दिवाळीचे रहस्य | Secret behind Diwali

जगभरात यावेळी लोक प्रकाशाचा सण ‘दिवाळी’ च्या पूर्व तयारीत व्यस्त आहेत. पूर्वेकडील सर्वात मोठा सण ‘दिवाळी’ म्हणजे चांगल्याचे वाईटावर, प्रकाशाचे अंधःकारावर आणि ज्ञानाचे अज्ञानावर प्राप्त विजयाचे प्रतिक होय.

दिव्याचे महत्व

प्रकाश माला

दिवाळी – फटाके, मिठाई आणि भेट वस्तू

ज्ञान आणि प्रकाश

अध्यात्मिक ज्ञान आणि दिवाळी


दिव्याचे महत्व

तेलाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी वातीला तेलात बुडवावे लागते पण वात जर पूर्णतः तेलात बुडाली असेल तर ती पेटू शकणार नाही, उजेड देऊ शकणार नाही. म्हणून तिला थोडेसे बाहेर ठेवतात. आपले जीवन देखील असेच आहे नां, आपणास याच संसारात राहायचे असते. पण संसारातून अलिप्त राहणे गरजेचे आहे. जर आपण संसारातील भौतिकतेमध्ये अडकलो तर जीवनातील खरा आनंद आणि ज्ञान मिळऊ शकणार नाही. म्हणून संसारात राहून देखील प्रापंचिक घडामोडीमध्ये अडकला नाहीत तर आपण ज्ञान आणि आनंदाचे पाईक बनू शकतो.

जीवनामध्ये ज्ञान प्रकाशाचे सतत स्मरण राहावे यासाठीच ‘दिवाळी’ साजरी केली जाते, निव्वळ घरे सजवण्यासाठी नाही. जीवनाच्या या गूढ रहस्याचे स्मरण राहण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. प्रत्येकाच्या हृदयात ज्ञानाचा दीपक चेतवूया आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्याची आभा पसरवूया.


प्रकाश माला

दिवाळीला ‘दीपावली’ देखील म्हणतात. दीपावली म्हणजे प्रकाश माला. जीवनामध्ये अनेक दिशा, बाजू आणि पैलू येतात आणि जीवनाला पूर्ण रीतीने समजून घेण्यासाठी या सर्व घटकांवर प्रकाश पडणे महत्वाचे आहे. प्रकाशाच्या या माला आपणास स्मरण करतात कि जीवनातील हरएक पैलूवर लक्ष देणे आणि ज्ञानाचा प्रकाश टाकणे गरजेचे आहे.

प्रत्येक मनुष्यामध्ये काही चांगले गुण आहेत आणि आपण प्रज्वलित केलेले दीपक याचेच प्रतिक आहेत. कोणामध्ये सहिष्णुता तर कोणामध्ये प्रेम, साहस, उदारता इत्यादी गुण आहेत. तर काही लोकांमध्ये या सर्व लोकांना एकत्र जोडून ठेवण्याचा गुण आहे. आपल्यातील हे सुप्त गुण दीपक प्रमाणे आहेत. म्हणून एकच दिवा लाऊन संतुष्ट होऊ नका तर हजारो दिवे लावा. अज्ञानाचा अंधःकार दूर करण्यासाठी अनेक दिवे पेटवावे लागतील. ज्ञानाचा दिवा पेटऊन आणि ज्ञान प्राप्त करून आपण आपल्यातील सुप्त गुणांना जागृत करू शकतो. जेंव्हा हे प्रकाशित आणि जागृत होतील तेंव्हाच खऱ्या अर्थाने ‘दिवाळी’ साजरी होईल.


दिवाळी – फटाके, मिठाई आणि भेट वस्तू

दिवाळीत फटके उडवण्याचा एक गुढार्थ आहे. आयुष्यात आपण अनेक वेळा भावना, नैराश्य आणि क्रोधाने भरलेले असतो-फटाक्यांप्रमाणे-उडण्यासाठी तयार. आणि जेवढे आपण आपल्या भावना, इच्छा, क्रोध, द्वेष यांना दाबून ठेऊ, ते स्फोटाच्या बिंदूपर्यंत पोहोचलेले असतात. फटाके उडवणे, त्यांचा स्फोट करणे आपल्या दबलेल्या भावनांना मुक्त करण्याचा पूर्वजांनी बनवलेला मनोवैज्ञानिक मार्ग आहे. बाहेरच्या जगातील स्फोट पाहून आपल्या आंत देखील त्या प्रकारच्या संवेदना अनुभवतो. स्फोटासोबत खूप सारा प्रकाश देखील पसरतो. जेंव्हा आपण आपल्या दबलेल्या भावनांपासून मुक्त होतो तेंव्हा गहऱ्या शांतीचा उदय होतो.

