ध्यानाचे दाम्पत्यांकरीता महत्त्व

प्राचीन वैदिक काळात भारतात, कोणत्याही अध्यात्मिक कृतीकरिता दाम्पत्यापैकी एका व्यक्तीस अनुमती नसे कारण त्याच्यामुळे असंतुलन निर्माण होते. जर विवाह झालेला असेल, तर दोन्ही व्यक्ति या कृतींचा भाग असायलाच हव्यात. असा विश्वास होता कि , जर पती आणि पत्नी दोघेहि एकत्र सहभागी झाले तर ते एकत्र पुढे जाऊ शकतात, नाहीतर एकाची प्रगती होते आणि एकाची होत नाही. अन्यथा, एक परिपूर्ण  / एकाची परिपूर्तता झाली असेल आणि दुसऱ्याची झाली नसेल तर वैवाहिक जीवनात संघर्ष किंवा बेबनाव निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच असा नियम करण्यात आला कि दोघांनीही एकत्रित यात भाग घ्यावा. 

या नियमाच्या  लाभाचा विस्तार फक्त विधी किंवा सोहळ्यांपुरता मर्यादित न राहता दररोजच्या प्रार्थना आणि विधीं साठीही झाला.  बहुतांश दांपत्ये  ध्यानाचा अभ्यास 'एकत्र' वेळ आणि त्याच्या पासून होणाऱ्या फायद्यांच्यासाठी करत आहेत. 

गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, "प्रत्येक आत्म्याची हा शोध घेण्याची नैसर्गिक प्रवृत्तीच आहे  कि आनंद ज्याचा कधीही ऱ्हास किंवा कमतरता होणार नाही आणि प्रेम ज्याचा कधीच  विपर्यास होणार नाही.हे फक्त ध्यानमुळेच शक्य होते.”

आम्ही एकत्र ध्यान करतो

ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत: 

१. सहज समाधी सारखे  ध्यानाचे  काही तंत्र आहेत जे तुम्हाला तरल शक्तींनी व्याप्त करतात स्फूर्ती देतात 

    आणि त्याच्यामुळे  होणाऱ्या परिवर्तनाचे परिणाम दूरगामी आहेत.

२. ज्यांच्यामध्ये या काहीगोष्टी वास करतात जसे गर्व दाखवणे ,कार्यपूर्तीचा उद्धटपणा किंवा आपण 

    कोणीतरी वेगळे आहोत अशी  भावना  असते  त्यांच्यामध्ये  गहन स्थिरता आणते. 

३. नातेसंबंधांमध्ये ताण ध्यानामुळे कधीही येत नाही. खरेतर, वास्तविक ते इतरांना अभ्यासाची (ध्यान 

     करण्याची ) प्रेरणा देते. 

४. अभ्यासामुळे (ध्यानामुळे)जसे जसे आरामाचे स्तर वाढतात, तसे मग ते  दाम्पत्य स्वतःला एकत्रित 

    ध्यान करताना पाहतात.जेव्हा दाम्पत्य एकत्र ध्यान करतात त्यावेळी त्यांच्या आत आणि सभोवताली 

    एकत्रित ऊर्जेचे संचारण होताना दिसते , स्थिरचित्त /शांतततेची, ऐक्य किंवा एकतेची  भावना येते.

५. आनंद जो आतून येतो तोच सभोवताली परावर्तित होतो, तुम्ही जिथे काम करता तिथे, तुमच्या 

    व्यक्तिगत आयुष्यात आणि अगदी  सहजतेने जसे आनंदाचे नैसर्गिक स्वरूप आहे, मागण्यापेक्षा 

    कोणालातरी त्यांच्या आयुष्यात काहीतरी देण्याची  भावना होते, घेण्यापेक्षा देण्याची संधी निर्माण करते.

अशी नाती कायम जोपासली जातात असे जे दाम्पत्य काहीवर्षांपासून एकत्र ध्यान करत आहेत त्यांचा  

अनुभव : 

" एक अशी गोष्ट ज्याची प्रत्येक दाम्पत्य प्रतीक्षा करत असते ती म्हणजे एकत्र चांगला वेळ घालविणे. आपण सुट्ट्यांमध्ये बाहेर जातो, सिनेमा, उपहारगृह /हॉटेल आणि अजून कुठे नाही पण तरीही आपल्याला जास्त मिळवण्याची लालसा असतेच.

आम्ही ती एक गोष्ट शोधली आहे जी तुम्हाला खरोखरच एकत्र चांगला वेळ घालविण्याचे समाधान देऊ शकते आणि ते आहे "ध्यान".

