्ध व्यक्ती, संत आणि लाखो लोकांची उपस्थिती होती| या महोत्सवाचे वर्णन सांस्कृतिक ऑलिम्पिक असे करता येईल| या जागात असलेल्या वैविध्याचा उत्सव तर होताच त्याशिवाय अतिशय मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक प्रभाव पडला| WCF मुळे दिल्ली मध्ये परकीय चलन प्राप्त झाले आणि राजनैतिक प्रतिनिधी आणि जागतिक नेते यांना ‘ब्रांड इंडिया’ दाखवता आला| एका उदात्त कारणासाठी झालेली इतकी भव्य सभा न भूतो न भविष्यती अशी होती| विश्व संस्कृती महोत्सवाने एक नवीन मापदंड निर्माण केला आहे आणि इतिहासात आपले नाव कोरले आहे|

 

पुरवणी १

मथळा

संख्या

शेरा

मार्च महिन्यात आलेले परदेशी पर्यटक

८१७२०५

 

मार्च महिन्यात दिल्ली येथे आलेले परदेशी पर्यटक

९८६२१

एकूण पर्यटन उद्योगापैकी दिल्लीचा भाग १०.२ %

मार्च महिन्यात कर्नाटक मध्ये परदेशी पर्यटकांचे आगमन

       २४९८४

एकूण पर्यटन उद्योगापैकी कर्नाटकचा भाग २.७ %

मार्च महिन्यात WCF साठी दिल्लीत आलेले परदेशी पर्यटक

१७०००

प्राथमिक अभ्यासावरून असे दिसून आले की सुमारे प्रथम शिवरात्री उत्सवात भाग घेतला|

मार्च महिन्यात WCF साठी कर्नाटकात आलेले परदेशी पर्यटक|

        ३०००          

 

दिल्लीच्या पर्यटन विभागाला WCF कडून मिळालेले|

        १७.२%

मार्च महिन्यात दिल्लीतील दर ६ पर्यटकांपैकी १ WCF साठी आलेला होता.

कर्नाटकच्या पर्यटन विभागाला WCF कडून मिळालेले   %

        १२.०%

मार्च महिन्यात कर्नाटकातील दर ८ पर्यटकांपैकी १ WCF साठी आलेला होता.

विश्व सांस्कृतिक महोत्सव


 

For reference to Department of Tourism data for FTA’s and FEE’s , kindly refer the below link. http://tourism.gov.in/market-research-and-statistics