दिवाळीमध्ये आणखी एक परंपरा आहे मिठाई आणि भेट वस्तू आदान प्रदान करण्याची. एक दुसऱ्यांना गोड धोड आणि भेट वस्तू देणे हे द्योतक आहे भूतकाळातील सारे कटू अनुभव आणि भावना संपवून भविष्यात मैत्री आणि नातेसंबंधांमध्ये नवजीवन प्रदान करणे.


ज्ञान आणि प्रकाश

कोई भी उत्सव सेवा भावना के बिना अधूरा है। ईश्वर से हमें जो भी मिला है, वह हमें दूसरों के साथ भी बांटना चाहिए क्योंकि जो बाँटना है, वह हमें भी तो कहीं से मिला ही है, और यही सच्चा उत्सव है। आनंद एवं ज्ञान को फैलाना ही चाहिए और ये तभी हो सकता है, जब लोग ज्ञान में साथ आएँ।

“दिवाली” का अर्थ है वर्तमान क्षण में रहना, अतः भूतकाल के पश्चाताप और भविष्य की चिंताओं को छोड़ कर इस वर्तमान क्षण में रहें। यही समय है कि हम साल भर की आपसी कलह और नकारात्मकताओं को भूल जाएँ। यही समय है कि जो ज्ञान हमने प्राप्त किया है उस पर प्रकाश डाला जाए और एक नई शुरुआत की जाए। जब सच्चे ज्ञान का उदय होता है, तो उत्सव को और भी बल मिलता है।


अध्यात्मिक ज्ञान आणि दिवाळी

आत्म्याचा स्वभाव आहे उत्सव. प्राचीन काळी साधू संत प्रत्येक उत्सवामध्ये पवित्रतेचा समावेश करत, जेणेकरून विविध कर्म कांड आणि धावपळीमध्ये आपण आपले उदिष्ट्य विसरू नये. रिती रिवाज, धार्मिक अनुष्ठान आणि पूजा पाठ ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतिक आहे. यामुळे आपल्या उत्सवांना गहरा अर्थ प्राप्त होतो. दिवाळीमध्ये आणखी एक परंपरा आहे आपण मिळवलेली सर्व धन संपदा समोर ठेऊन, त्यांची पूजा करून प्रचुरता आणि तृप्तीचा अनुभव करण्याची. जर आपण ‘अभाव’ चा अनुभव करू तर अभाव वाढेल. तृप्ती आणि संपन्नतेकडे ध्यान घेऊन जाल तर संपन्नता वाढेल. चाणक्यनी अर्थशास्त्र मध्ये सांगितले आहे, “धर्मस्य मूलं अर्थः|” अर्थात ‘संपन्नता धर्माचा आधार आहे.’

ज्यांना अध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेले नाही त्यांना दिवाळी सण वर्षातून एकदा येतो. पण ज्ञानी व्यक्तींना दररोज आणि हर क्षण दिवाळी आहे. प्रत्येक ठिकाणी ज्ञानाची आवश्यकता आहे. इतके कि आपल्या कुटुंबातील, आसपासची एखादी व्यक्ती जर अज्ञानाच्या अंधःकाराने ग्रस्त असेल तर आपण देखील आनंदी राहू शकत नाही. म्हणून आपल्या कुटुंबातील, समाजातील आणि या पृथ्वीवरील हर एक व्यक्तीच्या जीवनात खरा ज्ञान प्रसार करणे गरजेचे आहे. खऱ्या ज्ञानाचा उदय होईल तेंव्हा उत्सव साजरा करायला आणखी बळ मिळेल.

यजुर्वेदात सांगितले आहे, “तन्मने मनः शिवसंकल्पमस्तु.” अर्थात ‘आपल्या मनामध्ये सदिच्छा प्रकट होवोत.’ हि दिवाळी ज्ञानासोबत साजरी करूया आणि मानवतेची सेवा करण्याचा संकल्प घेऊया. आपल्या हृदयात प्रेमाचा आणि घरात प्रचुरतेचा, तृप्तीचा दीपक प्रज्वलित करूया. तसेच सेवा करताना करुणेचा, अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाचा आणि ईश्वराकडून प्राप्त संपन्नतेप्रती कृतज्ञतेचा दिवा लावूया.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञान चर्चेतून संकलित

ज्यादा माहिती आणि आपल्या प्रतिक्रियासाठी संपर्क – webteam.india@artofliving.org