ध्यान अतिविचार कसे थांबवू शकते याची ४ कारणे

आपल्याला विचारवंतांचे कौतुक वाटते. आईनस्टाईन, प्लॅटो, आर्किमिडीज, मॅरी क्युरी, चार्ल्स डार्विन, विल्यम शेक्सपिअर. या बुद्धिमान, सर्जनशील आणि अंतर्ज्ञानी लोकांनी आपल्या परिणामकारक विचारांनी जगातील अनेक गोष्टी बदलल्या. विचार करणे ही सवय सकारात्मक असते, पण अतिविचार नाही.

मनात खूप साऱ्या निरुद्देशी विचारांचा भडिमार होतो. अतिविचारांनी मनाला स्पष्टताही मिळत नाही. आणि काही तर्कशुद्ध उपाय शोधायला सुद्धा मदत होत नाही. यातून फक्त वेड्या, संतापजनक आणि अनावश्यक विचारांना खतपाणी मिळते. अतिविचारी मनामुळे आकलनशक्ती कमी होते. तुम्हाला माहिती आहे, की भूतकाळ बदलणे शक्य नाही आणि भविष्यात काय आहे हे कुणालाच माहीत नाही. तरीही, मन विचारांच्या भूलभुलैयामध्ये हरवून जाते. लक्षात ठेवा, भूतकाळातील चुकांमधून शिकणे आणि त्यांचा वेड्यासारखा विचार करत बसणे यात अगदी बारीक फरक आहे. 

तुम्ही कधी  एखाद्या लहान मुलांचे बारीक निरीक्षण केले असेल, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या मनात फक्त 'आज' असतो. भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा कुठलाही विचार नसतो, मुले केवळ वर्तमान क्षणात असतात. आपण सगळेच कधीतरी लहान होतोच. आपल्यामध्ये सुद्धा वर्तमान क्षणात जगण्याची आणि अतिविचारांचा ताण सोडून देण्याची क्षमता आहे. हो ना? अतिविचार थांबवण्यासाठी ध्यान करुन बघा. त्याने तुम्हाला त्या सहज सोप्या काळात जायला मदत होईल. 

 

४ मार्ग, ज्याने ध्यानसाधना अतिविचार थांबवायला मदत करते

1. तुमचा दृष्टीकोन सुधारतो

अतिविचार केल्याने तुमचे मन अनावश्यक विचार व कल्पना, शंका, दुःख व वास्तविकतेचे विचित्रिकरण यांनी पिडीत होते. यातील एकही गोष्ट तुम्हाला शांत आणि आनंदी आयुष्य देऊ शकत नाही. ध्यानामुळे परिपूर्ण दृष्टीकोन मिळतो, आणि वेगळ्या, मोठ्या वास्तवाची जाणीव होते. तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार सीमित आणि विरोधाभासी आहेत. जेंव्हा तुम्ही अनेकविध मार्गांचा धांडोळा घ्याल, तेव्हा तुम्हाला आयुष्यातील मोठ्या गोष्टींकडे नेणारा मार्ग सापडेल.

2. नकारात्मक विचारांना बाजूला करण्यासाठी मदत

बऱ्याचदा, आपण आपल्या आयुष्यातील गोंधळांना जबाबदार असणारे दोष कुणा दुसऱ्यांवर लादण्याच्या प्रयत्नात असतो.

काही झाले तरी, दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवले की अडचणींचा सामना करणे सोपे वाटते. दुसऱ्यांमध्ये दोष पाहणे आणि बोट दाखवणे यासारख्या नकारात्मक वृत्तींना बाजूला करायला ध्यान मदत करते. सजगता देणारं ध्यान करुन बघा. अतिविचार थांबवायला, आश्चर्य वाटेल इतक्या उत्तम प्रकारे ते तुम्हाला मदत करेल. या सजग अवकाशात, नकारात्मक विचारांना हद्दपार करणे आणि मोठमोठ्या सत्यांचा शोध घेणे तुम्हाला शक्य होईल. याने तुम्हाला चांगले विचार आणि सत्कृत्यांवर लक्ष एकाग्र होणे सुलभ होईल.

3. मनातील कचरा साफ करा.

अतिविचार हे तुमचं मन तुम्हाला खात असल्याचं लक्षण आहे. तुमच्या अस्वस्थतेच्या मुळाशी जाऊन त्याच्याशी दोन हात करा. ध्यानामुळे मनातील कचरा साफ होण्यासाठी मदत होते. तुमच्या डोक्यातील विचारांना व्यवस्थित मांडणे, योग्य विचारांना प्राधान्यक्रम देणे आणि संपूर्णपणे व्यवस्थित विश्लेषण करणे शक्य होईल. एकदा ‌तुमची समस्या लक्षात आली की ती सोडवण्यासाठी तुम्ही काम करु शकता. याने तुम्ही असंबद्ध आणि नकारात्मक विचारांच्या गर्तेत हरवून जाणे टाळता येते.

4. तुम्हाला आसक्तींपासून मुक्तता मिळते

अतिविचार हे तुमच्या - तुमचे शब्द, कृती, कल्पना आणि विचार यांच्याबद्दलच्या - आसक्तीचे प्रकट रुप आहे. आपण लोक आणि नात्यांना इतके चिकटून बसलेले असतो. त्यामुळे इतकी मतं व कारणं तयार होतात, आणि मग आपण अती टीका करायला लागतो किंवा अति चिकित्सक होतो. 

ध्यानामुळे आसक्ती आणि अतिविचारांच्या गोंधळातून बाहेर पडायला मदत होते. त्यातून तुम्हाला मनाची सुस्पष्टता मिळेल आणि मानसिक क्षितीज विस्तृत होईल. याचाच परिणाम म्हणून, आयुष्यातील असंख्य शक्यतांची व्याप्ती वाढेल. 

 

पट्कन लक्षात ठेवायच्या ३ गोष्टी

  • ध्यानसाधना करण्यासाठी, अतिविचारांची शृंखला सुरू होण्याची वाट बघू नका.
  • तुमच्या चिंता दूर करण्यासाठी, दररोज नेमाने, दिवसातून दोन वेळा प्रत्येकी २० मिनिटे ध्यान करा.जेव्हा ताण वाढतो, तेंव्हा अतिविचार आणि अतिचिकित्सा सुरू होतात. जर तुम्ही या मार्गावर नवे असाल, तर तणावमुक्ततेसाठीचे मार्गदर्शक ध्यान अतिविचार टाळायला मदत करेल.
  • चांगल्या भावनेबद्दलसुद्धा अतिविचार केल्याचा उलट परिणाम होऊ शकतो. आपण प्रत्येक नवीन अनुभवाला उत्कृष्टतेशी जुळविण्याचा सतत प्रयत्न करतो. यातून बऱ्याचदा अपेक्षाभंग होतो. तेव्हा, अतिविचारांच्या या खाचखळग्यांपासून सावध रहा. 

आर्ट ऑफ लिव्हिंग चा सहज समाधी मेडीटेशनचा कार्यक्रम, न संपणाऱ्या विचारांच्या साखळीला थांबवण्यासाठी मदत करतो. यामार्गे मनाला मिळणाऱ्या विश्रांती आणि टवटवीतपणा मुळे मन हलके होईल.