हो!!  मी आणि माझे पती , आमच्यामध्ये या २० मिनिटांच्या एकत्र ध्यानाने प्रेम आणि जो बंध तयार झाला आहे त्याने आम्हाला मोहिनी घातली आहे. माझ्या  पतीच्या कामाच्या (ऑफिसच्या ) वेळेनुसार आम्ही नियोजन करतो आणि दिवसातून निदान एकदा एकत्र ध्यान करतो. 

आमच्यामध्ये असे वादविवाद होत नाहीत  जे  बरेचदा दिवसभर एकमेकांशी अबोला धरण्याकडे घेऊन जातात किंवा ज्याच्यामुळे अबोला धरला जातो. एकत्र ध्यानाने आम्हाला त्या विशालतेची जाणीव करून दिली जे आपण आहोत आणि  लहान लहान गोष्टी ज्या आपण धरून ठेवतो  त्या सोडून  पुढे जाण्यासाठी दिशा दिली .

एकत्र ध्यानाचा परिणाम म्हणजे  दोघेही कोणत्याही अपेक्षेशिवाय स्वीकार करू शकतो ज्याच्यामुळे आम्ही आमच्या व्यावहारिक आयुष्यात अधिक लक्ष देऊ शकतो आर्ट ऑफ लिविंगच्या सेवा उपक्रमातून समाजाला काहीतरी देऊ शकतो. 

विपरीत परिस्थितीतही शाश्वत हास्य आणि अटळ विश्वास हि आम्हाला एकत्र ध्यानातून मिळालेली भेट आहे. 

प्रशांत चौधरी हे 'एअर क्राफ्ट मेटेंनन्स इंजिनिअर ' आहेत एका प्रसिद्ध विमान कंपनीत, त्यांच्या पत्नी शुभम चौधरी या ' प्रोसेस लीड' आणि आर्ट ऑऑ लिविंग मध्ये शिक्षक आहेत.

काल्पनिक जगात म्हणजे जसे आपले असते तसे, दाम्पत्य ध्यानाला एकत्रित करण्याचा असा अभ्यास बनवितात जो सोपा आणि सहज असायला हवा- तेवढाच सहज जेवढा ध्यानाचा अभ्यास आहे किंवा असायला हवा. तथापि, अशा युगात अथवा काळात जिथे स्वतंत्र व्यक्तित्व, कथित अधिकार, विविधता हे नियम आहेत, तिथे आपल्याला असे आढळणार नाही कि  दाम्पत्याला नेहमीच  एकत्रित  ध्यान करावेसे वाटेल. आणि ते ठीकही आहे. समूहाने ध्यान करण्यात नक्कीच  एक वेगळे सौन्दर्य एक वेगळीच सुंदरता आहे पण तरीही हा प्रत्येकाच्या  वैयक्तिक आवडीचा आणि प्राधान्याचा भाग आहे.

काहीकाळ ध्यान केंद्रात ध्यानाचा आनंद घ्या  

बंगळुरू ,भारत येथील आर्ट ऑफ लिविंग आंतरराष्ट्रीय केंद्रात कार्यक्रमांच्या श्रेणी अथवा प्रकार प्रत्येकासाठी अगदी दाम्पत्यांसाठीसुद्धा आहेत, म्हणूनच  दाम्पत्यांकरिता  हे  ध्यान केंद्र  सर्वात जास्त महत्व असणारे नंदनवन  मानले जाते. आश्रमात एका दिवसात वेगवेगळे उपक्रम घेतले जातात त्यात निर्देशित ध्यान किंवा मार्गदर्शित ध्यानाचाही समावेश आहे. सुरुवात करण्यासाठी , दाम्पत्यांकरिता निर्देशित ध्यान उत्कृष्ठ आहे.

सहज समाधी ध्यान  हे सर्वात सरल तंत्रांपैकी एक आहे आणि रोज अभ्यास (ध्यान) करण्यासाठी योग्य आहे, इथे ध्यान करण्यासाठी दाम्पत्यांसाठी  कोणतीही ठराविक स्थिती,  कठोर प्रणाली नाही किंवा कोणतीही  कठोर  सूची नाही कि ज्याचे पालन केलेच पाहिजे.

 ध्यानाला "आमची" वेळ कसे करायचे?

  • आजपासूनच ध्यानाला सुरुवात करा उद्यापासून करू म्हणून पुढे ढकलण्याऐवजी 
  • एकत्रित ध्यान करण्यासाठी  रोज एक निश्चित वेळ प्राधान्याने ठरविलेला असू द्या.
  • तुम्ही ध्यान करण्यापूर्वी काही  शारीरिक क्रियांचा एकत्रितपणे समावेश करू शकता जसे चालणे/ धावणे/ योगा हे तुम्हाला गहन ध्यानाच्या  अनुभवाप्रत घेऊन जाते.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या संभाषणवर आधारित