दिवाळीचा सण कसा साजरा करावा | how to celebrate Diwali in marathi

दिवाळी, जी साऱ्या जगभर प्रकाशाचा सण म्हणून साजरी केली जाते. दुराचारावर सदाचाराच्या, अंधारावर उजेडाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा सण आहे. आज घरोघरी केलेली दिव्यांची रोषणाई निव्वळ सजावट नाही तर तिची एक प्रतीकात्मक कथा आहे. जसे प्रकाश अंधकाराचा नाश करतो तसे ज्ञानाचा उजेड आपल्यातील अज्ञानाचा नाश करतो. 

आपल्यामध्ये सदाचार दुराचारावर विजय प्राप्त करतो.

दिवाळी हा पवित्र सण कां साजरा केला जातो ?

या सणाशी संबंधित खूप कथा आहेत.

  • प्रत्येक हृदयात ज्ञानाचा उजेड प्रज्वलित करण्यासाठी, घरोघरी जीवन आणि प्रत्येक चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी दिवाळी साजरी होते.

  • दिवाळी/दीपावली शब्दाचा शब्दशः अर्थ आहे दिव्यांची,प्रकाशाची रांग.आपल्या जीवनाला खुपसे पैलू आणि स्तर असतात. त्या सर्व पैलू आणि स्तरांवर प्रकाश असणे महत्वाचे आहे. कारण जीवनातील एक जरी पैलू अंधकारमय राहिला तर आपले जीवन परिपूर्ण अभिव्यक्त होऊ शकत नाही.

  • आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला आपले ध्यान आणि ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे, हे सूचित करण्यासाठी दिवाळीत दिव्यांची माळ प्रज्वलित केली जाते.

  • आपण प्रज्वलित केलेला प्रत्येक दीपक आपल्यातील सद्गुणांचा प्रतिक आहे.प्रत्येकाच्यात सद्गुण आहेत, काहींच्यात धैर्य, काहींच्यात प्रेम, शक्ती,उदारता.अनेकांच्यात लोकांना संघटीत करण्याची क्षमता आहे. हे दिवे आपल्यातील सुप्त गुणांप्रमाणे आहेत. जसे ते सद्गुण प्रज्वलित,जागृत होतील,’ दिवाळी ’ आहे.  

दिवाळी कश्याचे प्रतिक आहे ?

केवळ एकच दिवा लाऊन समाधानी होऊ नका, हजारो दीपक लावा. जर आपल्यात सेवा भाव असेल तर तेवढ्याने संतुष्ट न होता ज्ञानाचा दीपक लावा.ज्ञान प्राप्त करा. आपल्या अस्तित्वाच्या सर्व पैलूंना प्रकाशित करा.

दिवाळीचे आणखी एक रहस्य फटाकांच्या फुटण्यात आहे.जीवनात बऱ्याचवेळा आपण फटाक्याप्रमाणे असतो.आपल्यात दबलेल्या भावना, नैराश्य, क्रोध इत्यादीमुळे स्फोट फुटण्यास तयार. आपल्यामध्ये दबलेले राग, द्वेष, घृणा स्फोटक स्तरावर पोहोचलेले असतात. आपल्या या मनस्थितीचे द्योतक म्हणून पूर्वजांनी फटाके फोडण्याची प्रथा मनोवैज्ञानिक प्रक्रिया म्हणून निर्माण केली आहे.

जेंव्हा आपण बाहेर स्फोट पहातो तेंव्हा आंतमध्ये त्याच संवेदना अनुभवतो. स्फोटासह खुपसा उजेड देखील फेकला जातो. जेंव्हा आपण आपल्या दबलेल्या भावनांपासून मुक्त होऊन मोकळे होतो तेंव्हा ज्ञान रुपी प्रकाशाचा उदय होतो.

ज्ञानाची गरज सर्वत्र आहे. कुटुंबातील एक जरी व्यक्ती अंधकारात/दुःखी असेल तर आपण आनंदी राहू शकत नाही. म्हणून आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञान प्रकाशात स्थापित करावे लागेल.याच ज्ञानाला समाजातील, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत घेऊन जा.

जेंव्हा खरे ज्ञान उदय होते-‘उत्सव’ होतो. बहुतेक वेळा उत्सवामध्ये आपण आपली सजगता आणि एकाग्रता गमावतो. म्हणून उत्सवात सजगता टिकून ठेवण्यासाठी ऋषींनी प्रत्येक उत्सवाला पवित्रता आणि पूजा विधींच्या सोबत जोडले आहे. म्हणून दिवाळी देखील पूजेची संधी आहे. दिवाळीचे  अध्यात्मिक उद्दिष्ट्य उत्सवामध्ये ‘गांभीर्य’ आणणे आहे. प्रत्येक उत्सवात अध्यात्म असणे गरजेचे आहे, कारण अध्यात्मामुळे तर ‘उत्सव’ होतो.

 

ज्यादा माहिती तसेच आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी संपर्क  webteam.india@artofliving.org